Popular Posts

Tuesday, November 18, 2014

" एका मेंढपाळाचा शेवटचा दिवस..."                 आकाशात मेघ दाटुन आले होते, अत्यंत जीव घाबरवुन टाकणारा वारा चालु होता, विजाच कडकडाट होत होता, मुसळधार पाऊस थोड्याच वेळात चालु होणार असे चित्र पहावयास मिळत होते. या निसर्गाच आक्राळविक्राळ रुप पाहुन कोणत्याही मानसच नव्हे तर जंगलात राहणारी जनावरे पण सैरावरा पळायला लागली होती. याच वातावरणामध्ये शेतकरी आपल्या शेतामधुन लवकरात लवकर सावरासावर करुन आपपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत होते. जंगलात असणारे जंगली प्राणी पण निसर्गाचे हे आक्राळ विक्राळ रुप पाहुन सैरावैरा पळत होते. पण त्याच परिसरात हे सर्व चित्र शांतपणे पाहत एक मेंढपाळ आपली मेंढर चारत होता. त्याला या माझ्या आक्राळ विक्राळ रुपाची भिती वाटत नाही का? हा प्रश्न निसर्गाला पण निर्मान झाला होता. तो या वातावरणाचा एक अनोखा आनंद घेताना दिसत होता. त्या मेंढपाळाचे या निसर्गाशी काहीशे जन्मोजन्मीचे नाते असल्यागत तो वागत होता. त्याचवेळेस अपेक्षित असलेला पाऊस हा धोधो बरसु लागला. त्याच्या सर्व शेळ्या मेंढर ही त्या मेंढपाळाच्या भोवती जमा व्हायला लागली.
                    मेंढपाळ त्या मेंढरांना आपल्या भोवती घेउन पालकांची माया त्या मेंढरांना देउ लागला. पण हे सर्व करताना त्या पावसाच्या पान्याने खुल्या मनाने तो आपल्या अंगाने न्हावुन निघत होता. विजांचा कडकडाट अत्यंत अक्राळ विक्राळ असल्यामुळे अनेकांना तो विजांचा कडकडाट बघता घाबरगुंडी उडुन जात होती. पण तो मेंढपाळाला पाऊस चालु असताना निसर्गाच सुंदर चित्र अनुभवापासुन तो विजांचा कडकडाट पण थांबवु शकत नव्हता , अस बर्याच वेळ चालत होत त्या मेंढपाळाची मेंढर पण त्या पावसाची आनंदाने मजा घेत होती. काही वेळाने निसर्गाने पण शांततेच रुप घेत आपल आक्राळ विक्राळ रुप थांबवचा निर्णय घेतला होता अस दिसायला लागल होत. पाउस थांबला, विजांचा कडकडाट बंद झाला व सुंदर अस निसर्गाच रुप तिथ दिसायला लागल, फुलपाखर उडत होती , वन्य प्राणी सैरावैरा पळत होती, झाडांच्या पाणावर थांबुन असलेले पाण्याचे थेंब हे मोत्या प्रमाने चकाकत होते.
                    पाऊस थांबला होता तसी ती मेंढपाळाची मेंढर मेंढपाळापासुन दुर होऊन आजुबाजुला चरायला लागली. ती मेंढर अत्यंत शांत प्राणी, त्या मेंढरापासुन ना कोण्या वन्य प्राण्याला त्रास होत होता तर ना की कोणत्याही व्रुक्षाला ती खात होती. त्यांच लक्ष होत फक्त त्या निरुपयोगी जंगलातील गवतावर. तस तर ते गवत प्राण्यांच्या खाण्याऐवजी कशासाठीही उपयोगी नाही पण ते गवत मोठे होउन वाळल्यानंतर जंगलात लागण्यार्या वणव्याला नक्कीच कारणीभुत असते. व त्या वणव्यामध्ये अमुल्य असणारी नैसर्गिक साधनसंपतीच नुकसानच होते. गवत खात मेंढर आपल पोट भरतात व नैसर्गिक साधन संपत्तीच रक्षन पण करत असतात. तो निष्पाप मेंढपाळ त्या मेंढरांवर लक्ष ठेवत त्यांच्या मागे फिरत होता. सुर्याने आपली दिशा बदवायला सुरुवात केली होती व तो आता सुर्य डोक्याचा पलीकडे गेला होता. त्या मेंढपाळा जवळ एक फाटकाफुटका कापड होता व त्या कापडामध्ये काहीतरी बांधलेले होत , थोड्याच वेळाने तो कापड खोलत त्यामधुन त्याने त्याची मिठ, मिरची, भाकर, कांदा ही न्याहारी काढली व ती चालत चालतच खाण्यास पण सुरुवात केली. काहीच वेळात त्याने ती खाउन संपवली , पाणी पिऊन आपली मेंढर चारायला पुन्हा सुरुवात केली.
                   आता मेंढर चारत चारत संध्याकाळ व्हायला लागली होती तेव्हा त्याने आपल्या जंगलात असलेल्या राहुटी कडे आपली मेंढर वळविण्यास सुरुवात केली. तो मेंढर चारत चारत डांबरी करण असलेल्या रस्त्याकडे तो आला.मेंढपाळ आपली मेंढर ही त्या रस्त्यावरुन जात होती. तेवढ्यात त्या रस्त्यामधुन एक चारचाकी गाडी आली तेव्हा त्या चारचाकीमधुन चार व्यक्ती उतरले, तेव्हा त्या व्यक्तींनी त्या मेंढपाळांना आवाज दिला. मेंढपाळाने आपली मेंढर थांबवत तो चार व्यक्तींकडे गेला.
तेव्हा व्यक्तींनी त्या मेंढपाळाला ईकडे काय करत आहे म्हणुन विचारले तेव्हा मेंढपाळाने मी माझी मेंढर घेउन मी माझ्या राहत्या राहुटीकडे जात आहे म्हणुन सांगितले व त्यांना तुम्ही कोण आहात म्हणुन विचारणा केली.
 त्या लोकांनी ती वनकर्मचारी असल्याबाबत सांगीतले व त्यांनी त्या मेंढपाळाला दोन हजार रुपयाची मागणी केली.
पण कशाचे दोन हजार रुपये ? मेंढपाळाने वनकर्माचारांना विचारणा केली.
 तु तुझे मेंढर वनहद्दीत चारल्यामुळे आम्ही तुला दंड करतोय? , वनकर्मचाराने म्हटले.
मी कोणतही जंगलाच नुकसान केलल नाही, कोणत्याही वृक्षाला, वन्य हानी प्राण्याला हानी पोहचवली नाही व सध्या माझी मेंढर कोणत्याही वनहद्दीत नाही मग कशाचा दंड? मेंढपाळाने विचारले.
मुक्याट्याने पैसे देतोस की टाकु तुझी मेंढर उचलुन वनहद्दीत व काढु फोटो मग तुला दंड नाही होणार तर पुर्ण तुझी मेंढर हर्आस होतील.
तो मेंढपाळ घाबरला, दयावया करु लागला , माझ्या कड पैसे नाहीत साहेब माझ्यामेंढरांना सोडा म्हणुन जोरजोराने रडु लागला. पण त्या निर्दयी कर्मचार्यांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही,
                    त्यांनी त्या मेंढपाळाची मेंढर जबरदस्तीने उचलुन वनहद्दीच्या क्षेत्रात टाकली. व फोटो काढुन ती मेंढर गाडीत भरुन शहराच्या दिशेने नेली. पण तो मेंढपाळ तिथेच होता, तो रडत नव्हता, हसत नव्हता फक्त तो शांतपणे भविष्याचा विचार करत होता. कारण त्याच्या उपजिवेकेचे साधन ती वनकर्मचारी घेउन जात होती. आता आपली मुलबाळ काय खाणार , ती कशी जिवण जगणार हाच तो विचार करत होता. कारण नाही त्याच्याजवळ घर होत, ना की त्याच्या जवळ कसण्याकरता शेत होत. आता आपल्या मुलांबाळासहीत विष पिल्या शिवाय पर्याय नाही कारण आपण ती हर्आस केलेली ती मेंढर पुन्हा घेउ शकत नाही. हा विचार त्याच्या डोक्यात येत होता तरीही तो त्या रस्त्यावरच शांत बसला होता पण त्याने त्याची पावले ही घराकडे वळवली नव्हती , आता तो काय करणार हे फक्त त्याच्या मनालाच माहीत होत.........

(या पोस्टमधील फोटो हा इंटरनेटवरुन घेतला आहे.)संजय राजु कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email Id: S.r.kokare1992@gmail.com
Blog: Www.sanjaykokre.blogspot.com
Facebook: Www.facebook.com/sanjaykokare


Monday, November 17, 2014

कधी समजणार समाज या निरागस प्रेमाला ?..

                      "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. असच काही प्रेमाच नात त्याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये होत . ते दोघही अवघ्या दहाव्या वर्गामध्ये शिकत होते. वय जेमतेम १६-१७ वर्ष.ह्या निरागस वयामध्ये कोण आपल आणि कोण दुसर हे ही सहजासहजी कळतही नसत. दोघही एकाच वर्गात शिकत असताना सुद्धा एकमेकांना ओळखत नव्हते. शाळेच्याच एका कार्यक्रमामध्ये दोघांचीही ओळख झाली. ती ओळख पुढे वाढतच गेली, पुस्तकांची देवाणघेवाण होऊ लागली , अनेक विषयावर चर्चा होउ लागली. यातुनच त्यांची मैत्री ही अधिकच घट्ट होत होत गेली .एकमेकांची मोबाईल नंबर पण त्यांनी शेअर करुन घरच्यांच्या लपुनछपुन ते एकमेकांसोबत बोलु लागली ,वर्गातील मुल-मुली पण त्या दोघाच्याबाबत आपपसात चर्चा करु लागली. त्या दोघांची मैत्री ही प्रेमात रुपांतर कधी झाली हे त्या दोघांना कळलच नाही.
                  ती दोघ आता जिवणातील अविस्मरणीय क्षण जगत होती त्यांना माहीत होत व ही क्षण पुन्हा येणार नाही त्यामुळे बिंधास्त अस जिवण जगत होती. त्यांना जगाची काहीही पर्वा नव्हती , कोण आपल्याबाबत चर्चा करत आहे, कोण आपली टिंगल उडवत आहे आणि कोण आपल्या मागावर आहे याची काहीही चिंता त्या दोघांनाही नव्हती ती दोघ फक्त प्रेम करु इच्छित होती. पण हे प्रेम हे अत्यंत निरागस, निस्वार्थी प्रेम होत या या प्रेमामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता. जणु प्रेम म्हणजे देवाकडुन मिळालेली देण अश्याच प्रकारे ती दोघही जिवण जगत होती परंतु या प्रेमाचा परिणाम त्यांच्या शिक्षनावर काय होणार , त्याच्या जिवणावर काय होणार याबाबत विचार करायला दोघही तयार नव्हती कारण दोघही एकंमेकांच्या प्रेमात आकंठ डुबायला लागली होते. परंतु समाजात निरागस अस्या प्रेमाला जागा नसते अस म्हणतात.
                    म्हणुनच काय तर या दोघांच्या प्रेमाची बातमी ही मुलीच्या घरी पोहचली. ती बातमी पोहचल्यानंतर मुलीच्या घरचे अत्यंत संतप्त झाले. तो मुलगा असलेल्या ठीकाणी ते मुलीचे कुटुंबीय आले , त्त्यांनी मुलाला जवळ बोलावले. तो मुलगा त्यांच्या जवळ गेला व आपण कोण आहात म्हणुन विचारु लागला. त्या प्रश्नाच उत्तर देण्याऐवजी मुलीच्या कुटुबियांनी त्याच्या कानाखाली एक जोरात चपराक लगावली. त्याने मी काय केल म्हणुन विचारल तेव्हा त्याला ते त्या मुलींचे कुटुबिय असल्याचे कळले. त्याची खुप घाबरगुंडी उडाली, त्याला रडु कोसळल , त्याने त्यांची माफी मागण्याचा प्रतत्न केला. पण त्याची बाजु ऐकुन घेण्याच्या मनस्थितीमध्ये कोणीही नव्हते, सर्व जण त्याच्यावर तुटुन पडले व त्यावा लाथा बुक्क्यांनी मारु लागले. तो रडत होता , गयावया करत होता, सोडा मला सोडा म्हणुन ओरडत होता पण त्या निर्दयी लोकांना त्या गयावया करण, रडण, मला माफ करा मला सोडुन द्या यापुढे असे होणार नाही असे ओरडत होते यातील एकही शब्द ऐकु येत नव्हता.
                      काही वेळानंतर त्याची मार खाण्याची क्षमता संपली व तो बेशुद्ध होउन त्या रस्त्यावर पडला. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला रस्त्यावर तसेच सोडुन मुलीचे ते कुटुंबीय आपल्या घरी निघुन गेले. तो १६-१७ वर्षाचा निरागस मुलगा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता पण त्याला उचलायला कोणही समोर आल नाही. काही वेळाने त्या मुलांच्या कुटुंबियांना माहीती पडल व त्यांनी त्या मुलाला उचलुन दवाखाण्यात नेल. मुलांच्या कुटुंबिय पण त्या मुलींच्या कुटुबियाना मारायला निघाले पण त्या मुलाच्या वडीलांनी त्यांना थांबवल. व झाल ते झाल पण आता हे प्रकरण आपल्याला वाढवायच नाही आहे कारण हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहचल्यास माझ्या मुलाच जिवण हे उद्वस्त होउ शकत म्हणुन आपल्या शांत राहायच आहे. पण मुलींच्या कुटुबियांनी हा विषय इथेच बंद न करता त्या मुलीचे शिक्षन सोडवले व त्या मुलीवर अनेक निर्बंघ लादल्या गेले. व त्यानंतर कधीही त्या मुलाची व मुलीची भेट झाली नाही.........
                    या निरागस, निस्वार्थी प्रेमाचा असा शेवट का झाला की त्या मुलाला दवाखान्यात अति दक्षता कक्षा मध्ये रहाव लागल, मुलीला आपल्या हक्काच्या शिक्षनापासुन मुकाव लागल. आजचे पालक एवढे निर्दयी आहेत का ? की ते एखाद्या १६-१७ वर्षाच्या मुलाला एवढ बेदम मारहान करु शकतात , आपल्या स्वताच्या मुलीला शिक्षण सोडण्यास कारणीभुत ठरु शकतात , आपल्या मुलीवर अनेक निर्बंध घालु शकतात....
खर तर हा प्रश्न दोघांनाही समजुत देउन, शिक्षकांना त्यांच्यावर लक्ष ठेवायला लावुन, किंवा दोन्ही कुटुंबियांनी आपपल्या मुलांना समज देउन, प्रेमळ अशी दमदाटी करुन सोडविता आला पण हा प्रश्न सोडवण्या करीता जो काही मार्ग अवलंबविला गेला तो दोन निरागस मुलांच्या जिवणाचा अस्त ठरला. आपला समाज हा अत्याधुनिक जगाबरोबर जगतो आहे की तो आजही सोळाव्या सतराव्या शतकात जगत आहे हा मोठा प्रश्न आहे.......

(या पोस्टमधील फोटो हा इंटरनेटवरुन घेतला आहे)


संजय राजु कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email Id: S.r.kokare1992@gmail.com
Blog: Www.sanjaykokre.blogspot.com
Facebook: Www.facebook.com/sanjaykokare

Sunday, November 16, 2014

"स्वच्छ भारत अभियानात निस्वार्थी सहभाग की पब्लिसिटी स्टंट ?..."                    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत साकार करण्याकरता माननीय पंतप्रधान यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषना केली.सामान्य नागरीकापासुन मोठमोठ्या सेलीब्रेटी, नेत्यापर्यंत पर्यंत स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद मिळत असल्याबाबत बोलल्या जात आहे, त्यांना मिडीया द्वारे बरीच प्रसिद्धपण मिळत आहे. पण ज्या महापुरूषांनी आपले पुर्ण जिवण स्वता झाडु घेउन, सतत रस्त्यावर उतरुन, रस्ता साफ करुन स्वच्छतेचा संदेश लोकांना दिला आज त्या महान पुरुषांच नाव भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत डावलल्या जात आहे ही एक शोकांतीका आहे.
                    मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी पण मोठमोठ्या उद्योजकांना, सिनेस्टर, क्रिकेटर व राजकीय नेत्यांना स्वच्छ भारत अभियानामध्ये समाविष्ट होण्याकरीता निमंत्रण पाठवत आहे. ते पण कोणत्याही स्वार्थाशिवाय स्वच्छ भारत अभियानामध्ये समाविष्ट होत आहे अशी चर्चा होत आहे. पण हेच सिनेस्टार, राजकीय नेते, क्रिकेटर, उद्योजक हे रस्त्यावर येतात झाडु हातात घेऊन मिडीया समोर तो झाडु मारतात. व काही वेळानंतर तेथुन निघुन जातात. व हीच काही वेळ केलेली सफाई दिवस भर ईलेक्ट्रानिक्स मिडीयावर झळकत असते. तसेच वृत्तपत्राच्या पहील्यापानावर ती बातमी छापुन येते व काही वेळ कचरा साफ करणार्या त्या व्यक्तींना कितीतरी पटीने मिडीया मोठ करते. पण याच मिडीया वाल्यांना शेतकर्यांच्या होणार्या आत्महत्या, रोज कचरा साफ करणार्या कामगरांना, निस्वार्थीपणे स्वच्छता अभियान राबवणार्या व स्वच्छतेचा संदेश देणार्या व्यक्तींना दाखवयाला मिडीयाजवळ वेळ नाही.
                     माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कचरा नसलेल्या रस्त्यावरची साफसफाई करणार्या व्यक्तींचे कौतुक करतायत हे पण आश्चर्यच आहे, कारण हे सिनेस्टार, राजकीय नेते, क्रिकेटर, उद्योजक स्वच्छ भारत अभियानाला राबवायला काही वेळासाठी नगरामध्ये येतात व काही वेळानंतर तेथुन निघुन जातात. पण या सर्व सेलीब्रिटी येण्याच्या आधी फटाके फोडल्या जातात, गेल्यानंतर पण फटाके फोडल्या जातात त्यामुळे तिथ फटाक्यांचा कचरा, मिनरल वाटर च्या बॉटलचा कचरा असा अनेक प्रकारचा कचरा ती लोक गेल्यानंतर तसाच पडुन राहतो. फटाक्यांच्या आवाजामुळ ध्वनीप्रदुषण पण होते. तसेच त्या सेलिब्रेटींना पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी होत असल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्मान होत आहे.
                       भारत स्वच्छ अभियानामध्ये साध्या गावाच्या सरपंचापासुन मंत्र्यांपर्यंत तसेच अनेक क्षेत्रातील सेलाब्रिटी स्वताची प्रसिद्धी वाढवुन घेण्याचा प्रयत्न करत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी विचारु ईच्छितो आपण नॉमिनेटेड केलेल्या सेलीब्रिटी स्वताच्या घरात झाडु मारण्या करीता मोलकरीण ठेवतात पण ते कधीही झाडु हातात घेत नाही. हे सेलीब्रिटी
स्वताच्या स्वार्थासाठी, स्वताला आणखीन प्रसिद्धी मिळवुन देण्याकरता स्वच्छ भारत अभियानामध्ये सामिल होत आहे. जर ते निस्वार्थीपणे भारत स्वच्छ अभियानामध्ये सामिल होउ ईच्छित असते तर ते कोणताही गाजावाजा न करता , कोणत्याही मिडीयाला न सांगता त्यांनी रस्त्यावर झाडु मारला असता व हा स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्रम आपल्या व्यस्त जिवणातील थोडा वेळ काढुन नित्यक्रमाप्रमाने राबविला असता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरच जर स्वच्छ भारत अभियान यशस्वी करायच असेल तर त्यांनी त्या लोकांच्या नावाचा सत्कार करायला हवा ज्यांना कोणत्याही प्रसिद्धीची हाव नाही व जे नेहमी नित्यक्रमाने रस्ते, गल्ली साफ करतात व कमीत कमी आपल घर व परिसर स्वच्छ ठेवतात कारण प्रत्येकाने आपल घर सुधारल तर आपला देशच नव्हे तर जग सुधारु लागते..............

(ह्या पोस्टमधील फोटो  इंटरनेट वरुन घेतलेला आहे)संजय राजु कोकरे
रा.अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो.नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com
Blog: Sanjaykokre.blogspot.com

Saturday, November 1, 2014

महाराष्ट्रमध्ये मराठी माणसाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय?...                     "महाराष्ट्र" हे अनेक महान संताच्या चरनांच्या धुळीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेले मराठी माणसांचे एक महान राज्य. पण आज महाराष्ट्राकडे बघितले की महाराष्ट्र हे खरीच मराठी माणसाच राज्य आहे का? हा एक मोठा प्रश्न निर्मान होतो. भारतामधील कोणत्याही प्रांतात राहणार्या व्यक्तीला दुसर्या कोणत्याही प्रांतात वास्तव्य करण्याचा अधिकार आहे, हे आम्हालाही मान्य आहे. पण जो माणुस ज्या राज्यामध्ये जन्माला आला, ज्याच्या वाडवडीलांचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा आहे तरी त्या मराठी माणसाला जिवण जगण्याकरता त्याच्याच जन्मस्थान असलेल्या राज्यामध्ये प्रथम प्राधान्य नसावे हे कुठपत योग्य आहे.
                    महाराष्ट्रामध्ये अनेक दुसर्या राज्यातील लोक येउन व्यवसाय करत आहे व एक आनंदी जिवण जगत आहेत, मराठी माणसाचा त्याला नक्कीच विरोध नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये आलेल्या परप्रांतीय लोकांसाठी मराठी माणसाचा काहीही विरोध नाही हे खरे असले तरी पण महाराष्ट्रामध्ये राहुन महाराष्ट्रीयन असल्याचा ते अभिमान बाळगत नसतील तर त्याचा तितकाच तिरस्कार मराठी माणसाला असेल. महाराष्ट्रामध्ये कोणीही हिंदु नाही तर मुसलमानही नाही, महाराष्ट्र राज्यामध्ये राहणार्या माणसाचा धर्म आणि जात ही मराठी आहे. महाराष्ट्राला मुंबई मिळावी म्हणुन १०० हुन अधिक लोकांनी बलीदान दिले आहे, तेव्हा कुठे मराठी माणसाची मुंबई ही महाराष्ट्राला म्हणजेच मराठी माणसाला मिळाली. परंतु या मुंबई मध्ये आज अनेक परप्रांतीयांचे लोंढेचे लोंढे येत आहे, या लोंढ्याच्या गर्दीमध्ये मराठी माणुस हरवुन गेलेला दिसत आहे. मुंबई मराठी माणसाची हे परप्रांतीय लोंढे मानायलाच तयार नाही, कारण मराठी माणसाला गुलामगिरीची सवय झालेली आहे असा समज परप्रांतीय लोंढ्याचा झालेला दिसत आहे. परंतु मराठी माणुस शांत आहे पण षंढ नाही हे ही त्या परप्रांतीयांनी लक्षात घ्यायला हवे.
                   मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणार्या अनेक संघटना, राजकीय पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. मराठी माणसाच्या हक्कांच्या विषयावर अनेक पक्षांनी मतासाठी राजकारण केल. परंतु ते पक्ष मात्र या विषयावर पुर्णपणे यशस्वी झाले आहेत असे अजुन तरी दिसत नाही आहे. महाराष्ट्रामधील "मुबई मध्ये काय व्यवसाय करता? मुबंई मध्ये ट्राफीकजाम मध्येच तुमचा बराच वेळ वाया जातो, तुम्ही आमच्या राज्यात या आम्ही तुम्हाला अधिक चांगल्या सुविधा पुरवु " हे वाक्य आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीपुर्वी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वापरलेले. आमच्याच राज्यात येऊन, आमच्याच राज्यात गुंतवणुक करणार्या उद्योजकांना फुस लावुन पळवण्याचा प्रयत्न दुसर्या राज्याचा मुख्यमंत्री करतो तरी कसा? हा ही एक मोठा प्रश्न निर्मान होत आहे.
                    मराठी माणसाची अस्मिता महाराष्ट्रामध्ये कमी होताना दिसतेय तरीही मराठी माणुस हे सर्व कस काय सहन करतोय?, हा संशोधनाचा विषय बनला आहे. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार ? महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये कोण असणार? हे सर्व दुसर्या राज्यामध्ये राहणारे नेते ठरवत होते व ठरवत पण आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोण राहणार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार ? हे मराठी माणुस का ठरवु शकत नाही, मराठी माणसाची बुद्धी एवढी षंढ झाली आहे का? की ती षंढ करण्याचा प्रयत्न परप्रांतीय लोक करतायत. ? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री जरी मराठी माणुस असला तरी महाराष्ट्रामधील कोणतेही निर्णय घेण्याकरता त्याला दिल्ली कडेच का पाहावे लागते? हा ही एक मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रामधील कोणताही निर्णय घेताना दिल्लीकडे बघावे लागणार नाही तर महाराष्ट्राच्या जनतेकडेच बघावे लागेल. असे सरकार महाराष्ट्रामध्ये कधी तरी येईल का?. हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
                  महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या प्रत्येक प्रश्नावर आक्रमक राहणार्या राज ठाकरे व उद्दव ठाकरे यांना मराठी माणसाच्या हिताकरता राजकीय स्वार्थ सोडुन एकत्र येण्यास काय हरकत आहे? हे माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या समजण्या पलीकडे आहे. मराठी माणसाला या दोघांकडुन बर्याच प्रमाणात अपेक्षा आहे, या दोघांच्या भांडणामध्ये मराठी माणसाचे मतांतर होउन मराठी माणसाचेच नुकसान होत आहे व परप्रांतीय समाजाचे लोक हे आपल्या मराठी माणसांमध्ये फुट पाडुन महाराष्ट्रावर राज्य करण्याचे स्वप्न पाहतो आहे व आपल्याच माणसाला हाताशी धरुन तो राज्य करताना पण दिसत आहे. महाराष्ट्रामधील मराठी लोकांच्या अस्मितेला असणारा धोका टाळण्यासाठी मराठी माणसाला आपसातील भांडणे विसरुन एकत्र यावेच लागेल व मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये अस सरकार आणावे लागेल की ज्याचा मुख्यमंत्री कोण्या दिल्लीवरुन नाही तर महाराष्ट्राच्या एखाद्या शहरामधुन, गावामधुन किंवा गल्लीमधुन ठरवला जाईल .......

(ह्या पोस्टमधील फोटो हा इंटरनेटवरुन  घेतला आहे)


प्रती,
          मा. संपादक साहेब,
          दैनिक __________
                    आपल्या लोकप्रिय दैनिकातुन हा अग्रलेख प्रसिद्घ करावा ही विनंती.


संजय राजु कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 09561730189
Email Id: S.r.kokare1992@gmail.com
Blog: Www.sanjaykokre.blogspot.com

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...