Popular Posts

Monday, October 20, 2014

"महाराष्ट्रामधील २०१४ विधानसभा निवडणुकीतील धनगरांचे योगदान"

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकींचे निकाल लागले व सर्वत्र कमळ च कमळ फुलु लागले. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांना व काल परवा पर्यंत मुख्यमंत्रीपदासाठी दावा ठोकणार्या नेत्याला पण अनपेक्षित असणार्या अस्या पराभवाला समोरे जावे लागले. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीप्रेणित युतीचे सरकार बसण्याचे चिन्ह दिसत आहे. भारतीय जनता पार्टीला जरी स्पष्ट बहुमत मिळालेले नसले तरी भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा पक्ष म्हणुन अस्तित्वात आलेला आहे. भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्रपक्षाला १२३ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना या पक्षाला ६३ जागा मिळाल्या आहेत तर राष्ट्रीय कॉग्रेस या पक्षाला ४२ जागा व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला ४१ जागा मिळाल्या आहेत. भाजपाला महाराष्ट्रमध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी शिवसेना किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षाची साथ घ्यावी लागु शकते.परंतु यावेळेस महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या नेत्रुत्वात सरकार स्थापण होणार नक्की. महाराष्ट्रामध्ये २००९ विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ला ४६ जागावर व शिवसेना या पक्षाला ४४ जागावर विजय मिळाला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काही महीन्या अगोदर महायुती असताना शिवसेना व भारतीय जनता पार्टी(मित्रपक्ष) या दोन्ही पक्षांनी धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनाला पाठींबा दर्शविला होता. त्यामुळे धनगर समाज आरक्षन क्रुती समितीने भारतीय जनता पार्टी ला समर्थन दर्शविलेले होते व मा. महादेव जानकर याचा राष्ट्रीय समाज पक्ष हा भारतीय जनता पार्टी सोबत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये दोन क्रंमाकावर असणार्या धनगर समाज हा मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे वळला व त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात अधिक जागा जिंकण्यात यशस्वी झाल्याची दिसत आहे अशी चर्चा महाराष्ट्रातील जनसामान्यांत आहे. भाजपाच्या या यशामध्ये सर्वात मोठा वाटा हा धनगर समाजाचा मतांचा आहे असे चित्र २००९ व २०१४ विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या तुलनेवरुन दिसत आहे. धनगर आरक्षणाला शिवसेनेने महायुतीमध्ये असताना पाठींबा दर्शवला होता व महायुती तुटल्यानंतर सुद्धा शिवसेनेने धनगर आरक्षनाला कधीही विरोध दर्शवलेला नव्हता त्यामुळे धनगर समाजातील लोकांचा भाजप नंतर शिवसेनेकडे मतदानाचा कल वाढला होता. त्यामुळे शिवसेनेला २००९ च्या विधानसभा जागा पेक्षा १९ जागा २०१४ विधानसभा निवडणुकींमध्ये जास्त जिंकणे शक्य झाले आहे. महाराष्ट्रामध्ये ५५ ते ६० मतदारसंघामध्ये धनगर समाज ज्याला मतदान करेल तो उमेदवार निवडणुन येण्याची शक्यता असते तर बर्याच मतदारसंघामध्ये जरी फक्त धनगर समाजाच्या मतदानावर जरी उमेदवार निवडुन येत नसला तरी धनगर समाजाचे मतदान सम्पुर्ण मतदानाच्या टक्केवारीमध्ये प्रभाव टाकण्या इतपत असते व त्यामुळे तेथील उमेदवार हा धनगर समाजाच्या मतादानामुळे उमेदवार विजयानजिक पोहचण्याची शक्यता असते. बारामती मध्ये मा. पंतप्रधान मोदी यांची झालेली जाहीर प्रचारसभा व त्या प्रचार सभेमध्ये धनगरांची वेशभुषा असलेल्या पिवळा फेटा व घोगंडी यांचा मा. पंतप्रधान मोदी यांनी पेहराव करुन धनगरांच्या भावणांना त्यांनी हात घातला व धनगर समाजाने पण त्यांना आपला प्रामानिक पणा दाखवत फक्त भारतीय जनता पार्टी च्या उमेदवाराला मतदान केले व भारतीय जनता पार्टीने धनगर समाजावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत भारतीय जनता पार्टी ला महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी धनगर समाजाने आपल्या परिने सर्व मदत केलेली दिसत आहे. त्याच प्रमाने शिवसेनेच्या २०१४ विधानसभा निवडणुकीच्या यशामध्ये धनगर समाजाचे बरेच योगदान आहे. महाराष्ट्र नवनिर्मान सेना अध्यक्ष मा. राज ठाकरे यांनी नागपुर मध्ये विधानसभा निवडनुकीआधी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषद मध्ये एका पत्रकाराने महाराष्ट्र नवनिर्मान सेना अध्यक्ष मा. राज ठाकरे यांना धनगर आरक्षनाबाबत प्रश्न विचारला असता मा. राज ठाकरे यांनी धनगर आरक्षनाबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे उमेदवार निवडुण आल्यास धनगर आरक्षणाचे कधीही समर्थन करणार नाही उलट धनगर आरक्षनाला त्यांच्यापासुन धोका निर्मान होऊ शकतो हा विचार धनगर समाजातील लोकांच्या मनात निर्मान झाला होता त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या उमेदवारास धनगर समाजाच्या लोकांनी मतदान करण्यास विरोध केला व त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्मान सेनेला मागील विधानसभा निवडणुकी एवढ्या जागा सुद्धा जिंकता आल्या नाहीत व महाराष्ट्रामध्ये कसाबसा एका जागेवर मनसेला विजय मिळवता आला. धनगर समाजाच्या आरक्षनाला विरोध करणार्या वसंत पुरके, हर्षवर्धन पाटील व बबनराव पाचपुते या सर्व दिग्गज नेत्यांना पराभवाची चव चाटावी लागली. यावरुन महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाची राजकीय ताकद किती आहे ह्याची जाणीव महाराष्ट्राच्या सर्व राजकीय पक्षाला आता झालेली दिसत आहे. व यापुढे धनगर समाजाला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये राजकारण करता येणार नाही हे महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या लक्षात आलेले आहे. धनगर समाज हा ज्याप्रमाने भारतीय जनता पार्टी सोबत एकनिष्ठेने राहीला त्याच प्रमाने आता भारतीय जनता पार्टीने धनगर आरक्षनाचा प्रश्न जास्त प्रलंबीत न ठेवता धनगर आरक्षनाच्या प्रश्नाला प्राधान्य देत धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षन देऊन भारतीय जनता पार्टी ने धनगर समाजाला न्याय द्यावा.................. . . संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

No comments:

Post a Comment

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...