Popular Posts

Sunday, November 16, 2014

"स्वच्छ भारत अभियानात निस्वार्थी सहभाग की पब्लिसिटी स्टंट ?..."                    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत साकार करण्याकरता माननीय पंतप्रधान यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषना केली.सामान्य नागरीकापासुन मोठमोठ्या सेलीब्रेटी, नेत्यापर्यंत पर्यंत स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद मिळत असल्याबाबत बोलल्या जात आहे, त्यांना मिडीया द्वारे बरीच प्रसिद्धपण मिळत आहे. पण ज्या महापुरूषांनी आपले पुर्ण जिवण स्वता झाडु घेउन, सतत रस्त्यावर उतरुन, रस्ता साफ करुन स्वच्छतेचा संदेश लोकांना दिला आज त्या महान पुरुषांच नाव भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत डावलल्या जात आहे ही एक शोकांतीका आहे.
                    मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी पण मोठमोठ्या उद्योजकांना, सिनेस्टर, क्रिकेटर व राजकीय नेत्यांना स्वच्छ भारत अभियानामध्ये समाविष्ट होण्याकरीता निमंत्रण पाठवत आहे. ते पण कोणत्याही स्वार्थाशिवाय स्वच्छ भारत अभियानामध्ये समाविष्ट होत आहे अशी चर्चा होत आहे. पण हेच सिनेस्टार, राजकीय नेते, क्रिकेटर, उद्योजक हे रस्त्यावर येतात झाडु हातात घेऊन मिडीया समोर तो झाडु मारतात. व काही वेळानंतर तेथुन निघुन जातात. व हीच काही वेळ केलेली सफाई दिवस भर ईलेक्ट्रानिक्स मिडीयावर झळकत असते. तसेच वृत्तपत्राच्या पहील्यापानावर ती बातमी छापुन येते व काही वेळ कचरा साफ करणार्या त्या व्यक्तींना कितीतरी पटीने मिडीया मोठ करते. पण याच मिडीया वाल्यांना शेतकर्यांच्या होणार्या आत्महत्या, रोज कचरा साफ करणार्या कामगरांना, निस्वार्थीपणे स्वच्छता अभियान राबवणार्या व स्वच्छतेचा संदेश देणार्या व्यक्तींना दाखवयाला मिडीयाजवळ वेळ नाही.
                     माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कचरा नसलेल्या रस्त्यावरची साफसफाई करणार्या व्यक्तींचे कौतुक करतायत हे पण आश्चर्यच आहे, कारण हे सिनेस्टार, राजकीय नेते, क्रिकेटर, उद्योजक स्वच्छ भारत अभियानाला राबवायला काही वेळासाठी नगरामध्ये येतात व काही वेळानंतर तेथुन निघुन जातात. पण या सर्व सेलीब्रिटी येण्याच्या आधी फटाके फोडल्या जातात, गेल्यानंतर पण फटाके फोडल्या जातात त्यामुळे तिथ फटाक्यांचा कचरा, मिनरल वाटर च्या बॉटलचा कचरा असा अनेक प्रकारचा कचरा ती लोक गेल्यानंतर तसाच पडुन राहतो. फटाक्यांच्या आवाजामुळ ध्वनीप्रदुषण पण होते. तसेच त्या सेलिब्रेटींना पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी होत असल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्मान होत आहे.
                       भारत स्वच्छ अभियानामध्ये साध्या गावाच्या सरपंचापासुन मंत्र्यांपर्यंत तसेच अनेक क्षेत्रातील सेलाब्रिटी स्वताची प्रसिद्धी वाढवुन घेण्याचा प्रयत्न करत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी विचारु ईच्छितो आपण नॉमिनेटेड केलेल्या सेलीब्रिटी स्वताच्या घरात झाडु मारण्या करीता मोलकरीण ठेवतात पण ते कधीही झाडु हातात घेत नाही. हे सेलीब्रिटी
स्वताच्या स्वार्थासाठी, स्वताला आणखीन प्रसिद्धी मिळवुन देण्याकरता स्वच्छ भारत अभियानामध्ये सामिल होत आहे. जर ते निस्वार्थीपणे भारत स्वच्छ अभियानामध्ये सामिल होउ ईच्छित असते तर ते कोणताही गाजावाजा न करता , कोणत्याही मिडीयाला न सांगता त्यांनी रस्त्यावर झाडु मारला असता व हा स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्रम आपल्या व्यस्त जिवणातील थोडा वेळ काढुन नित्यक्रमाप्रमाने राबविला असता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरच जर स्वच्छ भारत अभियान यशस्वी करायच असेल तर त्यांनी त्या लोकांच्या नावाचा सत्कार करायला हवा ज्यांना कोणत्याही प्रसिद्धीची हाव नाही व जे नेहमी नित्यक्रमाने रस्ते, गल्ली साफ करतात व कमीत कमी आपल घर व परिसर स्वच्छ ठेवतात कारण प्रत्येकाने आपल घर सुधारल तर आपला देशच नव्हे तर जग सुधारु लागते..............

(ह्या पोस्टमधील फोटो  इंटरनेट वरुन घेतलेला आहे)संजय राजु कोकरे
रा.अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो.नं. 9561730189
Email: S.r.kokare1992@gmail.com
Blog: Sanjaykokre.blogspot.com

No comments:

Post a Comment

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...