Sunday, October 12, 2014

" वास्तव: रस्त्यावर राहणार्या मुलांची स्थिती अत्यंत बिकट"

मी अमरावती मधील दस्तुर नगर या परिसरात माझ्या मित्राला भेट देण्या करता आलो होतो. सकाळ चे दहा वाजले असताना सर्व परिसरातील लोक हे आपल्या कामावर जाण्यासाठी चौकामधुन ये जा करत होते, त्याचप्रमाने सर्वच लहान मोठी मुल-मुली आपल्या शालेय गणवेशामध्ये शाळेत जाण्याकरता चौकामधुन ये-जा करत होती. माझा मित्राला दस्तुर नगर मध्ये यायला काही वेळ लागणार होता त्यामुळे हे सर्व चित्र बघत मी दस्तुर नगर मध्ये उभा होतो. तेवढ्यात कोणीतरी माझ्या हाताला हात लावुन मला आवाज देण्याचा प्रयत्न करत होते, मी मागे वळुन बघितले असता अत्यंत घाणरडे असे कपडे घातलेली आठ - नऊ वर्षाची मुलगी व तिच्या हातात तिचीच एक दोन वर्षाची लहान बहीण घेउन आपले हात पसरुन मला भिक मागत होती. मला त्या दोघी बहीणींची दयनीय अवस्था बघुन मला दया आली व त्यांना मी दहा रूपये दिले. त्या मुली लगेच ते पैसे घेऊन माझ्या जवळुन दुर गेल्या.अश्याच प्रकारे भिक मागणारी बर्याच प्रमाणात मुलमुली त्या नगरामध्ये फिरत होते. ती मुल-मुली कोणालाही भिक मागण्याच आपल काम करत होती. कोणी त्यांना हाकलुन लावत होते तर कोणी त्यांना दयेच्या नजरेने बघुन त्यांना काही पैसे देत होते. माझ्या मनात आता पाच मिनटा पहलचे एक चित्र आठवत होते की आपल्या सुंदर अश्या शालेय गणवेशा मध्ये मुलमुली किती आनंदाने शाळेमध्ये जात होती तर ह्या भिक मागणार्या मुलामुलींना घालयला धड कपडे नव्हते. त्या शाळेतील मुलामुलींना अत्यंत स्वादीष्ट असा जेवणाचा डब्बा त्यांच्या आई वडीलांकडुन तयार करुन मिळत होता तर एकीकडे या काही मुलांना उष्ट्या अन्नासाठी पण दारोदारी फिरावे लागत होते. हा अत्यंत भयंकर असा अनुभव मला पहायला मिळत होता. प्राथमिक शिक्षणापासुन कोणतेही मुल-मुली वंचित राहू नये म्हणुन महाराष्ट्र शासनाने अनेक योजना लागु केल्या. त्या योजनांचा या मुलांना फायदा मिळवुन देण्यामध्ये महाराष्ट्र शासन सफशेल अपयशी ठरल्याचे यावरुन दिसत आहे. मी जिल्ह्यामध्ये जवळपास प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये लिहीलेल एक वाक्य नेहमीच वाचत असायचो ते म्हणजे " आमच्या गावात कोणताही शाळाबाह्य विद्यार्थी नाही किंवा शाळ्यबाह्य विद्यार्थी दाखवा आणि बक्षीस जिंका". जर मग सर्वच गावांच्या परिसरातील सर्वच मुल ही शाळेमध्ये शिकत असतील तर मग ही रस्त्यावर भिक मागणारी मुल आली तरी कोठुन? या मुलांच्या या बिकट अवस्थेसाठी जबाबदार आहे तरी कोण? या मुलांची अशी बिकट अवस्था असणे म्हणजे महाराष्ट्र शासनाची हार नव्हे का? जेथे सर्वात पुढे महाराष्ट्र माझा हे म्हणायला महाराष्ट्राचे नेते विसरत नसतील तर ह्या मुलांकडे लक्ष द्यायला ह्याच नेत्यांना कसा काय विसर पडतो? सध्या महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार चालु आहे परंतु कोणत्याही पक्षाच्या उमेदवार या मुलांच्या समस्येबाबत ठोस पाउल उचलण्याचे वचन सामान्य जनतेला का देत नाही? ह्या सर्व मुल-मुली रस्त्यावर राहत असल्यामुळे त्याच्यासोबत अपघात होण्याची, काही दुर्घटना होण्याची किंवा ती मुलमुली गुन्हेगारीक्षेत्रा कडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी राज्य शासन या मुलामुलींच्या समस्ये कडे का गंभीर रित्या बघत नाही? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात यायला सुरुवात झाली होती परंतु तेवढ्यात माझा मित्र तेथे आला आणि आम्ही दोघे माझ्या मित्राच्या घरी जायायला निघालो परंतु माझ्यामनात आलेले ते सर्व प्रश्न अनुत्तरीच राहले......... परंतु आता या प्रश्नांचे उत्तर आता तुम्हा-आम्हाला महाराष्ट्र शासनाला विचारावे लागणार आहे. अत्यंत बिकट अवस्थेत रस्त्यावर जिवण जगणार्या व म्रुत्युच्या दाढेतच उभे राहुन आपला उदारनिर्वाह करणार्या या गरीब मुला-मुलींना आता आपल्याला आपुलकीच्या भावनेने मदत करावी लागणार आहे. आता मी फक्त एवढेच सांगेन "चला उठा भारताचे भविष्य असणार्या या मुलांना मदत करुया आणि शासनाला यांच्या असणार्या बिकट अवस्थेबाबत जाब विचारुया"......... संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...