Popular Posts

Saturday, September 19, 2015

शेतकरी....

आभाळालाही रडु आल आता
पाहुन  आमची ही दुर्दशा !
 आम्हाला ही विचार पडला आमच्या या
अवस्थेवर रडाव की लोकांना दाखवावा हशा !!

कित्येक जण आतापर्यंत मेले
या शेतीच्या कर्जापायी!
पिक पिकवासाठी कर्ज घेतो आम्ही पण कर्ज
भरण्यासाठी पिकच आमच्या जवळ येत नाही!!

सरकार आमच्या मयतीची प्रचार सभा करते न
करते पदयात्रा आमच्या मयतीच्या गर्दीची!
म्हणुन त्यांना अस वाटत नाही थांबाव आमच
मरण अन् बंद करावी वाट आपल्या प्रसिद्धीची!!

आमचे बिन बापाची पोर बसतात
दिवाळीच्या,दसर्याच्या दिवशीही घराच्या बाहेर उपाशी पोटी!
अन धनधागड्यांची पोर
मस्त खात राहतात तुप रोटी.!!

पण लक्षात ठेवा जेव्हा शेतकरी
शेती करण बंद करेल!
त्या दिवशी शेतकरी नव्हे तर
अख्ख जगच उपाशी मरेल!!
अख्ख जगच उपाशी मरेल!!


संजय रा. कोकरे
अमरावती
मो.नं. 9561730189

Wednesday, September 2, 2015

शेतकर्याईचा कोणी वाली नसते..



                 गण्या  न राम्या बोलत बसले होते. दोघायच्या चेहर्यावरुन लयच गंभीर दिसुन राह्यले होते. तेवढ्यात राम्या गण्यासोबत बोलाले पुढे येते.
         राम्या: काय राज्या गण्या मले महीत पडले की कांद्याचे भाव एंशी रुपय किलोच्या वर गेले.
         गण्या: हाव ना राज्या. अन कांद्याचे भाव कमी कराईसाठी सरकारन परदेशाहुन कांदा बलावला म्हणते राज्या. कांदा लई माग झाला राज्या म्या त खान च सोडुन देल्ला कांदा..
        राम्या: पण गण्या म्या वावरात कांदा घेतला. तो म्या बाजारात आणला अन् राज्या तीन रुपय किलो च भाव आला. माये कांद्याचे पिकासाठी लागलेले पैसही नही लिगाले राज्या.
       गण्या: राम्या तसच असत बे ते जोपर्यंत आपल्या शेतकर्याच पिक आपल्या जवळ असते ना तो पर्यंत आपल्या पिकाले भावच नसते.
        राम्या: गण्या अस कौन होत रे हे?
        गण्या:  काय होते राम्या आपल्या शेतकर्याजवळ पैसे नसते. म्हणुन आपन नही काय आपल्या जवळ असलेल पिक आपण आल्या त्या  भावात विकुन टाकतो.  पण आपल्या जवळुन माल विकत घेणारे काय करते तो माल नही काय जमा करुन ठेवते. अन बाजारात क्रुतिम तुटवडा निर्मान करते.
        राम्या: त्यान काय होत बे मग?
        गण्या: बाजारात त्या मालाचा तुडवडा झाल्यान त्या मालाची मागणी वाढते पन बाजारात तो माल च नसते. मग त्याचे भाव वाढते..
         राम्या: मग?
         गण्या: एकडाव काय भाव वाढला का हे लोक आपला माल धिरेधिरे बाहेर काढते अन् आपल्या शेतकर्याच्या पिकावर कैक पटीने नफा कमवते.
          राम्या: आता माह्या लक्षात आल आपला माल विकाच्या पहीले भाव कौन कमी असते अन् माल विकल्यावर कसा भाव जास्त असते ते.
         गण्या: आला न लक्षात म्हणुनच लोक म्हणते " शेतकर्याईचा कोनी वाली नसते"


संजय राजु कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email Id: S.r.kokare1992@gmail.com

Monday, August 24, 2015

निरागस प्रेम...




   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. असच काही प्रेमाच नात त्याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये होत . ते दोघही अवघ्या दहाव्या वर्गामध्ये शिकत होते. वय जेमतेम १६-१७ वर्ष.ह्या निरागस वयामध्ये कोण आपल आणि कोण दुसर हे ही सहजासहजी कळतही नसत. दोघही एकाच वर्गात शिकत असताना सुद्धा एकमेकांना ओळखत नव्हते. शाळेच्याच एका कार्यक्रमामध्ये दोघांचीही ओळख झाली. ती ओळख पुढे वाढतच गेली, पुस्तकांची देवाणघेवाण होऊ लागली , अनेक विषयावर चर्चा होउ लागली. यातुनच त्यांची मैत्री ही अधिकच घट्ट होत होत गेली .एकमेकांची मोबाईल नंबर पण त्यांनी शेअर करुन घरच्यांच्या लपुनछपुन ते एकमेकांसोबत बोलु लागली ,वर्गातील मुल-मुली पण त्या दोघाच्याबाबत आपपसात चर्चा करु लागली. त्या दोघांची मैत्री ही प्रेमात रुपांतर कधी झाली हे त्या दोघांना कळलच नाही.
                  ती दोघ आता जिवणातील अविस्मरणीय क्षण जगत होती त्यांना माहीत होत व ही क्षण पुन्हा येणार नाही त्यामुळे बिंधास्त अस जिवण जगत होती. त्यांना जगाची काहीही पर्वा नव्हती , कोण आपल्याबाबत चर्चा करत आहे, कोण आपली टिंगल उडवत आहे आणि कोण आपल्या मागावर आहे याची काहीही चिंता त्या दोघांनाही नव्हती ती दोघ फक्त प्रेम करु इच्छित होती. पण हे प्रेम हे अत्यंत निरागस, निस्वार्थी प्रेम होत या या प्रेमामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता. जणु प्रेम म्हणजे देवाकडुन मिळालेली देण अश्याच प्रकारे ती दोघही जिवण जगत होती परंतु या प्रेमाचा परिणाम त्यांच्या शिक्षनावर काय होणार , त्याच्या जिवणावर काय होणार याबाबत विचार करायला दोघही तयार नव्हती कारण दोघही एकंमेकांच्या प्रेमात आकंठ डुबायला लागली होते. परंतु समाजात निरागस अस्या प्रेमाला जागा नसते अस म्हणतात.
                    म्हणुनच काय तर या दोघांच्या प्रेमाची बातमी ही मुलीच्या घरी पोहचली. ती बातमी पोहचल्यानंतर मुलीच्या घरचे अत्यंत संतप्त झाले. तो मुलगा असलेल्या ठीकाणी ते मुलीचे कुटुंबीय आले , त्त्यांनी मुलाला जवळ बोलावले. तो मुलगा त्यांच्या जवळ गेला व आपण कोण आहात म्हणुन विचारु लागला. त्या प्रश्नाच उत्तर देण्याऐवजी मुलीच्या कुटुबियांनी त्याच्या कानाखाली एक जोरात चपराक लगावली. त्याने मी काय केल म्हणुन विचारल तेव्हा त्याला ते त्या मुलींचे कुटुबिय असल्याचे कळले. त्याची खुप घाबरगुंडी उडाली, त्याला रडु कोसळल , त्याने त्यांची माफी मागण्याचा प्रतत्न केला. पण त्याची बाजु ऐकुन घेण्याच्या मनस्थितीमध्ये कोणीही नव्हते, सर्व जण त्याच्यावर तुटुन पडले व त्यावा लाथा बुक्क्यांनी मारु लागले. तो रडत होता , गयावया करत होता, सोडा मला सोडा म्हणुन ओरडत होता पण त्या निर्दयी लोकांना त्या गयावया करण, रडण, मला माफ करा मला सोडुन द्या यापुढे असे होणार नाही असे ओरडत होते यातील एकही शब्द ऐकु येत नव्हता.
                      काही वेळानंतर त्याची मार खाण्याची क्षमता संपली व तो बेशुद्ध होउन त्या रस्त्यावर पडला. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला रस्त्यावर तसेच सोडुन मुलीचे ते कुटुंबीय आपल्या घरी निघुन गेले. तो १६-१७ वर्षाचा निरागस मुलगा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता पण त्याला उचलायला कोणही समोर आल नाही. काही वेळाने त्या मुलांच्या कुटुंबियांना माहीती पडल व त्यांनी त्या मुलाला उचलुन दवाखाण्यात नेल. मुलांच्या कुटुंबिय पण त्या मुलींच्या कुटुबियाना मारायला निघाले पण त्या मुलाच्या वडीलांनी त्यांना थांबवल. व झाल ते झाल पण आता हे प्रकरण आपल्याला वाढवायच नाही आहे कारण हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहचल्यास माझ्या मुलाच जिवण हे उद्वस्त होउ शकत म्हणुन आपल्या शांत राहायच आहे. पण मुलींच्या कुटुबियांनी हा विषय इथेच बंद न करता त्या मुलीचे शिक्षन सोडवले व त्या मुलीवर अनेक निर्बंघ लादल्या गेले. व त्यानंतर कधीही त्या मुलाची व मुलीची भेट झाली नाही.........
                    या निरागस, निस्वार्थी प्रेमाचा असा शेवट का झाला की त्या मुलाला दवाखान्यात अति दक्षता कक्षा मध्ये रहाव लागल, मुलीला आपल्या हक्काच्या शिक्षनापासुन मुकाव लागल. आजचे पालक एवढे निर्दयी आहेत का ? की ते एखाद्या १६-१७ वर्षाच्या मुलाला एवढ बेदम मारहान करु शकतात , आपल्या स्वताच्या मुलीला शिक्षण सोडण्यास कारणीभुत ठरु शकतात , आपल्या मुलीवर अनेक निर्बंध घालु शकतात....
खर तर हा प्रश्न दोघांनाही समजुत देउन, शिक्षकांना त्यांच्यावर लक्ष ठेवायला लावुन, किंवा दोन्ही कुटुंबियांनी आपपल्या मुलांना समज देउन, प्रेमळ अशी दमदाटी करुन सोडविता आला पण हा प्रश्न सोडवण्या करीता जो काही मार्ग अवलंबविला गेला तो दोन निरागस मुलांच्या जिवणाचा अस्त ठरला. आपला समाज हा अत्याधुनिक जगाबरोबर जगतो आहे की तो आजही सोळाव्या सतराव्या शतकात जगत आहे हा मोठा प्रश्न आहे.......



संजय राजु कोकरे
अमरावती
मो. नं. 9561730189
Blog: Www.sanjaykokre.blogspot.com


Sunday, August 23, 2015

आपले लिखान पाठवा...

कृपया तज्ञ, लेखक, अभ्यासु व्यक्तींनी आपले लेख असल्यास आम्हाला नक्की पाठवा. प्रसिद्दी योग्य मजकुराला आम्ही तुमच्या नावासहीत आमच्या ब्लाग वर प्रसिद्ध करु...

साहीत्य पाठविण्याकरिता आपण संपर्क फार्म चा उपयोग कर शकता किंवा Email: S.r.kokare1992@gmail.com या इमेल पत्त्यावर पाठवु शकता...

Saturday, August 22, 2015

नेत्याईसाठी बी CET चालु कराले पाहीजे....


   गण्या रस्त्यान चालला होता तेवढ्यात त्याले राम्या येताना दिसते,
   गण्या: कुठ चाल्ला बे!
   राम्या: कुठ नइ मयी CET ची परिक्षा आहे न त्याचेच पुस्तक आणाले चाल्लो.
   गण्या: अबे राम्या हे CET म्हणजे काय होते रे!
   राम्या: काय राजा गण्या तुले CET  म्हणजे काय महीत नही काय, अबे माय d.ed. झाल न् झाल नोकर्याच संपल्या राज्या मग सरकारन पात्रता परिक्षा ठेवली हुशार तपासुन नोकरी लावासाठी त्याच परिक्षाले राज्या CET म्हणते.
   गण्या: हुशार पोरं तपासुन लावा साठी हे पात्रता परिक्षा होय मग? काय रे मग तु कायले चाल्ला मग तिथ?
   राम्या: तुले मघाशीच त् सांगतल ना बे CET ची परिक्षा द्यायाची हाय म्हणुन त्याइचे पुस्तक आणाले चाल्लो म्हणुन
   गण्या: नइ ते बरोबर हाय तुय, पण हे CET परिक्षा त् हुशार पोर तपासुन लावते ना मग तु कायले चाल्ला बे ते परिक्षा द्याअले.
   राम्या: काय राज्या मले डायरेक्ट बह्याड म्हणुन राह्यला तु!
   गण्या: मजाक करुन राह्यलो ना बे तुई. आता तुई मजाक नई कराव त कोणाची कराव राज्या.
  राम्या: थे बी बरोबर हाय म्हणा, आपलेले अशेच मजाक करत दिवस काढा लागते.
  गण्या: काय बे राम्या ह्या आमदारायसाठी, खासदारायसाठी कोण नई बे CET ठेवत हे सरकार
  राम्या: त्यान काय हुयीन बे,
  गण्या: ह्या नेत्याइतल्या बह्याडाईले बाहेर काढुन हुशारायीले शोधुन आमदार, खासदार तरी करता येइन बे
   राम्या: बरोबर हाय तुय! पण नेमक त्यान काय हुयीन.
   गण्या: जस बह्याड पोराईतले हुशार पोर ले पारखुन चांगला मास्तर तयार करते हे सरकार, तसच मग ह्या नेताईतले बह्याड नेत्याइले बाहेर काढुन हुशार नेत्याले आमदारकी, खासदारकी उभ करता ईन मग आपला देश बी लई पुढ जईन राज्या.
   राम्या: खर बोलला राज्या तु गण्या....


संजय  कोकरे
9561730189
Www.sanjaykokre.blogspot.com

Sunday, August 16, 2015

जमिण अधिग्रहण कायदा...

जमिन अधिग्रहण कायदा.......

                   सध्या देशाच्या राजकारणामध्ये भुमिअधिग्रहण कायद्या बाबत चर्चेला विधान आले आहे. जमिन अधिग्रहन  म्हणजे देशाच्या, राज्याच्या विविध विभागातील पायाभुत आणि आर्थव्यवस्थेच्या समृद्धीसाठी जमिन ताब्यात घेण्याची प्रकीया होय. पण ह्या मध्ये जमिन अधिग्रहीत करते वेळी जमिन मालकाला योग्य तो मोबदला मिळलेच अस नाही. २०१३ या वर्षाअगोदर अधिग्रहीत करण्यात येण्यार्या जमिनी ह्या भारतात लागु असणार्या " जमिन अधिग्रहन कायदा १८९४" या  वसाहतवादी ब्रिटीष राजवटीमध्ये तयार  या आलेल्या कायद्या प्रमाने करण्यात येत होत्या. या कायदानुसार सार्वजनिक हेतु साठी   खाजगी जमिन सरकार किंवा कंपनी यांना अधिग्रहीत करण्याचा अधिकार होता. या कायद्यामध्ये स्वातंत्रयोत्तर काळामध्ये बदलत्या स्वरुपानुसार वेळोवेळी बदल केले गेले परंतु  जमिन अधिग्रहन करण्याची पद्धत मात्र इग्रजांच्या काळात होती तशीच राहली.
                     संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने जमिन अधिग्रहन पुनर्स्थापन, पुनर्वसन, पारदर्शकता आणि योग्य हक्क मिळण्याचा हक्क, कायदा २०१३ (The right to fair compensation and transparency   in land acquisition, Rehabilitation and resettlement act 2013) २९ आगस्ट २०१३ ला लोकसभेत मंजुर करण्यात आला. आणि त्यानंतर लगेच म्हणजे सहा दिवसांनी ४ सप्टेबंर २०१३ ला राज्यसभेने मंजुर करुन हा कायदा १ जानेवारी २०१४ ला भारतामध्ये लागु झाला. या कायद्यामध्ये जमिन अधिग्रहीत करण्यासाठी खालील तरतुदी केलेल्या आहेत..
      या कायद्या नुसार जमिन अधिग्रहण होत असणार्या जमिन मालकाला ग्रामीन भागात बाजारभावाच्या चार पट तर शहरी भागात बाजारभावाच्या दोन पट देण्यात येत असे.
    जमिन अधिग्रहीत केल्यानंतर जमिनाचा  वापर न केल्यास किंवा जमिन तशीच पडुन राहल्यास ती जमिन जमिन मालकाला किंवा राज्य भु बँकेला परत करण्याची तरतुद करण्यात आली आहे.
     जमिन अधिग्रहीत करण्यात आल्यामुळे जमिनवरील उत्पन्न कर किंवा मुद्रांक शुल्क लागु होणार नाही.
      जमिन मालकालाच नाही तर जमिनी वर ज्यांची ज्यांची उपजिवेकी अवलंबुन आहे त्या सर्वांना नुकसान भरपाईची तरतुद या कायद्या मध्ये आहे.
      राखीव क्षेत्रातील जमिन ही ग्रामसभेची मान्यता मिळेपर्यंत ताब्यात घेता येणार नाही.
     जोपर्यंत पुनस्थापना आणि पर्यायी जागा किंवा पुर्ण मोबदला जमिन मालकास मिळणार नाही तोपर्यंत अधिग्रहीत जमिनीवरुन कोणालाही काढता येणार नाही.
     प्रत्येक प्रकल्पामध्ये भुमिहीन होणारे आणि अनुसचित जाती, जमाती यांच्या  मालकीची जमिन अधीग्रहीत होत असेल तर त्यांना तेवढी जमिन किंवा दोन आणि अर्धा एकर यापेक्षा जी कमी आहे ती दिली जाईल.
    खाजगी सार्वजनिक प्रकल्पांसाठी ७० % किंवा खाजगी कंपनीसाठी ८० %  जमीन अधिग्रहीत करण्यासाठी जमिन मालकाची परवानगी हवी.
                    परंतु नविन लोकशाही आघाडी (NDA) सरकाने ३१ डिसेंबर २०१४ रोजी अध्यादेश काढुन २०१३ ला आलेल्या कायद्यामध्ये काही बदल केलेले आहेत.
लोकशाही आघाडी सरकारने पुढील प्रमाने काही बदल केलेले आहेत.
    अध्यादेशाने सहमतीची गरज, तद्न्याकडुन परिक्षन, सामाजिक परिणाम मुल्यांकन , बहुपिक शेत जमिन या बाबी  विशेष वर्गवारी प्रकल्प कलम १० अंतर्गत निर्मान करुन वगळण्यात आल्या.
या प्रकल्पामध्ये १.ग्रामीन पायाभुत क्षेत्र २.सरंक्षन ३. औद्योगिक मार्गिका  ४. परवडणारी गृह ५. पायाभुत प्रकल्प - सार्वजनिक-खाजगी भागीदारीसह यामध्ये जमिन अधिग्रहीत असताना वर उल्लेख केलेल्या तरतुदी लागु नसतील.
    अधिग्रहीत केलेली जमिन ही पाच वर्षापासुन जर विना वापर पडलेली असेल तर ती  पाच वर्षानंतर किंवा प्रकल्प स्थापन करत असताना  ठरवलेलेली कालमर्यादा या पेक्षा जी नंतर ची असेल  असा बदल करण्यात आला असुन त्यानंतर ती जमिन मुळ मालकाला किंवा भु बँके मध्ये जमा करण्यात येईल.
    जमिन अधिग्रहन कायदा २०१३ मधुन विशिष्ट अशा १३ कायद्यांना सुट देण्यात आली होती . कायदा लागु झाल्यापासुन एका वर्षाच्या आत सुट देण्यात आलेल्या कायद्यांना  २०१३च्या कायद्यानुसार जमिन अधिग्रहीणाच्या बाबतीत मोबदला, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना  या तरतुदी लागु कराव्यात ही तरतुद होती. परंतु २०१५ च्या अध्यादेशाने हे सुट देण्यात आलेले १३  कायदे वगळण्यात आले आहे.
    १८९४ भुमि अधिग्रहण या कायद्यानुसार  अधिग्रहीत केलेल्या एखाद्या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा किंवा मोबदला दिला गेला नसेल तर कायद्याच्या तरतुदी त्या जमिनी साठी लागु होतात जर ती जमिन ही २०१३ चा कायदा पारित होण्याच्या पाच वर्ष अगोदर अधिग्रहीत झाली असेल.
    जमिन अधिग्रहनाच्या ऐवजी पर्यायी व्यवस्था म्हणुन जमिन ही ठराविक मुदतीच्या कराराने देण्यात यावी किंवा तिथे जमिन अधिग्रहीत केलेल्या जमिनीमध्ये किंवा तेथे निर्मान होणार्या प्रकल्पामध्ये फायद्यामध्ये जमिन मालकाला काही विशेष टक्के वाटा देण्यात यावा.
             
संदर्भ :( राजपथ टाईम्स जुलै २०१५)

Saturday, August 15, 2015

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
विचारांचं स्वातंत्र्य ,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात आपल्या महान राष्ट्राला..

धनगर समाजाच्या आरक्षन विषयक प्रश्नाबाबत युती सरकार उदासिन...


                 धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षन लागु करण्याचे आश्वासन युती सरकारने विधानसभा निवडणुकी अगोदर धनगर समाजाला दिल. हेच आश्वासन भाजपाने आपल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पण जाहीर केल होत. त्यामुळेच धनगर समाजाने भरघोस असे मतदान  भाजपा च्या उमेदवारांना केल. त्यामुळचे राज्यात सत्तांत्तर होउन युती सरकार सत्तेत आल. पण आज या युती सरकारला सत्तेत येउन दहा महीण्यापेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी भाजपा सरकारला धनगर समाजाला आश्वासना देण्या खेरीज दुसर काहीही देता आलेल नाही. त्यामुळे युती सरकारला धनगर समाजाचा विधानसभा निवडणुकीनंतर विसर पडला की काय? हा प्रश्न जनसामान्यांसाठी संशोधनाचा विषय ठरला आहे.
                धनगर समाजातील १६ शिलेदार ज्या वेळेस बारामतीला उपोषनास बसले होते त्या वेळेस  त्यावेळेसच भाजपा प्रदेशाध्यक्ष व आजचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ह्यांनी स्वता जाउन भाजपाची सत्ता महाराष्ट्रात आल्यास धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवु अस आश्वासन दिल होत. तसेच ४ जानेवारीला सपन्न झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्या मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी महाधिवक्ता यांच्यासोबत चर्चा करुन धनगर समाजाचा प्रश्न हा १५ दिवसाच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करु असे जाहीर आश्वासन दिले होते.
                   परंतु मा. मुख्यमंत्री साहेंबांनी धनगर समाजाच्या नागपुर मेळाव्यामध्य दिलेल्या जाहीर आश्वासनाला आज ६-७ महीने झाल्यानंतरही धनगर समाजाच्या आरक्षनाबाबत कोणताही निर्णय झालेला दिसत नाही आहे. त्यामुळे एका भोळ्याभाबड्या समाजाला फक्त आश्वासन देत त्या समाजाची युती सरकार फसवणुक तर करु पाहत नाही आहे ना ? हा प्रश्न जनसामान्याच्या मनात निर्मान होत आहे. कारण हा प्रश्न फक्त धनगर समाजाचाच नसुन युती सरकार वर विश्वास ठेवणार्या महाराष्ट्रातील सर्वच समाजाचा असल्यामुळे धनगर समाजाला आतापर्यंत न्याय मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वच समाजाचा युती सरकार वरील असंतोष वाढीस जात आहे याची दक्षता युती सरकारने घ्यायला हवी.
                   धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनाच्या प्रश्नाबाबत विरोधी पक्ष हा सकारात्मक दिसत असुन त्यांनी हा प्रश्न विधानसभेत अनेक वेळा उपस्थित केलेला आहे.  त्यामुळे धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनाचा प्रश्न  सत्ताधारी पक्ष सोडवण्यास विलंब का करत आहे ? हा जनसामान्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षन विषयक प्रश्नाबाबत बीजेपी सरकार खरेच सकारात्मक आहे की फक्त वेळकाढु धोरण राबवुन धनगर समाजाची फसवणुक करु पाहत आहे ? या बाबत धनगर समाजाने वेळीच चिंतन करुन वेळीच सावधान भुमिका घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन धनगर समाज आपली फसवणुक होण्याची शक्यता असेल तर आपला त्यापासुन बचाव करु शकेल अशी  आशा महाराष्ट्रातील सामान्य जनता बाळगु लागली आहे....

लेखक:👇👇👇
संजय रा कोकरे
अमरावती
मो.नं: 9561730189
Www.sanjaykokre.blogspot.com
तुम्ही मला twitter ला फोलो करु शकता.
Www.twitter.com/kokaresanjay
🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚

Tuesday, January 27, 2015

तुझ्याशिवाय.......


-----------------------------------------------------
बघितल नाही तुला दिवसातुन एकदातरी,
दिवस माझा सुरेख जात नाही!!
दिसताच क्षनी तु माझ्या,
मनामधील आनंदाला पारा उरत नाही!!

येते तु जेव्हा माझ्यासमोर,
मुखातुन एकही शब्द निघत नाही!!
खुप काही बोलायच असत तुझ्यासोबत,
पण तुझ्यासोबत मी काहीच बोलु शकत नाही!!

अनेकदा लपुनछपुन पाहतो मी तुला,
पण भान असत की तुला मी दिसणार नाही!!
माझे मित्र देतात तुझ्यानावाने हाक मला
तरीही तुला पाहील्याशिवाय मी राहु शकत नाही!!

कळत नकळत मी तुझ्या सुख दुखात,
सहभागी झाल्या शिवाय राहत नाही!!
झाली एखादातरी चुक तुझ्या कडुन,
मिळालेल्या शिक्षेच्यारुपात मी तुला पाहु शकत नाही!!

का? कोणास? ठाउक तुला मिळालेली शिक्षा मी,
माझ्यावर अवलंबल्याशिवाय राहत नाही!!
प्रेम म्हणजे काय हे मला माहीत नाही पण,
तुझ्याशिवाय मी या जगात जगु शकत नाही!!

म्हणुनच की काय हा कठोर ईश्वर,
मला तु भेटु देत नाही!!
आणि आली तु माझ्यासमोर तर,
माझ्यामुखातुन एकही शब्द निघु देत नाही!!

पण तरीही ईश्वराला तुझ्याशिवाय,
इतर मागण मी मागणार नाही!!
नाही मिळालीस मला तु तरीही तुझ्या सुखासाठी,
ईश्वराला प्राथना करण्याचे मी विसरणार नाही!!
-----------------------------------------------------
कवि.....
संजय रा. कोकरे
मो.नं. 9561730189
---------------------------------------------------

Sunday, January 11, 2015

नवी क्रांती घडवायची आम्हाला

हवी आमच्या हक्काची भाकर,
नकोय तुमची भिक आम्हाला !!
हवय आमच्या मेहनतीच मोल,
नकोय लाखोचे दान आम्हाला !!

हवय शेतीला चांगल बी बियाणे,
नकोय तुमची आश्वासने आम्हाला !!
हवाय पिकाला योग्य हमीभाव,
नको नावापुरत पॅकेज आम्हाला !!

भरायच पोट आम्हा जगातील प्रत्येकाच,
कारण जगाची काळजी आहे आम्हाला !!
करायच भारताच नाव मोठ,
नका करु डिवचण्याचा प्रयत्न आम्हाला !!

आम्ही नाही करणार आत्महत्या,
कारण मुलाबाळासाठी जगायच आम्हाला !!
आमची नका करु काळजी तुम्ही,
कारण नवी क्रांती घडवायची आम्हाला !!
—————————————————
————————————————— 

@@ कवी @@
संजय रा. कोकरे
अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com
—————————————————

"युवकाच्या देशात युवकांच्या समस्या....."

                              " ये देश युवाओ का है " हे वाक्य वेगवेगळ्या भाषातुन वेगवेगळ्या नेत्याच्या मुखातुन वेगवेगळ्या रितीने ऐकायला मिळत. आम्ही ही मान्य करतो की हा देश युवकांचा आहे, जगाचा विचार केला तर सर्वात जास्त युवकांची संख्या ही भारतातच आहे त्यामुळे भारताला युवकांचा देश म्हटल तर ते उचितच होईल. मग ज्या देशात सर्वात जास्त युवकांची संख्या आहे तो देश या जगाच्या स्पर्धेत मागे राहतो तरी कसा ? या प्रश्नाचा विचार केला का आपण कधी. आणि जर या प्रश्नाचा विचार आपण केला नसेल तर आपण आपल्या देशाच्या विचारांबाबत एवढे षंढ कसे काय असु शकतो..
                            " देशाकरीता युवकांनी आपल काहीतरी योगदान दिल पाहीजे जेणेकरुन हा देश यशाची सर्वांत मोठी उंची गाठु शकेल" हे ही वाक्य बर्याच नेत्याच्या मुखातुन ऐकायला मिळत. युवकांनी आपल्या देशासाठी, देशाच्या विकासासाठी काहीतरी करण हे त्यांच परम कर्तव्यच आहे आणि युवक हे आपल्यापरिने आपल कर्तव्य चांगल्या रितीने पार पाडण्याचा प्रयत्न करतील यात मात्र कवडीमात्र शंका नाही. पण युवांना या देशासाठी काहीतरी करण्यासाठी शासनाची साथ लाभते तरी काय? हा एक मोठा प्रश्न जनसामान्यांकडुन विचारला जात आहे. युवकांना रोजगाराच्या, देशसेवेच्या वेगवेगळ्या संध्या उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. परंतु सध्यातरी शासन यात यशस्वी होताना दिसत नाही आहे.
                            आज भारतात एक वेगळच चित्र पाहावयास मिळत आहे. युवक हे बरोजगारीच्या अंधारात ओढले जात आहे. ज्यामुळे युवकांना आपल्या कुटुंबासाठी , देश्यासाठी काहीही करता येत नाही या चिंतेतुन युवकांना अनेक मानसिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. आणि यामुळेच की काय आजचा तरुन वाईट मार्गांनी भरकटत आहे. कोणी मध्यपान, वेगवेगळ्या प्रकारची नशा करुन मानसिक त्रास दुर करु पाहत आहे तर कोणी मटका वरली, जुगार खेळुन आपल्या कुटुंबासाठी पैसा कमविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण या भरकटलेल्या तरुनांना कळत नाही आहे की ते हे सारे उद्योग करुन आपल व आपल्या कुटुंबाच जिवण उद्धस्त करत आहे. आणि आमच्या भारत देशाच भवितव्य अंधारात ढकलत आहे कारण आजचे युवक हा उद्याच भारताच भविष्य आहे.
                           दारु, घुटका, सिगारेट, तंबाखु हे जिवणासाठी विष आहे सर्वांनाच माहीत आहे. या सर्वांमुळे खुप सारे मोठे आजार होतात याची जाणीव सरकारलासुद्धा आहे म्हणुनच की काय सरकारने "तंबाखु सेहत के लिए हानीकारक है" ही सुचना गुटका, सिगारेट, तबाखु च्या पॅकेटवर देण्यास सुरु केली. पण या वस्तुंवर बंदी आणण सरकारला योग्य वाटल नाही किंवा ती तसदी शासनाने घेतली नाही आहे. ज्या वस्तुमुळे आपल्या समाजाच आरोग्य धोक्यात येत आहे, देशाच भवितव्य असणार्या तरुणांच आयुष्य पोखरुन निघत आहे. थोडासा आर्थिक तोटा सहन करुन देशाच्या उज्वल भविष्यासाठी अश्या वस्तुंवर बंदी आणण्यासाठी सरकारला काय हरकत हे सामान्य मानसाच्या समजण्या पलीकड आहे.
                        स्वामी विवेकानंदजी ने म्हटले आहे की "मला ध्येयाने झपाटलेले काही युवक हवे आहेत आणि ते युवक माझ्यासोबत येत असतील तर मी हा पुर्ण देश बदलवुन टाकेल." आमच्या देशात ध्येयाने झपाटलेली असंख्य तरुन आहेत फक्त त्यांना त्यांची ध्येय साकार करण्यासाठी एक व्यासपिठ हव आहे. भारत या देशाला सर्वात शक्तीशाली, विकसीत, सुंदर देश बनवायच असेल तर शासनाने फक्त या ध्येयाने झपाटलेल्या युवकांना योग्य मार्गापासुन भरकटु न देता त्यांच्यासाठी एक चांगल व्यासपिठ, रोजगाराच्या संध्या, उत्कृष्ट शिक्षन या प्रकारच्या इतर आवश्यक गोष्टी उपलब्ध करुन दिल्या तर भारताला सर्वात शक्तीशाली, विकसीत होण्यापासुन कोणीही रोखु शकत नाही....
-------------------------------------------------------
संजय रा. कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com
Facebook: Www.Facebook.com/sanjaykokare
---------——--------------------------------------

Wednesday, January 7, 2015

'मायले विचारल म्या....'

मायले विचारल म्या आपली
परिस्थिती कौन एवढी गरीब असते ?,
मायन सांगितल मले आपन शेतकर्याच्या
 एथ जन्मलो म्हणुन हे भोगाव लागते !!!

 मायले विचारल म्या लोक तं
आपल्याले जगाचा पोशिंदा म्हणते,
मायन सांगितल मले कारण त्याईच्या
ईथची पोई आपल्या ईथच पिकते !!!

 मायले विचारल म्या त्या नेत्याच्या
 अंगावरले कपडे एवढे पांढरे कसे काय असते,
मायन सांगितल मले कारण त्यांईच्या
कपडाचा कापुस पण आपल्याच मिळते!!!

 मायले विचारल म्या मग
 माया अंगावरचे कपडे कौन मयकले असते,
मायन सांगितल मले कारण
 तुया कपडाले कापुस कमी न् घामच जास्त असते!!

 मायले विचारल म्या मले 
शाळेमधुन मास्तर कौन हाकलुन लावते,
मायन सांगितल मले कारण
 आपल्याजवळ शाळेच्या फी न् कपड्याची सोय नसते!!!

 मायले विचारल म्या आये मग
 आपल्याजवळ पैसे कौन नसते,
मायन सांगितल मले कारण आपल्या
 वाटणीचा हिस्सा हे पुढारी लोकच खाउन घेते!!!

 मायले विचारल म्या कौन वर्गातले
पोरं म्हले तुया बापान आत्महत्या केली अस म्हणते,
मायन सांगितले मले कारण तुया
 बापान शेती करुन दुसर्याच पोट भरल असते!!!



कवी.............
संजय रा. कोकरे
अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com 

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...