Popular Posts

Wednesday, January 7, 2015

'मायले विचारल म्या....'

मायले विचारल म्या आपली
परिस्थिती कौन एवढी गरीब असते ?,
मायन सांगितल मले आपन शेतकर्याच्या
 एथ जन्मलो म्हणुन हे भोगाव लागते !!!

 मायले विचारल म्या लोक तं
आपल्याले जगाचा पोशिंदा म्हणते,
मायन सांगितल मले कारण त्याईच्या
ईथची पोई आपल्या ईथच पिकते !!!

 मायले विचारल म्या त्या नेत्याच्या
 अंगावरले कपडे एवढे पांढरे कसे काय असते,
मायन सांगितल मले कारण त्यांईच्या
कपडाचा कापुस पण आपल्याच मिळते!!!

 मायले विचारल म्या मग
 माया अंगावरचे कपडे कौन मयकले असते,
मायन सांगितल मले कारण
 तुया कपडाले कापुस कमी न् घामच जास्त असते!!

 मायले विचारल म्या मले 
शाळेमधुन मास्तर कौन हाकलुन लावते,
मायन सांगितल मले कारण
 आपल्याजवळ शाळेच्या फी न् कपड्याची सोय नसते!!!

 मायले विचारल म्या आये मग
 आपल्याजवळ पैसे कौन नसते,
मायन सांगितल मले कारण आपल्या
 वाटणीचा हिस्सा हे पुढारी लोकच खाउन घेते!!!

 मायले विचारल म्या कौन वर्गातले
पोरं म्हले तुया बापान आत्महत्या केली अस म्हणते,
मायन सांगितले मले कारण तुया
 बापान शेती करुन दुसर्याच पोट भरल असते!!!



कवी.............
संजय रा. कोकरे
अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com 

No comments:

Post a Comment

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...