🌹 *गुरू - शिष्य* 🌹
🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜
गुरूने शिष्याला जंगलात नेलं आणि १०० फुटांपेक्षा उंच झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊन येण्याची आज्ञा दिली.
शिष्य झाडावर सरसर चढत वर गेला. शेंड्याकडे पोहोचेपर्यंत
त्याच्या लक्षात आलं की गुरूचं आपल्याकडे लक्षच नाही. तो
इतर शिष्यांशी हास्यविनोद करतो आहे. शेंड्यावर पोहोचून
त्याने गुरूकडे पसंतीच्या पावतीच्या अपेक्षेने पाहिलं तर
वनभोजन करून गुरू चक्क डाराडूर झोपी गेला होता.
शिष्य आपल्या संप्रदायाची ध्वजा शेंड्याला बांधून काळजीपूर्वक
खाली उतरू लागला. त्याचं मन कटुतेने भरून गेलं होतं. तो
जमिनीपासून वीसेक फुटांवर पोहोचला, तेव्हा खालून आवाज
आला, सांभाळून. उजवीकडची फांदी कुजकी आहे, तिच्यावर
वजन नको टाकूस.
खालून गुरू सूचना देत होता. शिष्य जमिनीवर पोहोचेपर्यंत
त्याच्या सूचनांची सरबत्ती सुरू होती. तिने शिष्याचं मन
आणखी विषादाने भरून गेलं.
खाली उतरल्यावर गुरूला वंदन करून तो त्याची नजर चुकवून
बाजूला उभा राहिला. गुरूने प्रेमाने विचारलं, काय झालं? तू
नाराज दिसतोयस...
शिष्य म्हणाला, मी सगळ्यात धोकादायक जागी होतो, झाडाच्या शेंड्यावर होतो, जिथून पडलो असतो तर जीव गेला असता, अशा जागी होतो, तेव्हा तुम्ही गाढ झोपला होतात. जमिनीपासुन वीस फुटांवर आल्यावर मात्र काळजीपूर्वक सूचना द्यायला लागलात.
काय अर्थ समजायचा याचा मी?
गुरू हसून म्हणाला, तू झाडाच्या शेंड्यावर होतास, तेव्हा तुझ्या
मनात कोणते विचार होते?
शिष्य म्हणाला, विचार? कसले विचार असणार? तिथे फक्त
जीव वाचवून खाली उतरण्यावरच लक्ष केंद्रित होतं...
गुरू म्हणाला, म्हणूनच मी झोपलो होतो, कारण तू जागा
असणार, याची मला खात्री होती. जमिनीपासून २० फुटांवर
पोहोचल्यावर मात्र तुला वाटायला लागलं की आता आपण
पोहोचलो, जिंकलो. ही मेंदूला गुंगी येण्याची वेळ असते.
शेंड्यावरून पडून कोणी मेल्याचं ऐकलंयस का कधी?
माणसं दहावीस फुटांवरूनच पडून मरतात. तू जिथे
झोपशील अशी शंका निर्माण झाली, तिथे मी जागा
राहिलो. तेच माझं काम आहे.
🙏🏻 *जय गुरुदेव* 🙏🏻