Popular Posts

Wednesday, September 3, 2014

"राजकीय स्वार्थासाठी धनगर समाजाच्या आरक्षनाचे राजकारण........"

"राजकीय स्वार्थासाठी धनगर समाजाच्या आरक्षनाचे राजकारण........" एखाद्या इमानदार जमातीला चोर संबोधने किंवा रक्ताची गंगा वाहली तरी चालेल पण एखाद्या अत्यंत मागास असणाऱ्या समाजाला आरक्षन मिळु देणार नाही, अश्या प्रकारची वक्तव्य राज्य शासनाच्या महत्वाच्या पदावर असणाऱ्या एखाद्या नेत्याने करणे हे कितपत योग्य आहे? हा एक जनसामान्यात चर्चेचा विषय ठरलेला आहे. परंतु असाच काही प्रकार साधुसंताच्या चरणांच्या धुळीने पवित्र झालेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षन आंदोलनाच्या पार्श्वभुमी वर घडत आहे. धनगर जमातीला चोर संबोधने किंवा रक्ताची गंगा वाहली तरी चालेल पण धनगर जमातीला आरक्षन मिळु देणार नाही, या प्रकारची वक्तव्य महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या पदावर असणारी काही नेतेमंडळी करत आहे . एखाद्या चुकीच्या बाबीचा विरोध करायला हरकत नाही परंतु ती बाब चुकीची आहे किंवा नाही हे त्या बाबीचा अत्यंत खोल अभ्यास करुन तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते. परंतु त्या बाबीचा कोणताही अभ्यास नसताना किंवा कोणत्याही प्रकारची माहीती नसताना, ती बाब बरोबर असताना सुद्धा फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्या बाबीचा विरोध करायचा हे कितपत योग्य आहे हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे. असाच काही प्रकार धनगर समाजाच्या आरक्षनाबाबत घडत आहे, धनगर समाजाच्या आरक्षनाबाबत काही गैर संमज पसरवुन किंवा आरक्षनाला विरोध करुन महाराष्ट्रातील काही नेते मंडळी आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु धनगर समाजाच्या आरक्षनाला विरोध करणाऱ्या नेते मंडळींना मी विनंती पुर्वक सांगु इच्छितो की वातानुकुलीत खोलीमध्ये बसुन आदीवासी या शब्दाची व्याख्या करण्यापेक्षा किंवा एखाद्या ईमानदार जमातीला चोर संबोधन्यापेक्षा किंवा रक्ताची गंगा वाहण्याचे वक्तव्य करण्यापेक्षा कधीतरी धनगर समाजातील लोकांबरोबर मेंढर चारायला या मग तुम्हाला कळेल की उन्हात जीवन जगत असताना , पाण्या पावसाचा विचार न करता पोट भरण्या करता किती कष्ट करावे लागतात व म्रुत्यु च्या दाढेतच उभ राहुनच या लोंकाना आपला व्यवसाय करावा लागतो हे आपल्या लक्षात येईल. जर धनगर समाजाच्या आरक्षनाला विरोध करणाऱ्या नेते मंडळीनी एक दिवस जरी धनगर समाजातील लोकांबरोबर मेंढर चारत जिवण जगुन बघितले तर हीच नेते मंडळी धनगर समाज अत्यंत मागास असुन धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षनाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी ते स्वत: महाराष्ट्र राज्य शासनाला करतील मला आशा आहे. धनगर समाजाची मागणी ही अनुसुचित जमातीच्या आरक्षनाची अंमल बजावणी करण्याबाबत आहे. धनगर समाजामध्ये असलेल्या काही अभ्यासु नेत्यांच्या मते " केंद्राने प्रसारीत केलेल्या सुचीप्रमाने महाराष्ट्र राज्याच्या अनुसुचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ३६ वर धनगड असा उल्लेख केलेला आहे. धनगर आणि धनगड हे दोन्ही शब्द एकच आहे." ज्या प्रमाने इंग्रजीमध्ये वेरुळ असे लिहायचे असल्यास त्या शब्दाला वेरुल (Verul) असे लिहावे लागते. तसेच हिंदीमध्ये ' ळ' हा शब्द उपलब्ध नसल्यामुळे ' माळ' या मराठी शब्दाला हिंदीमध्ये 'माल' असेच लिहावे लागते. तसेच 'ओरीसा' या राज्याला 'ओडीसा' या नावाने सुद्धा संबोधल्या जाते. त्याच प्रमाने काही शाब्दीक चुकीमुळे 'धनगर' या शब्दाचे 'धनगड' असे झाले आहे. मा. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाची हालाखीची स्थिती बघुन भारताच्या राज्य घटने मध्ये त्यांना अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट केले आहे. परंतु काही स्वार्थी व्रुत्तीच्या राजकारण्यांमुळे धनगर जमातीचे अनुसुचीत जमातीच्या आरक्षणाचे हक्क त्यांच्या पासुन मागील ६० वर्षापासुन हिरावुन घेतले आहेत. धनगर जमातीवरील अन्याय दुर करण्याकरता मध्यप्रदेश राज्य शासनाने धनगर आणि धनगड एकच असल्याचा किंवा धनगर या शब्दाला धनगड असे वाचण्यात यावे असा अध्यादेश काढुन प्रसिद्ध केला. धनगर आणि धनगड एकच असल्याचा अभिप्राय१९५५ मध्ये कालेलकर समितीने आणि १९७९ मध्ये मंडल आयोग यांनी दिला आहे. तसेच धनगर आणि धनगड एकच असल्याचे अनेक पुरावे अस्तितवात आहे भारतीय संस्कृती कोश, The wild tribes of india (पृष्ठ ७८-७९), Tribal culture of India (पृष्ठ ११२), Some Indian tribes (पृष्ठ १३१-१३२), Society in tribal India  (पृष्ठ २२), Phonology of Dhangar-kurux, Encyclopedia of the people of Asia & Oceania (पृष्ठ ६१३) अशा अनेक ग्रंथामध्ये ओरान जमातीची समकक्ष जमात म्हणून धनगर आणि धनगड असे नोंदवले आहे.१९६८ साली केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या Bibliography of SC, ST & marginal tribes (पृष्ठ क्र. २९४) वर 'धनगर' अनुसूचित जमात आहे असे नमूद केले आहे. १९८२ साली प्रसिद्ध केलेल्या याच ग्रंथाच्या आवृत्तीत 'धनगर' अशीच नोंद आहे. त्याचप्रमाने २२ डिसेंबर १९८९ रोजी मा. माजी खासदार सुर्यकांता पाटील यांनी संसदे मध्ये महाराष्ट्रतील धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनाविषयी प्रश्न विचारला असता तत्कालीन सामाजीक न्यायमंत्री रामविलास पासवान यानी धनगर आणि धनगड एकच असुन हा समाज अगोदर पासुनच अनुसुचित जमातीत समाविष्ट असल्याची बतावणी केली. धनगर समाज हा अनुसुचीत जमातीत समाविष्ट असल्याचे असे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनास विरोध करणाऱ्या नेत्यांनी सर्वात प्रथम धनगर समाजाच्या आरक्षनाबाबत असलेल्या पुराव्यांचा अभ्यास करावा व नंतरच त्यांनी धनगर आरक्षन संदर्भात वक्तव्य करावे.. प्रती, मा. संपादक साहेब, दैनिक __________ आपल्या लोकप्रिय दैनिकातुन हा अग्रलेख प्रसिद्घ करावा ही विनंती. प्रसिद्धी प्रमुख संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

No comments:

Post a Comment

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...