Popular Posts

Thursday, June 16, 2016

ठेंगा...

   

                
              १५ जुनला आतेभावाचा अड्मिशन फॉर्म भरण्याकरिता अमरावतीला गेलो होतो. तस म्हटल तर मलाही जिल्हाधिकारी साहेबांना एका विषयान्वे एक निवेदन द्यायच होत. म्हणुन अमरावती जिल्हधिकारी कार्यालयाला मी गेलो आणि जिल्हाधिकारी साहेब काही कामानिमीत्त बाहेर गेले असल्यामुळ निवासी जिल्हीधिकारी साहेबांना निवेदन दिले व त्याची पोहच पावती घेतली. तेथुन आम्ही अमरावती बस डेपो जवळ गेलो. पोहच पावतीची काही झेरॉक्स काढण्याकरीता मी एका झेरॉक्स च्या दुकानामध्ये गेलो. दहा झेराक्स काढल्या. त्याला किती रुपये झाले म्हणुन विचारणा केली तर त्याने  दहा रुपये सांगितले. तेव्हा त्यांला खुप महागाई झाली अस सहजच म्हटल व त्याला १० रु. देउन तेथुन जावयास निघालो.
               तेवढ्यात त्या दुकादाराने आम्हाला परत बोलविल. आम्ही परत गेलो. त्याने त्याच्या दुकानातुन दोन एक रुपयाची नाणी काढली. आम्हाला दाखवली पण आम्हाला काहीही सुचत नव्हत हा व्यक्ती नक्की करतोय तरी काय?. त्याने आम्हाला ही दोन नाणी बघा तरी म्हणुन आग्रह केला. मग मी ती नाणी बघितली व त्याला सांगितल की ही दोन्ही एक रुपयाची नाणी आहेत. पण त्याने पुन्हा प्रश्न केला की यात तुम्हाला  दिसतय तरी काय?
                 तेव्हा मी त्यात थोड लक्ष देउन बघितल तर एका जुन्या नाण्यावर चित्र होत अन्नधान्याच तर एका नविन नाण्यावर चित्र होत हातातील बोटांपैकी असणार्या अंगठ्याच.
तेव्हा त्याने मला विचारणा केली  की  मला काय म्हणायच ते आता काही तुम्हच्या लक्षात आल का?. माझ्या पण  लक्षात आल होत की त्याला काय म्हणायच होत तर. कारण पुर्वी एक रुपयात अन्नधान्य पण मिळायच आता त्याच एका रुपयात मिळत ते जे आपण आंगठा दाखवुन लोकांना आपल्या भाषेत सांगतो तो म्हणजे " ठेंगा"....
 


                                        संजय रा. कोकरे
                                                  अमरावती
                                   मो नं. 9561730189
                email:              
                s.r.kokare1992@gmail. com

No comments:

Post a Comment

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...