Popular Posts

Monday, August 20, 2018

*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

*2 लाखांचे अपघात विमा शेतकरी बांधवांसाठी विना मूल्य/मोफत महाराष्ट्र शासन तर्फे।*

*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 20171-8*

*ह्याचे फॉर्म कुठे भेटेल-*
तुमच्या गावाच्या कृषी अधिकाऱ्याकडे।

*ही योजना पूर्ण पने मोफत आहे व ह्या विमा योजनेचे रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यास तुम्हि कोर्टात केस टाकू शकता व त्याचा खर्च सरकार देईल।*

 बर्याचवेळेस माहिती नसल्याचा अभाव किंवा कायद्यातील गैरसमज ह्यामुळे कोणी सरकारी दरवाजे ठोकत नाही पण आपण आपला अधिकार हा घेअलाच पाहिजे. मान्य की मयत व्यक्तिची जागा ह्या पैशातून नक्कीच भरून निघणार नाही पण भविष्यातील काही काळतरी सुखकर जाईल.

माझ्या काही मित्रपरिवारात / ओळखीत शेतकरी अपघाती मृत्यू व अपंगत्व अशा बर्याच घटना घडल्या पण माहिती अभावी त्यांच्या कुटूंबांना ह्या संधी पासून मुकावे लागले, म्हणून ही माहिती पोस्ट रूपात आपल्या समोर मांडली आहे.

*नुकसान भरपाई रक्कम.*
1) शेतात काम करतांना/ अपघातात मृत्यू - २ लाख.
2) 2 अवयव निकामी होणे- 2 लाख
3) 1 डोळे निकामी होणे- 1 लाख.
4) 2 डोळे निकामी होणे - 2 लाख ..etc

*अपघाताचे प्रकार*

-रेल्वे/ रस्ता अपघात.
-पाण्यात बुडून मृत्यू.
-जंतू नाशक अथवा अन्य कारणाने विषबाधा.
-विजेचा धक्का अपघात.
-वीज पडून मृत्यू.
खून.
-उंचावरून पडून झालेला अपघात व मृत्यू.
-सर्प दंश/ विंचू दंश.
-नक्षल वाद्या कडून हत्या.
-जनावरांमुळे हल्याने मृत्यू.
-दंगल.
-अन्य कोणतेही अपघात.

*अनुषंगिक कागत पत्रे*

1) मृत्यू दाखला
2) शव चिकित्सा दाखला
3) स्तळ पंचनामा
4) पोलीस पाटील दाखला
5) FIR कॉपी
6) इंवेस्ट पंचनामा
7) अपंगत्व सर्टिफिकेट

*लागणारे कागत पत्रे*

१) 7/१२ किंव्हा ८'अ' किंव्हा 6 'ड' फेरफार
2) शेतकऱ्यांचे वय 10 ते 75
3) शेतकरी स्वतः वाहन चालवत   असेल आणि अपघात झाला तर वाहन चालवण्याचा वैध परवाना आवश्यक.

🙏🙏कृषि सहाय्यक 🙏🙏

Friday, August 17, 2018

जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही.

*🙏विचार धन🙏*

एक सावकार आपल्या कुत्र्यासोबत होडीतून नदी पार करीत होता.

कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला.

त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालवणारा नावाडी ही हैराण झाला.

 होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते.स्वतः तर बूडेल बरोबर सगळ्यानाच घेऊन बूडेल.

सावकाराच्या लक्षात ही गोष्ट आली, तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षाही जास्त गडबड करू लागला.

हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि नम्रपणे सावकाराला म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."

सावकाराने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.

कुत्र्याच्या नाका-तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांताने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला. आता त्याला नावेची गरज लक्षात आली.

थोड्या वेळाने त्याला ओढून पुन्हा नावेवर घेतले,मग मात्र तो चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसला.

त्याचे हे वर्तन पाहून सावकार चकीत झाला व म्हणाला "पाहिलं आधी किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय."

प्रवाशी हसून म्हणाला  "महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही.जेव्हा त्याला पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी आणि नावेची गरज,लक्षात आली.

*तात्पर्य*

*जो  पर्यंत अंगात रग आहे तो पर्यंत माणूस असाच वागतो. देवाचे अस्तित्वच विसरतो.देव किंवा सद्गुरू त्याला वारंवार जाणीव करुन देत असतात पण अंगातील मस्ती .. मायेत गुरफटून गेल्या मुळे देवाच्या किंवा गुरूच्या बोलण्या कडे त्यांच्या संकेताकडे तो दुर्लक्ष करतो ....*

*पण मग जेंव्हा फटके बसतात तेंव्हा तोच देवा शिवाय गुरु शिवाय  पर्याय नाही हे जाणून शरण येतो ..

Wednesday, August 15, 2018

Happy Independence Day...

"उत्सव 🇨🇮तीन रंगाचा "
     आभाळी आज सजला.. !
नतमस्तक मी त्या सर्वांनसाठी
     "ज्यांनी भारत देश घडविला"
Happy Independence Day...😘
       Jay Hind

Saturday, August 11, 2018

Abhi Abhi Red Me is company ne market me Naya mobile lounch kiya hai to Dosto niche diye Gaye link par click kar is mobile Ko jarur kharide...
.

Thursday, August 2, 2018

बोण्ड अळी यादी 2018 (Bond Ali List 2018)

           महाराष्ट्रात मागील वर्षी कपाशी या पिकावर बोण्ड अळी चा प्रभाव दिसला. त्यामुले महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचं कापसाचे उत्पादन कमी झालं तर काही शेतकऱ्यांना आपल्या पिकावरून नांगर फिरावं लागला होता. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी ६८०० रु. मदत जाहीर केली होती.
            त्यामुळे ज्या शेतकऱ्याला बोण्ड अळी चे अनुदान देय झाले आहेत. त्या शेतकऱ्याचेही यादी शासनाने जाहीर केली आहे. तरी सर्व बोण्ड अळी मुले आपले पीक बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना आपले नाव या शोधायचे असल्यास पुढील स्टेप फॉलो कराव्यात...
१. सर्वात प्रथम www.google.com या वेबसाईट वर जावे
२.नंतर bond ali  2018  list "Your sub district or district name"  हे search करावे
३. "Your sub district or district name"  या शब्दाच्या जागी आपल्या तालुक्याचे किंवा जिल्हाचे नाव टाकावे जेणेकरून तुमच्या स्वतःच्या तालुक्यातील किंवा जिल्हातील बोण्ड अळी अनुदान लिस्ट तुम्हाला दिसेल.
३. त्यानंतर ते सर्च करावे
४. त्यानंतर तुम्हाला google सर्च मध्ये १ नंबरच्या option मध्ये bold ali  2018 ______  हे  दिसेल.
५. _________ च्या जागी तुम्हाला तुमच्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे नाव दिसेल.
६. त्यानंतर त्यावर तुम्ही  क्लिक करा.
७. आणि नंतर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याची बोण्ड अळी अनुदान लिस्ट ची PDF ची फाईल मिळेल. व तुम्ही  ती डाउनलोड करावी
७. आणि त्या लिस्ट मध्ये तुम्ही तुमचे किंवा  तुमच्या गावाचे नाव शोधावे.......             
                                      Image result for bondali list 2018


तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...