Popular Posts

Saturday, November 1, 2014

महाराष्ट्रमध्ये मराठी माणसाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय?...



                     "महाराष्ट्र" हे अनेक महान संताच्या चरनांच्या धुळीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेले मराठी माणसांचे एक महान राज्य. पण आज महाराष्ट्राकडे बघितले की महाराष्ट्र हे खरीच मराठी माणसाच राज्य आहे का? हा एक मोठा प्रश्न निर्मान होतो. भारतामधील कोणत्याही प्रांतात राहणार्या व्यक्तीला दुसर्या कोणत्याही प्रांतात वास्तव्य करण्याचा अधिकार आहे, हे आम्हालाही मान्य आहे. पण जो माणुस ज्या राज्यामध्ये जन्माला आला, ज्याच्या वाडवडीलांचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा आहे तरी त्या मराठी माणसाला जिवण जगण्याकरता त्याच्याच जन्मस्थान असलेल्या राज्यामध्ये प्रथम प्राधान्य नसावे हे कुठपत योग्य आहे.
                    महाराष्ट्रामध्ये अनेक दुसर्या राज्यातील लोक येउन व्यवसाय करत आहे व एक आनंदी जिवण जगत आहेत, मराठी माणसाचा त्याला नक्कीच विरोध नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये आलेल्या परप्रांतीय लोकांसाठी मराठी माणसाचा काहीही विरोध नाही हे खरे असले तरी पण महाराष्ट्रामध्ये राहुन महाराष्ट्रीयन असल्याचा ते अभिमान बाळगत नसतील तर त्याचा तितकाच तिरस्कार मराठी माणसाला असेल. महाराष्ट्रामध्ये कोणीही हिंदु नाही तर मुसलमानही नाही, महाराष्ट्र राज्यामध्ये राहणार्या माणसाचा धर्म आणि जात ही मराठी आहे. महाराष्ट्राला मुंबई मिळावी म्हणुन १०० हुन अधिक लोकांनी बलीदान दिले आहे, तेव्हा कुठे मराठी माणसाची मुंबई ही महाराष्ट्राला म्हणजेच मराठी माणसाला मिळाली. परंतु या मुंबई मध्ये आज अनेक परप्रांतीयांचे लोंढेचे लोंढे येत आहे, या लोंढ्याच्या गर्दीमध्ये मराठी माणुस हरवुन गेलेला दिसत आहे. मुंबई मराठी माणसाची हे परप्रांतीय लोंढे मानायलाच तयार नाही, कारण मराठी माणसाला गुलामगिरीची सवय झालेली आहे असा समज परप्रांतीय लोंढ्याचा झालेला दिसत आहे. परंतु मराठी माणुस शांत आहे पण षंढ नाही हे ही त्या परप्रांतीयांनी लक्षात घ्यायला हवे.
                   मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणार्या अनेक संघटना, राजकीय पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. मराठी माणसाच्या हक्कांच्या विषयावर अनेक पक्षांनी मतासाठी राजकारण केल. परंतु ते पक्ष मात्र या विषयावर पुर्णपणे यशस्वी झाले आहेत असे अजुन तरी दिसत नाही आहे. महाराष्ट्रामधील "मुबई मध्ये काय व्यवसाय करता? मुबंई मध्ये ट्राफीकजाम मध्येच तुमचा बराच वेळ वाया जातो, तुम्ही आमच्या राज्यात या आम्ही तुम्हाला अधिक चांगल्या सुविधा पुरवु " हे वाक्य आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीपुर्वी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वापरलेले. आमच्याच राज्यात येऊन, आमच्याच राज्यात गुंतवणुक करणार्या उद्योजकांना फुस लावुन पळवण्याचा प्रयत्न दुसर्या राज्याचा मुख्यमंत्री करतो तरी कसा? हा ही एक मोठा प्रश्न निर्मान होत आहे.
                    मराठी माणसाची अस्मिता महाराष्ट्रामध्ये कमी होताना दिसतेय तरीही मराठी माणुस हे सर्व कस काय सहन करतोय?, हा संशोधनाचा विषय बनला आहे. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार ? महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये कोण असणार? हे सर्व दुसर्या राज्यामध्ये राहणारे नेते ठरवत होते व ठरवत पण आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोण राहणार? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार ? हे मराठी माणुस का ठरवु शकत नाही, मराठी माणसाची बुद्धी एवढी षंढ झाली आहे का? की ती षंढ करण्याचा प्रयत्न परप्रांतीय लोक करतायत. ? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री जरी मराठी माणुस असला तरी महाराष्ट्रामधील कोणतेही निर्णय घेण्याकरता त्याला दिल्ली कडेच का पाहावे लागते? हा ही एक मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रामधील कोणताही निर्णय घेताना दिल्लीकडे बघावे लागणार नाही तर महाराष्ट्राच्या जनतेकडेच बघावे लागेल. असे सरकार महाराष्ट्रामध्ये कधी तरी येईल का?. हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
                  महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या प्रत्येक प्रश्नावर आक्रमक राहणार्या राज ठाकरे व उद्दव ठाकरे यांना मराठी माणसाच्या हिताकरता राजकीय स्वार्थ सोडुन एकत्र येण्यास काय हरकत आहे? हे माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या समजण्या पलीकडे आहे. मराठी माणसाला या दोघांकडुन बर्याच प्रमाणात अपेक्षा आहे, या दोघांच्या भांडणामध्ये मराठी माणसाचे मतांतर होउन मराठी माणसाचेच नुकसान होत आहे व परप्रांतीय समाजाचे लोक हे आपल्या मराठी माणसांमध्ये फुट पाडुन महाराष्ट्रावर राज्य करण्याचे स्वप्न पाहतो आहे व आपल्याच माणसाला हाताशी धरुन तो राज्य करताना पण दिसत आहे. महाराष्ट्रामधील मराठी लोकांच्या अस्मितेला असणारा धोका टाळण्यासाठी मराठी माणसाला आपसातील भांडणे विसरुन एकत्र यावेच लागेल व मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये अस सरकार आणावे लागेल की ज्याचा मुख्यमंत्री कोण्या दिल्लीवरुन नाही तर महाराष्ट्राच्या एखाद्या शहरामधुन, गावामधुन किंवा गल्लीमधुन ठरवला जाईल .......

(ह्या पोस्टमधील फोटो हा इंटरनेटवरुन  घेतला आहे)


प्रती,
          मा. संपादक साहेब,
          दैनिक __________
                    आपल्या लोकप्रिय दैनिकातुन हा अग्रलेख प्रसिद्घ करावा ही विनंती.


संजय राजु कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 09561730189
Email Id: S.r.kokare1992@gmail.com
Blog: Www.sanjaykokre.blogspot.com

No comments:

Post a Comment

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...