Popular Posts

Tuesday, November 18, 2014

" एका मेंढपाळाचा शेवटचा दिवस..."                 आकाशात मेघ दाटुन आले होते, अत्यंत जीव घाबरवुन टाकणारा वारा चालु होता, विजाच कडकडाट होत होता, मुसळधार पाऊस थोड्याच वेळात चालु होणार असे चित्र पहावयास मिळत होते. या निसर्गाच आक्राळविक्राळ रुप पाहुन कोणत्याही मानसच नव्हे तर जंगलात राहणारी जनावरे पण सैरावरा पळायला लागली होती. याच वातावरणामध्ये शेतकरी आपल्या शेतामधुन लवकरात लवकर सावरासावर करुन आपपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत होते. जंगलात असणारे जंगली प्राणी पण निसर्गाचे हे आक्राळ विक्राळ रुप पाहुन सैरावैरा पळत होते. पण त्याच परिसरात हे सर्व चित्र शांतपणे पाहत एक मेंढपाळ आपली मेंढर चारत होता. त्याला या माझ्या आक्राळ विक्राळ रुपाची भिती वाटत नाही का? हा प्रश्न निसर्गाला पण निर्मान झाला होता. तो या वातावरणाचा एक अनोखा आनंद घेताना दिसत होता. त्या मेंढपाळाचे या निसर्गाशी काहीशे जन्मोजन्मीचे नाते असल्यागत तो वागत होता. त्याचवेळेस अपेक्षित असलेला पाऊस हा धोधो बरसु लागला. त्याच्या सर्व शेळ्या मेंढर ही त्या मेंढपाळाच्या भोवती जमा व्हायला लागली.
                    मेंढपाळ त्या मेंढरांना आपल्या भोवती घेउन पालकांची माया त्या मेंढरांना देउ लागला. पण हे सर्व करताना त्या पावसाच्या पान्याने खुल्या मनाने तो आपल्या अंगाने न्हावुन निघत होता. विजांचा कडकडाट अत्यंत अक्राळ विक्राळ असल्यामुळे अनेकांना तो विजांचा कडकडाट बघता घाबरगुंडी उडुन जात होती. पण तो मेंढपाळाला पाऊस चालु असताना निसर्गाच सुंदर चित्र अनुभवापासुन तो विजांचा कडकडाट पण थांबवु शकत नव्हता , अस बर्याच वेळ चालत होत त्या मेंढपाळाची मेंढर पण त्या पावसाची आनंदाने मजा घेत होती. काही वेळाने निसर्गाने पण शांततेच रुप घेत आपल आक्राळ विक्राळ रुप थांबवचा निर्णय घेतला होता अस दिसायला लागल होत. पाउस थांबला, विजांचा कडकडाट बंद झाला व सुंदर अस निसर्गाच रुप तिथ दिसायला लागल, फुलपाखर उडत होती , वन्य प्राणी सैरावैरा पळत होती, झाडांच्या पाणावर थांबुन असलेले पाण्याचे थेंब हे मोत्या प्रमाने चकाकत होते.
                    पाऊस थांबला होता तसी ती मेंढपाळाची मेंढर मेंढपाळापासुन दुर होऊन आजुबाजुला चरायला लागली. ती मेंढर अत्यंत शांत प्राणी, त्या मेंढरापासुन ना कोण्या वन्य प्राण्याला त्रास होत होता तर ना की कोणत्याही व्रुक्षाला ती खात होती. त्यांच लक्ष होत फक्त त्या निरुपयोगी जंगलातील गवतावर. तस तर ते गवत प्राण्यांच्या खाण्याऐवजी कशासाठीही उपयोगी नाही पण ते गवत मोठे होउन वाळल्यानंतर जंगलात लागण्यार्या वणव्याला नक्कीच कारणीभुत असते. व त्या वणव्यामध्ये अमुल्य असणारी नैसर्गिक साधनसंपतीच नुकसानच होते. गवत खात मेंढर आपल पोट भरतात व नैसर्गिक साधन संपत्तीच रक्षन पण करत असतात. तो निष्पाप मेंढपाळ त्या मेंढरांवर लक्ष ठेवत त्यांच्या मागे फिरत होता. सुर्याने आपली दिशा बदवायला सुरुवात केली होती व तो आता सुर्य डोक्याचा पलीकडे गेला होता. त्या मेंढपाळा जवळ एक फाटकाफुटका कापड होता व त्या कापडामध्ये काहीतरी बांधलेले होत , थोड्याच वेळाने तो कापड खोलत त्यामधुन त्याने त्याची मिठ, मिरची, भाकर, कांदा ही न्याहारी काढली व ती चालत चालतच खाण्यास पण सुरुवात केली. काहीच वेळात त्याने ती खाउन संपवली , पाणी पिऊन आपली मेंढर चारायला पुन्हा सुरुवात केली.
                   आता मेंढर चारत चारत संध्याकाळ व्हायला लागली होती तेव्हा त्याने आपल्या जंगलात असलेल्या राहुटी कडे आपली मेंढर वळविण्यास सुरुवात केली. तो मेंढर चारत चारत डांबरी करण असलेल्या रस्त्याकडे तो आला.मेंढपाळ आपली मेंढर ही त्या रस्त्यावरुन जात होती. तेवढ्यात त्या रस्त्यामधुन एक चारचाकी गाडी आली तेव्हा त्या चारचाकीमधुन चार व्यक्ती उतरले, तेव्हा त्या व्यक्तींनी त्या मेंढपाळांना आवाज दिला. मेंढपाळाने आपली मेंढर थांबवत तो चार व्यक्तींकडे गेला.
तेव्हा व्यक्तींनी त्या मेंढपाळाला ईकडे काय करत आहे म्हणुन विचारले तेव्हा मेंढपाळाने मी माझी मेंढर घेउन मी माझ्या राहत्या राहुटीकडे जात आहे म्हणुन सांगितले व त्यांना तुम्ही कोण आहात म्हणुन विचारणा केली.
 त्या लोकांनी ती वनकर्मचारी असल्याबाबत सांगीतले व त्यांनी त्या मेंढपाळाला दोन हजार रुपयाची मागणी केली.
पण कशाचे दोन हजार रुपये ? मेंढपाळाने वनकर्माचारांना विचारणा केली.
 तु तुझे मेंढर वनहद्दीत चारल्यामुळे आम्ही तुला दंड करतोय? , वनकर्मचाराने म्हटले.
मी कोणतही जंगलाच नुकसान केलल नाही, कोणत्याही वृक्षाला, वन्य हानी प्राण्याला हानी पोहचवली नाही व सध्या माझी मेंढर कोणत्याही वनहद्दीत नाही मग कशाचा दंड? मेंढपाळाने विचारले.
मुक्याट्याने पैसे देतोस की टाकु तुझी मेंढर उचलुन वनहद्दीत व काढु फोटो मग तुला दंड नाही होणार तर पुर्ण तुझी मेंढर हर्आस होतील.
तो मेंढपाळ घाबरला, दयावया करु लागला , माझ्या कड पैसे नाहीत साहेब माझ्यामेंढरांना सोडा म्हणुन जोरजोराने रडु लागला. पण त्या निर्दयी कर्मचार्यांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही,
                    त्यांनी त्या मेंढपाळाची मेंढर जबरदस्तीने उचलुन वनहद्दीच्या क्षेत्रात टाकली. व फोटो काढुन ती मेंढर गाडीत भरुन शहराच्या दिशेने नेली. पण तो मेंढपाळ तिथेच होता, तो रडत नव्हता, हसत नव्हता फक्त तो शांतपणे भविष्याचा विचार करत होता. कारण त्याच्या उपजिवेकेचे साधन ती वनकर्मचारी घेउन जात होती. आता आपली मुलबाळ काय खाणार , ती कशी जिवण जगणार हाच तो विचार करत होता. कारण नाही त्याच्याजवळ घर होत, ना की त्याच्या जवळ कसण्याकरता शेत होत. आता आपल्या मुलांबाळासहीत विष पिल्या शिवाय पर्याय नाही कारण आपण ती हर्आस केलेली ती मेंढर पुन्हा घेउ शकत नाही. हा विचार त्याच्या डोक्यात येत होता तरीही तो त्या रस्त्यावरच शांत बसला होता पण त्याने त्याची पावले ही घराकडे वळवली नव्हती , आता तो काय करणार हे फक्त त्याच्या मनालाच माहीत होत.........

(या पोस्टमधील फोटो हा इंटरनेटवरुन घेतला आहे.)संजय राजु कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email Id: S.r.kokare1992@gmail.com
Blog: Www.sanjaykokre.blogspot.com
Facebook: Www.facebook.com/sanjaykokare


No comments:

Post a Comment

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...