Popular Posts

Wednesday, September 2, 2015

शेतकर्याईचा कोणी वाली नसते..                 गण्या  न राम्या बोलत बसले होते. दोघायच्या चेहर्यावरुन लयच गंभीर दिसुन राह्यले होते. तेवढ्यात राम्या गण्यासोबत बोलाले पुढे येते.
         राम्या: काय राज्या गण्या मले महीत पडले की कांद्याचे भाव एंशी रुपय किलोच्या वर गेले.
         गण्या: हाव ना राज्या. अन कांद्याचे भाव कमी कराईसाठी सरकारन परदेशाहुन कांदा बलावला म्हणते राज्या. कांदा लई माग झाला राज्या म्या त खान च सोडुन देल्ला कांदा..
        राम्या: पण गण्या म्या वावरात कांदा घेतला. तो म्या बाजारात आणला अन् राज्या तीन रुपय किलो च भाव आला. माये कांद्याचे पिकासाठी लागलेले पैसही नही लिगाले राज्या.
       गण्या: राम्या तसच असत बे ते जोपर्यंत आपल्या शेतकर्याच पिक आपल्या जवळ असते ना तो पर्यंत आपल्या पिकाले भावच नसते.
        राम्या: गण्या अस कौन होत रे हे?
        गण्या:  काय होते राम्या आपल्या शेतकर्याजवळ पैसे नसते. म्हणुन आपन नही काय आपल्या जवळ असलेल पिक आपण आल्या त्या  भावात विकुन टाकतो.  पण आपल्या जवळुन माल विकत घेणारे काय करते तो माल नही काय जमा करुन ठेवते. अन बाजारात क्रुतिम तुटवडा निर्मान करते.
        राम्या: त्यान काय होत बे मग?
        गण्या: बाजारात त्या मालाचा तुडवडा झाल्यान त्या मालाची मागणी वाढते पन बाजारात तो माल च नसते. मग त्याचे भाव वाढते..
         राम्या: मग?
         गण्या: एकडाव काय भाव वाढला का हे लोक आपला माल धिरेधिरे बाहेर काढते अन् आपल्या शेतकर्याच्या पिकावर कैक पटीने नफा कमवते.
          राम्या: आता माह्या लक्षात आल आपला माल विकाच्या पहीले भाव कौन कमी असते अन् माल विकल्यावर कसा भाव जास्त असते ते.
         गण्या: आला न लक्षात म्हणुनच लोक म्हणते " शेतकर्याईचा कोनी वाली नसते"


संजय राजु कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email Id: S.r.kokare1992@gmail.com

No comments:

Post a Comment

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...