लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी.
Popular Posts
-
*🙏विचार धन🙏* एक सावकार आपल्या कुत्र्यासोबत होडीतून नदी पार करीत होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्या...
-
महाराष्ट्रात मागील वर्षी कपाशी या पिकावर बोण्ड अळी चा प्रभाव दिसला. त्यामुले महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचं कापसाचे उत्पादन कमी...
-
🌹 *गुरू - शिष्य* 🌹 🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜 गुरूने शिष्याला जंगलात नेलं आणि १०० फुटांपेक्षा उंच झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊन येण्याची आज्ञ...
Wednesday, September 10, 2014
हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद........
हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद........
आज हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांची १०९ वी जयंती आहे. मेजर ध्यानचंद हे अत्यंत प्रतिभाशाली असलेले हॉकीचे खेळाडु होते. परंतु त्यांना लहापणापासुनच हॉकीमध्ये आवड होती अस काही नव्हते. ते भारतीय लष्करामध्ये भरती झाल्यानंतर त्यांना हॉकीमध्ये आवड निर्मान होत गेली. पुढे मेजर ध्यानचंद यांना हॉकी या खेळामुळे भारतीय लष्करात पदोन्नती मिळत गेली. त्यांना भारतसरकार कडुन १९५६साली पद्मभुषन पुरस्कार , तसेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार , अर्जुन पुरस्कार ,द्रोणाचार्य पुरस्कार या व अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले. ध्यानचंद यांना गोलपोस्ट च्या लांबी रुंदीची संपुर्णपणे अचुक माहीती होती . मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीस्टीक ला चेंडु चिपकुनच राहायचा .. मेजर ध्यानचंद यांचा खेळ बघताना समोरील खेळाडुच्या मनात मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीस्टीक मध्ये कोणत्यातरी प्रकारचे चुंबक किंवा गोंद असण्याची शंका यायची, या शंकेतुन अनेकदा त्यांची हॉकीस्टीक तपासली जायायची. परंतु त्या तपासातुन कोणताही प्रकारचा गैरप्रकार कधीही समोर आला नाही.मेजर ध्यानचंद य़ांचा खेळ खेळण्याची शैलीच अद्भुत होती ,त्यांच्या या खेळशैलीमुळे समोरील खेळाडुला आणि प्रक्षेकांना त्यांच्या खेळाची भुरळ पडायची. अशीच भुरळ जर्मनीचा हुकुमशहा हिटलर यांना मेजर ध्यानचंद याच्या खेळाची पडली होती. हिटलर यांनी मेजर ध्यानचंद यांना जर्मनीचे नागरीकत्व आणि जर्मन लष्करात महत्वाचे पद देउ केले. परंतू ध्यानचंद यांनी हिटलर यांची ही ऑफर फेटाळत भारताकडुनच ते खेळत राहाण्याचा निर्णय घेतला आणि भारताला आलम्पीक मध्ये अनेक सुवर्णपदके मिळवुन दिली. त्यांचा वाढदिवस आपण सर्वजण 'राष्ट्रीय क्रिडादीन' म्हणुन साजरा करतो........
आपलाच
संजय रा. कोकरे
अमरावती
मो.नं. ९५६१७३०१८९
Subscribe to:
Post Comments (Atom)
तुम्हाला हे वाचायला आवडेल...
निरागस प्रेम...
"प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...
-
*🙏विचार धन🙏* एक सावकार आपल्या कुत्र्यासोबत होडीतून नदी पार करीत होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्या...
-
महाराष्ट्रात मागील वर्षी कपाशी या पिकावर बोण्ड अळी चा प्रभाव दिसला. त्यामुले महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचं कापसाचे उत्पादन कमी...
No comments:
Post a Comment