Popular Posts

Monday, June 13, 2016

शासनाची मेंढपाळाविषयी उदासिनता

                    शासनाच्या आधुनिकतेच्या  धोरणामुळे अनेक  पारंपारिक व्यवसायांवर गदा आलेली आहे. परंतु पारंपारिक व्यवसाय करणार्या या समाजाचे पुनर्वसन करण्यासाठी मात्र शासनाने कोणत्याही प्रकारचे पाउल उचलले नाही ही एक  शोकांतिका आहे. शासनाच्या आधुनिकतेचे धोरणाचे स्वागत आहेच पण या धोरणामुळे ज्या समाजाच्या वंशपारंपारिक व्यवसायावर  गदा आली त्यांचेही कुठेतरी पुनर्वसन व्हायला हवे असे माझे मत आहे. शासनाने आजवर वन्यजीव सरंक्षन कायदा, प्राणिमात्रा छळविरोधी कायदा यासारखे कायदे करण्यात आले. परंतु या कायद्यामुळे अनेक समाजाच्या पारिपारिक व्यवसायावर गदा आली व त्यांच्या उपजिवेकेचे साधन त्याच्यापासुन हिरावुन घेतल्यामुळे त्या समाजातील लोक ही दोन वेळेच्या अन्नालाही महाग झाली आहेत. परंतु शासनाने त्यांचे पुनर्वसन करण्याची तसदी घेतली नाही.
                        धनगर   समाज हा ही जंगलोजंगली भटकंती करणारा समाज. हा समाज नागरी समाज व्यवस्थेपासुन दुर राहणारा. या समाजातील अनेकाजवळ ना राहायला घर ना कसायला जमिन. यांचा उदरनिर्वाह चालतो तो फक्त शेळी मेंढीपालन व्यवसायावर. परंतु शासनाने जंगलात  शेळीमेंढींना केलेल्या बंदीमुळे हा समाज अक्षरश: उघड्यावर आला. यामुळे या समाजाच उदरनिर्वाहाचे साधन या समाजापासुन हिरावुन घेतल्या गेल. शेड बांधुन शेळीमेंढीपालन व्यवसाय करणे ही योजना बहुतेक मेंढपाळाजवळ शेतीच नसल्यामुळे फोल ठरली आहे. त्यामुळे हा समाजातील लोकांवर उपासमारीची वेळ आली. परंतु धनगर समाजाच कुठही पुनर्वसन करण्याची तसदी  मात्र शासनाने घेतली नाही. त्यामुळे धनगर समाजाचा रोष हा शासना विरुद्ध वाढतच आहे.
                    भारतात वन्यजीव सरंक्षन कायदा अस्तित्वात आल्यानंतर गारोडी समाजाने साप पकडणे, त्यांचे विष काढणे हा गुन्हा ठरु लागला. त्यामुळे गारोडी समाजाच्या वंशपारपारिक व्यवसायावर गदा आली आणि त्यांना उदर निर्वाह करणेही कठीन झाले. तेव्हा विदेशातील रोम्युलस व्हीटेकर या पर्यावरण वादी व्यक्तीने सर्पदंशाच्या लसी करीता कच्चा माल म्हणुन सापाचेच विष उपयोगात येते हे लक्षात घेउन तामिळनाडु येथाल चेन्नई येथील मद्रास सुसर याठिकाणी १९७८ साली  "ईरुला गारोडी सहकारी उद्योग संघ" स्थापन केला. तामिळनाडु सरकार ने  या सहकारी संघाला आठ हजार साप दोन जिल्ह्यातुन पकडुन विष काढण्याची परवानगी दिली. सापांना पकाडायच, दोन चार हप्ते त्यांना पाळायच,  आणि यादरम्यान त्यांत विष काढुन त्या सांपाना व्यवस्थितरित्या जंगलात सोडुन द्यायच नंतर त्या सापाच्या विषावर प्रक्रीया करुन त्या पासुन सापाच्या विषासाठी लस तयार करायची. असा हा प्रकल्प.
                 या प्रकल्पामुळे बेरोजगार झालेल्या संपुर्ण नव्हे तरीही काही गारोडी समाजाच्या युवकांच्या हाताला काम आल. गारोडी समाज आपली उपजिविका करण्याकरिता एक मार्ग काढला. परंतु या समाजाच्या हिताच्या दृष्टीने असा प्रकल्प राबविण्याच आपल्या शासनाला न सुचता ते एका विदेशी व्यक्तीला सुचाव हे नक्कच आश्चर्यजनक आहे.
                         अश्याच प्रकारे धनगर समाज हा आपली शेळी मेंढर घेउन जंगलांनी फिरत असतो. शेळी मेंढर हे काटेरी झुडुप, गवताशिवाय काहीही खात नाही. उलट शेंळी मेंढी खात असलेले गवत मोठे झाल्यानंतर वाळायला लागते ते गवत वाळल्यानंतर त्या गवतामुळे जंगलामध्ये वणवा लागण्याची शक्यता असते. त्या वणव्यामध्ये लाखो रुपयाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होते. हे गवत वाळण्यापुर्वीच शेळीमेंढी खात असल्यामुळे ते एकाप्रकारे नैसर्गिक साधनसंपत्तीच हे प्राणी संवर्धनच करत असतात. शेळीमेंढीपासुन कोणत्याही वन्य प्राण्या पासुन कोणत्याही  प्रकारचा धोका नसतो. शेळी मेंढीच्या लेंढीखतामुळे जमिन ही उत्पादन वाढवते हा आतापर्यंतच्य्या शेतकर्याचा अनुभव आहे त्यामुळे वनक्षेत्रातील जमिनीला फायदाच आहे, तरीही शासनाने  जंगलामध्ये शेळीमेंढी चराई बंदी केली ही एक आश्चर्यजनक बाब आहे.
                     रोम्युलस व्हिटेकर या मान्यवराने ज्याप्रकारे गारोडी समाजासाठी "ईरुला गारोडी सहकारी उद्योग संघ" स्थापन केला त्याच प्रमाने धनगर समाजातील बांधवावर प्रत्येकी वनक्षेत्रातील काही वृक्षांची संवर्धनाची जबाबदारी देउन शेळी मेंढी चराई पासेस देणे आवश्यक आहे जेणेकरुन धनगर समाजाचा उपजिवेकेचा प्रश्नही मिटेल व वनक्षेत्रातील वृक्षांचे संवर्धनही होईल...
                                        संजय रा. कोकरे
                                                अमरावती
                                   मो नं. 9561730189
                email:             
                s.r.kokare1992@gmail.com

No comments:

Post a Comment

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...