Popular Posts

Monday, September 22, 2014

"जागा वाटपाचा गुंता की बंडखोरी रोखण्याची योजना....."


"जागा वाटपाचा गुंता की बंडखोरी रोखण्याची योजना....." महाराष्ट्रामध्ये सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याची अंतीम तारीख ही २७ सप्टेंबर आहे . महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेसाठी मतदान हे १५ आक्टोंबर ला असुन विधानसभेचा निकाल हा १९ आक्टोंबरला लागणार आहे. परंतु आतापर्यंत महायुती आणि आघाडी मधील जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार?, कोणत्या पक्षाला सुटणार हे नक्की झालेच तर उमेदवार कोण राहणार?, आणि उमेदवार इतक्या कमी वेळात प्रचार तरी कोणत्या प्रकारे करणार? हे सर्व प्रश्न प्रत्येक मतदार संघातील जनसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. लोकसभेमध्ये मिळालेला विजय हा मोदी लाटे मुळेच मिळाला आहे असा समज झालेल्या भारतीय जनता पार्टी हा पक्ष महाराष्ट्रात पण या लाटेचा फायदा घेऊन आपल्याला अधिकाअधिक जागा जिंकता येतील व आपल्याला अधिकाअधिक जागा जिंकता आल्यास मुख्यमंत्री आपलाच असेल असे समज करुन भारतीय जनता पक्ष हा शिवसेना कडे महायुतीमधील जादा जागांची मागणी करत आहे. परंतु महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असुन येथे कोणत्याही एका व्यक्तीची हवा उपयोगात आणता येत नाही तर येथे फक्त विकासाचेच राजकारण उपयोगात आणता येते हे भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी लक्षात घेतले पाहीजे आणि महायुती मधील जागावाटपाचा गुंता लवकरात लवकर सोडायला पाहीजे. 'महायुती मध्ये असणार्या घटक पक्षांची अवस्था ही मामाच्या येथे शिकायला गेलेल्या विद्यार्थ्याप्रमाने झालेली असुन मामा-मामीच पटेना आणि शिक्षन अर्धवट सोडुन जाता येईना .' अशा प्रकारचे संदेश सोशल मिडीयावर नेहमीच सर्वत्र झळकताना दिसत आहे. यामुळे घटक पक्षांचा आत्मसन्मान दुखवण्याची शक्यता असुन ते महायुतीपासुन दुर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महायुती मधील प्रमुखपक्षानी जागावाटपाचा तिढा लवकर सोडवुन प्रत्येक पक्षाला त्याच्या महाराष्ट्रातील ताकदीप्रमाणे जागावाटप करावा ही महाराष्ट्रातील जनसामान्यांची ईच्छा आहे. महाराष्ट्रातमध्ये मागील लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय कॉंग्रेसपेक्षा अधिक जागा जिकंता आल्या मुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष महाराष्ट्रात स्वताला राष्ट्रीय कॉग्रेस या पक्षापेक्षा मोठा पक्ष समाजायला लागला असुन महाराष्ट्रामधील विधानसभा ही १४४ जागावरच लढणार असा सुर त्यांचे पक्षश्रेष्ठी काढत आहे आहे. परंतु राष्ट्रीय कांग्रेस हा पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडीतील१२४ पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही आहेत असे राष्ट्रीय कॉंग्रेसमधील नेत्यांच्या वक्तव्यावरुन दिसत आहे. त्यामुळे जागावाटपाचा गुंता हा अधिकच वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महायुती व आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे असी जनसामान्यांमध्ये चर्चा आहे. महायुती आणि आघाडी मध्ये जागावाटपावरुन खरचं गोंधळ चालु आहे की पक्षातील बंडखोरी रोखण्याचा एक प्रयत्न आहे का? हा एक प्रश्न नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्मान होत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे एकाच पक्षातील अनेक कार्यकर्ते एकाच मतदार संघामध्ये निवडणुक लढु इच्छित असतात. परंतु पक्ष हा एका मतदार संघातुन कोणत्यातरी एकाच सक्षम कार्यकर्त्याला उमेदवारी देवु शकत असतो त्यामुळे बाकी निराश झालेले कार्यकर्त्ये हे बंडखोरी करण्याची अधिकाअधिक शक्यता असते. पक्षामधुन बंडखोरी झाल्यास पक्षाचेच काही कार्यकर्त्ये पक्षापासुन दुर जाउन पक्षाची स्थानिक कार्यकारणी कमजोर करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे पक्षाचा उमेदवार निवडणुक हारण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुठेतरी जागावाटपामध्ये व प्रत्येक मतदारसंघाचा उमेदवार घोषित करण्यास दिरंगाई केल्यास बंडखोरी करणार्या उमेदवार्याला निवडणुकीची तयारी करण्यास खुपच कमी वेळ मिळत असल्यामुळे प्रत्येक पक्षातील बंडखोरीस आळा बसण्याची शक्यता आहे, असा समज प्रत्येक पक्षाच्या पक्षश्रेष्ठीचा झालेला दिसत आहे. म्हणुनच तर काय प्रत्येक पक्षाचे पक्षश्रेष्ठी हे जागा वाटपाचा गुंता सोडवण्यासाठी व प्रत्येक मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करण्यास दिरंगाई करत तर नाही आहे ना? हा प्रश्न जनसामान्यांत चर्चेचा विषय ठरत आहे..... प्रती, मा. संपादक साहेब, दैनिक __________ आपल्या लोकप्रिय दैनिकातुन हा अग्रलेख प्रसिद्घ करावा ही विनंती. संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

Wednesday, September 10, 2014

हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद........

हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद........ आज हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांची १०९ वी जयंती आहे. मेजर ध्यानचंद हे अत्यंत प्रतिभाशाली असलेले हॉकीचे खेळाडु होते. परंतु त्यांना लहापणापासुनच हॉकीमध्ये आवड होती अस काही नव्हते. ते भारतीय लष्करामध्ये भरती झाल्यानंतर त्यांना हॉकीमध्ये आवड निर्मान होत गेली. पुढे मेजर ध्यानचंद यांना हॉकी या खेळामुळे भारतीय लष्करात पदोन्नती मिळत गेली. त्यांना भारतसरकार कडुन १९५६साली पद्मभुषन पुरस्कार , तसेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार , अर्जुन पुरस्कार ,द्रोणाचार्य पुरस्कार या व अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले. ध्यानचंद यांना गोलपोस्ट च्या लांबी रुंदीची संपुर्णपणे अचुक माहीती होती . मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीस्टीक ला चेंडु चिपकुनच राहायचा .. मेजर ध्यानचंद यांचा खेळ बघताना समोरील खेळाडुच्या मनात मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीस्टीक मध्ये कोणत्यातरी प्रकारचे चुंबक किंवा गोंद असण्याची शंका यायची, या शंकेतुन अनेकदा त्यांची हॉकीस्टीक तपासली जायायची. परंतु त्या तपासातुन कोणताही प्रकारचा गैरप्रकार कधीही समोर आला नाही.मेजर ध्यानचंद य़ांचा खेळ खेळण्याची शैलीच अद्भुत होती ,त्यांच्या या खेळशैलीमुळे समोरील खेळाडुला आणि प्रक्षेकांना त्यांच्या खेळाची भुरळ पडायची. अशीच भुरळ जर्मनीचा हुकुमशहा हिटलर यांना मेजर ध्यानचंद याच्या खेळाची पडली होती. हिटलर यांनी मेजर ध्यानचंद यांना जर्मनीचे नागरीकत्व आणि जर्मन लष्करात महत्वाचे पद देउ केले. परंतू ध्यानचंद यांनी हिटलर यांची ही ऑफर फेटाळत भारताकडुनच ते खेळत राहाण्याचा निर्णय घेतला आणि भारताला आलम्पीक मध्ये अनेक सुवर्णपदके मिळवुन दिली. त्यांचा वाढदिवस आपण सर्वजण 'राष्ट्रीय क्रिडादीन' म्हणुन साजरा करतो........ आपलाच संजय रा. कोकरे अमरावती मो.नं. ९५६१७३०१८९

Wednesday, September 3, 2014

"राजकीय स्वार्थासाठी धनगर समाजाच्या आरक्षनाचे राजकारण........"

"राजकीय स्वार्थासाठी धनगर समाजाच्या आरक्षनाचे राजकारण........" एखाद्या इमानदार जमातीला चोर संबोधने किंवा रक्ताची गंगा वाहली तरी चालेल पण एखाद्या अत्यंत मागास असणाऱ्या समाजाला आरक्षन मिळु देणार नाही, अश्या प्रकारची वक्तव्य राज्य शासनाच्या महत्वाच्या पदावर असणाऱ्या एखाद्या नेत्याने करणे हे कितपत योग्य आहे? हा एक जनसामान्यात चर्चेचा विषय ठरलेला आहे. परंतु असाच काही प्रकार साधुसंताच्या चरणांच्या धुळीने पवित्र झालेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षन आंदोलनाच्या पार्श्वभुमी वर घडत आहे. धनगर जमातीला चोर संबोधने किंवा रक्ताची गंगा वाहली तरी चालेल पण धनगर जमातीला आरक्षन मिळु देणार नाही, या प्रकारची वक्तव्य महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या पदावर असणारी काही नेतेमंडळी करत आहे . एखाद्या चुकीच्या बाबीचा विरोध करायला हरकत नाही परंतु ती बाब चुकीची आहे किंवा नाही हे त्या बाबीचा अत्यंत खोल अभ्यास करुन तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते. परंतु त्या बाबीचा कोणताही अभ्यास नसताना किंवा कोणत्याही प्रकारची माहीती नसताना, ती बाब बरोबर असताना सुद्धा फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्या बाबीचा विरोध करायचा हे कितपत योग्य आहे हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे. असाच काही प्रकार धनगर समाजाच्या आरक्षनाबाबत घडत आहे, धनगर समाजाच्या आरक्षनाबाबत काही गैर संमज पसरवुन किंवा आरक्षनाला विरोध करुन महाराष्ट्रातील काही नेते मंडळी आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु धनगर समाजाच्या आरक्षनाला विरोध करणाऱ्या नेते मंडळींना मी विनंती पुर्वक सांगु इच्छितो की वातानुकुलीत खोलीमध्ये बसुन आदीवासी या शब्दाची व्याख्या करण्यापेक्षा किंवा एखाद्या ईमानदार जमातीला चोर संबोधन्यापेक्षा किंवा रक्ताची गंगा वाहण्याचे वक्तव्य करण्यापेक्षा कधीतरी धनगर समाजातील लोकांबरोबर मेंढर चारायला या मग तुम्हाला कळेल की उन्हात जीवन जगत असताना , पाण्या पावसाचा विचार न करता पोट भरण्या करता किती कष्ट करावे लागतात व म्रुत्यु च्या दाढेतच उभ राहुनच या लोंकाना आपला व्यवसाय करावा लागतो हे आपल्या लक्षात येईल. जर धनगर समाजाच्या आरक्षनाला विरोध करणाऱ्या नेते मंडळीनी एक दिवस जरी धनगर समाजातील लोकांबरोबर मेंढर चारत जिवण जगुन बघितले तर हीच नेते मंडळी धनगर समाज अत्यंत मागास असुन धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षनाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी ते स्वत: महाराष्ट्र राज्य शासनाला करतील मला आशा आहे. धनगर समाजाची मागणी ही अनुसुचित जमातीच्या आरक्षनाची अंमल बजावणी करण्याबाबत आहे. धनगर समाजामध्ये असलेल्या काही अभ्यासु नेत्यांच्या मते " केंद्राने प्रसारीत केलेल्या सुचीप्रमाने महाराष्ट्र राज्याच्या अनुसुचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ३६ वर धनगड असा उल्लेख केलेला आहे. धनगर आणि धनगड हे दोन्ही शब्द एकच आहे." ज्या प्रमाने इंग्रजीमध्ये वेरुळ असे लिहायचे असल्यास त्या शब्दाला वेरुल (Verul) असे लिहावे लागते. तसेच हिंदीमध्ये ' ळ' हा शब्द उपलब्ध नसल्यामुळे ' माळ' या मराठी शब्दाला हिंदीमध्ये 'माल' असेच लिहावे लागते. तसेच 'ओरीसा' या राज्याला 'ओडीसा' या नावाने सुद्धा संबोधल्या जाते. त्याच प्रमाने काही शाब्दीक चुकीमुळे 'धनगर' या शब्दाचे 'धनगड' असे झाले आहे. मा. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाची हालाखीची स्थिती बघुन भारताच्या राज्य घटने मध्ये त्यांना अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट केले आहे. परंतु काही स्वार्थी व्रुत्तीच्या राजकारण्यांमुळे धनगर जमातीचे अनुसुचीत जमातीच्या आरक्षणाचे हक्क त्यांच्या पासुन मागील ६० वर्षापासुन हिरावुन घेतले आहेत. धनगर जमातीवरील अन्याय दुर करण्याकरता मध्यप्रदेश राज्य शासनाने धनगर आणि धनगड एकच असल्याचा किंवा धनगर या शब्दाला धनगड असे वाचण्यात यावे असा अध्यादेश काढुन प्रसिद्ध केला. धनगर आणि धनगड एकच असल्याचा अभिप्राय१९५५ मध्ये कालेलकर समितीने आणि १९७९ मध्ये मंडल आयोग यांनी दिला आहे. तसेच धनगर आणि धनगड एकच असल्याचे अनेक पुरावे अस्तितवात आहे भारतीय संस्कृती कोश, The wild tribes of india (पृष्ठ ७८-७९), Tribal culture of India (पृष्ठ ११२), Some Indian tribes (पृष्ठ १३१-१३२), Society in tribal India  (पृष्ठ २२), Phonology of Dhangar-kurux, Encyclopedia of the people of Asia & Oceania (पृष्ठ ६१३) अशा अनेक ग्रंथामध्ये ओरान जमातीची समकक्ष जमात म्हणून धनगर आणि धनगड असे नोंदवले आहे.१९६८ साली केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या Bibliography of SC, ST & marginal tribes (पृष्ठ क्र. २९४) वर 'धनगर' अनुसूचित जमात आहे असे नमूद केले आहे. १९८२ साली प्रसिद्ध केलेल्या याच ग्रंथाच्या आवृत्तीत 'धनगर' अशीच नोंद आहे. त्याचप्रमाने २२ डिसेंबर १९८९ रोजी मा. माजी खासदार सुर्यकांता पाटील यांनी संसदे मध्ये महाराष्ट्रतील धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनाविषयी प्रश्न विचारला असता तत्कालीन सामाजीक न्यायमंत्री रामविलास पासवान यानी धनगर आणि धनगड एकच असुन हा समाज अगोदर पासुनच अनुसुचित जमातीत समाविष्ट असल्याची बतावणी केली. धनगर समाज हा अनुसुचीत जमातीत समाविष्ट असल्याचे असे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनास विरोध करणाऱ्या नेत्यांनी सर्वात प्रथम धनगर समाजाच्या आरक्षनाबाबत असलेल्या पुराव्यांचा अभ्यास करावा व नंतरच त्यांनी धनगर आरक्षन संदर्भात वक्तव्य करावे.. प्रती, मा. संपादक साहेब, दैनिक __________ आपल्या लोकप्रिय दैनिकातुन हा अग्रलेख प्रसिद्घ करावा ही विनंती. प्रसिद्धी प्रमुख संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...