Popular Posts

Wednesday, August 28, 2019

गुरु व शिष्य...

🌹 *गुरू - शिष्य* 🌹

🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜

गुरूने शिष्याला जंगलात नेलं आणि १०० फुटांपेक्षा उंच झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊन येण्याची आज्ञा दिली.

शिष्य झाडावर सरसर चढत वर गेला. शेंड्याकडे पोहोचेपर्यंत
त्याच्या लक्षात आलं की गुरूचं आपल्याकडे लक्षच नाही. तो
इतर शिष्यांशी हास्यविनोद करतो आहे. शेंड्यावर पोहोचून
त्याने गुरूकडे पसंतीच्या पावतीच्या अपेक्षेने पाहिलं तर
वनभोजन करून गुरू चक्क डाराडूर झोपी गेला होता.

शिष्य आपल्या संप्रदायाची ध्वजा शेंड्याला बांधून काळजीपूर्वक
खाली उतरू लागला. त्याचं मन कटुतेने भरून गेलं होतं. तो
जमिनीपासून वीसेक फुटांवर पोहोचला, तेव्हा खालून आवाज
आला, सांभाळून. उजवीकडची फांदी कुजकी आहे, तिच्यावर
वजन नको टाकूस.

खालून गुरू सूचना देत होता. शिष्य जमिनीवर पोहोचेपर्यंत
त्याच्या सूचनांची सरबत्ती सुरू होती. तिने शिष्याचं मन
आणखी विषादाने भरून गेलं.

खाली उतरल्यावर गुरूला वंदन करून तो त्याची नजर चुकवून
बाजूला उभा राहिला. गुरूने प्रेमाने विचारलं, काय झालं? तू
नाराज दिसतोयस...

शिष्य म्हणाला, मी सगळ्यात धोकादायक जागी होतो, झाडाच्या शेंड्यावर होतो, जिथून पडलो असतो तर जीव गेला असता, अशा जागी होतो, तेव्हा तुम्ही गाढ झोपला होतात. जमिनीपासुन वीस फुटांवर आल्यावर मात्र काळजीपूर्वक सूचना द्यायला लागलात.
काय अर्थ समजायचा याचा मी?

गुरू हसून म्हणाला, तू झाडाच्या शेंड्यावर होतास, तेव्हा तुझ्या
 मनात कोणते विचार होते?

शिष्य म्हणाला, विचार? कसले विचार असणार? तिथे फक्त
जीव वाचवून खाली उतरण्यावरच लक्ष केंद्रित होतं...

गुरू म्हणाला, म्हणूनच मी झोपलो होतो, कारण तू जागा
असणार, याची मला खात्री होती. जमिनीपासून २० फुटांवर
पोहोचल्यावर मात्र तुला वाटायला लागलं की आता आपण
पोहोचलो, जिंकलो. ही मेंदूला गुंगी येण्याची वेळ असते.
शेंड्यावरून पडून कोणी मेल्याचं ऐकलंयस का कधी?
माणसं दहावीस फुटांवरूनच पडून मरतात. तू जिथे
झोपशील अशी शंका निर्माण झाली, तिथे मी जागा
राहिलो. तेच माझं काम आहे.

  🙏🏻 *जय गुरुदेव* 🙏🏻

Thursday, August 22, 2019

आई तेथे खूप भयानक जंगल आहे (there is a jungle out there)

*👉चुक कुठे झाली ...*

_लेखक- अनामिक._

    एक खूप हुशार मुलगा होता. संपुर्ण शैक्षणीक आयुष्यात पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण होत राहिला. सायन्स मध्ये हमेशा 100% मार्क मिळवले.
     अशी बहुतेक मुलं इंजिनियरींग साईडला जातात, म्हणून त्याची ही निवड आय आय टी चेन्नई मध्ये झाली. तेथून त्याने बी टेक ची पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला आणि यूनिवर्सिटी ऑफ़ केलिफ़ोर्निया मधून तो एम बी ए झाला.
    आता इतके शिक्षण घेतल्यावर तेथे चांगली नोकरी तर मिळतेच. तो तेथेही हमेशा टॉपरच राहिला. तेथेच नोकरी करायला लागला.
     त्याचे पाच बेडरूम चे घर होते. चेन्नई च्याच एका खूपच सुंदर मुलीशी त्याचे लग्न झाले. एका माणसाला आपल्या जीवनात अजून काय पाहिजे? शिकून सवरुन इंजिनियर झाला, अमेरिकेत स्थाईक झाला, मोठ्या पगाराची नोकरी, बायको, मुले, सुखच सुख....
      पण दुर्भाग्याने आज पासून चार वर्षांपूर्वी त्याने तेथे अमेरिकेत, परिवारासह  आत्महत्या केली. आपली पत्नी आणि मुलांना गोळी मारून स्वतःला ही गोळी मारून घेतली.
     काय चूक झाली होती. शेवटी असं काय घडलं, गड़बड़ कुठे झाली.
      हे पाऊल उचलण्याआधी त्याने आपल्या पत्नीशी विचारविनिमय केला होता, मग एक लांबलचक सुसाईड नोट लिहिली आणि आपल्या या कृतीचे समर्थन केले आणि या परिस्थीतीत हाच सर्वोत्तम मार्ग होता असे लिहीले.
     त्यांच्या या केसचा आणि सुसाईड नोटचा कॅलीफोर्निया इन्स्टीट्यूट आॅफ क्लिनीकल फिजीकाॅलाॅजी ने  ‘काय चूक झाली ?' हे माहीत करण्यासाठी अभ्यास केला. 
      सर्वात आधी कारण काय होते ते सुसाईड नोट मधून आणि मित्रांकडून माहीत केले.
     अमेरिकेच्या आर्थिक मंदी मुळे त्याची नोकरी गेली. बरेच दिवस रिकामे बसून रहावे लागले. नोकरी शोधत राहीला. मग आपला पगार कमी करत गेला आणि तरीही जेव्हा नोकरी मिळाली नाही, घराचा हप्ता थकला, रस्त्यावर येण्याची वेळ आली.
   काही दिवस कुठल्याशा पेट्रोल पम्पावर तेल भरायचे काम केले. वर्षभर हे सर्व सहन केले आणि शेवटी पति पत्नी ने आत्महत्या केली...
       तज्ज्ञांनी या घटनेचा सार असा काढला की : या माणसाची मानसिकता यश मिळवणे यासाठीच तयार झालेला होती परंतु अपयशाचा सामना कसा करायचा याचे शिक्षण त्याला मिळालेच नव्हते.
      आता त्याच्या जीवनावर सुरुवातीपासून नज़र टाकू या.
      अभ्यासात खूप हुशार होता, हमेशा पहिल्या क्रमांकावरच उत्तीर्ण झाला. अशा बऱ्याचशा पालकांना मी ओळखतो, ज्यांची हीच इच्छा असते की त्यांचा मुलगा हमेशा पहिलाच यावा, त्याच्याकडून कधीच चूक होऊ नये. चूक झालीच तर जसे खूप मोठे पाप केले आहे आणि त्याने पहिला यावे यासाठी ते काहीही करायला तयार असतात.
     मग अशी मुलं काही जास्तच अभ्यासू असतात म्हणून खेळणे, कूदने, फिरणे, लढणे, भांडणे, मारामारी अशा संधी बिचाऱ्यांना फारच कमी मिळतात.
    बारावी उत्तीर्ण होऊन आले तर इंजीनियरिंग कॉलेज चे ओझे लादले बिचाऱ्यावर, तेथून निघाला तर एम बी ए, आणि अजून शिकतच आहे तर मोठ्या पगाराची नोकरी. आता मोठा पगार म्हटला की जबाबदारी पण मोठी म्हणजे मोठे मोठे  टार्गेटस् .
      हे जग फार कठोर आहे. आणि हे जीवन वेगवेगळ्या परिक्षा घेते. आपली कॉलेज ची डिग्री आणि मार्कशीट शी त्याला काही देणेघेणे नाही. तेथे किती मार्क मिळवले याच्याशी काही फरक पडत नाही.
      हे जीवन आपली वेगळी प्रश्नपत्रीका समोर ठेवते. आणि सर्व प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असतात, वेडे वाकडे, बिनबुडाचे, आणि दररोज परीक्षा घेते, कुठलेही वेळापत्रक नसते.
     एका इंग्रजी कादंबरीत एक गोष्ट वाचली होती. एक मेंढी चे पिल्लू आपल्या आईपासून दूर निघून जाते. पुढे जाऊन आधी म्हशींच्या कळपात घेरले जाते. त्यांच्या पायांखाली चिरडले जाण्यापासून कसेतरी वाचते. आता थोडेच पुढे चालले होते की एका कोल्हा त्याच्याकडे झेपावतो. कसेतरी झुडपांमध्ये घुसून ते आपला जीव वाचवते तर समोरून लांडगे येताना दिसतात. खूप वेळ झुडपांमध्ये लपून बसते, कसं तरी आई जवळ परत येते व म्हणते, "आई, तेथे तर खूप भयानक जंगल आहे." *There is a Jungle out there.*
     अशा या खतरनाक जंगलात जिवंत टिकून रहाण्याचेही प्रशिक्षण मुलांना जरूर द्या.

       विशेष म्हणजे मुलांना फक्त पुस्तकी किडा बनवू नका, मुलांना अभ्यासा बरोबरच धार्मिक, व्यावहारिक, सामाजिक संस्कार देने ही गरजेचे आहे. प्रत्येक परिस्थिति ला आनंदाने व धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता आणि त्यातून उभारण्याचे ज्ञान आणि मानसिकता मुलांमध्ये असणे आवश्यक आहे.   
     शेवटी मुलं आपली आहेत, प्रमाणापेक्षा प्रक्रिया आहेत.
_*लेखक- अनामिक.*_
(कुणी लिहिलं ते माहीत नाही पण प्राप्त प्रतिक्रिया मुळ लेखकास सादर समर्पित. मुळ *'हिंदी'* भाषेतील लेखाचा मी केलेला स्वैर मराठी अनुवाद.. -मेघःशाम ).
*प्रियांका चव्हाण, मुंबई* यांच्या संग्रहातील हिंदी कथा.

Tuesday, March 5, 2019

अटल पेन्शन योजना...

 *अटल पेन्शन योजना*_
----------------------------------------

-----------------------------------------
_अटल पेन्शन योजना ही योजना निवृत्ती नंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. मुख्यतः असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी, ज्यांच्यासाठी कुठलीही पेन्शन योजना उपलब्ध नाही, अशासाठी लाभदायक आहे. बँका व पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सहयोगाने ही योजना कार्यान्वित होणार आहे._

🧐 _*कोण सहभागी होऊ शकतं?*_ : _18 ते 40 वयोगटातील असंघटित क्षेत्रातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात._

🤔 _*किती रक्कम भरायची?*_ : _18 वर्षे वयाच्या व्यक्तीने दरमहा 42 रूपये भरल्यास या व्यक्तीला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक हजार रूपये दरमहा पेन्शन मिळणार आहे. याच धर्तीवर दरमहा 210 रूपये भरल्यास पाच हजार रूपये दरमहा पेन्शन मिळणार आहे. तसेच दर महिन्याचे योगदान बचत खात्यातून परस्पर नावे टाकण्याची सोयही यात आहे._

👍 _*सरकारचेही योगदान*_ : _या योजनेत ग्राहकाच्या योगदानाबरोबरच पहिली पाच वर्षे (2015-16 ते 2019-20) सरकारचेही योगदान राहणार आहे. हे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या 50 टक्के किंवा एक हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी असणार आहे._

🎯 _*अट काय?*_ : _ज्या ग्राहकांसाठी कुठलीही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध नाही आणि जे ग्राहक आयकर दाते नाहीत अशाच ग्राहकांना हे योगदान मिळणार आहे._

🤨 _*मृत्यू झाल्यास काय?*_ : _ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीस ही पेन्शन चालू राहील. दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एक रकमी परत करण्यात येणार आहे._

Monday, August 20, 2018

*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

*2 लाखांचे अपघात विमा शेतकरी बांधवांसाठी विना मूल्य/मोफत महाराष्ट्र शासन तर्फे।*

*गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 20171-8*

*ह्याचे फॉर्म कुठे भेटेल-*
तुमच्या गावाच्या कृषी अधिकाऱ्याकडे।

*ही योजना पूर्ण पने मोफत आहे व ह्या विमा योजनेचे रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यास तुम्हि कोर्टात केस टाकू शकता व त्याचा खर्च सरकार देईल।*

 बर्याचवेळेस माहिती नसल्याचा अभाव किंवा कायद्यातील गैरसमज ह्यामुळे कोणी सरकारी दरवाजे ठोकत नाही पण आपण आपला अधिकार हा घेअलाच पाहिजे. मान्य की मयत व्यक्तिची जागा ह्या पैशातून नक्कीच भरून निघणार नाही पण भविष्यातील काही काळतरी सुखकर जाईल.

माझ्या काही मित्रपरिवारात / ओळखीत शेतकरी अपघाती मृत्यू व अपंगत्व अशा बर्याच घटना घडल्या पण माहिती अभावी त्यांच्या कुटूंबांना ह्या संधी पासून मुकावे लागले, म्हणून ही माहिती पोस्ट रूपात आपल्या समोर मांडली आहे.

*नुकसान भरपाई रक्कम.*
1) शेतात काम करतांना/ अपघातात मृत्यू - २ लाख.
2) 2 अवयव निकामी होणे- 2 लाख
3) 1 डोळे निकामी होणे- 1 लाख.
4) 2 डोळे निकामी होणे - 2 लाख ..etc

*अपघाताचे प्रकार*

-रेल्वे/ रस्ता अपघात.
-पाण्यात बुडून मृत्यू.
-जंतू नाशक अथवा अन्य कारणाने विषबाधा.
-विजेचा धक्का अपघात.
-वीज पडून मृत्यू.
खून.
-उंचावरून पडून झालेला अपघात व मृत्यू.
-सर्प दंश/ विंचू दंश.
-नक्षल वाद्या कडून हत्या.
-जनावरांमुळे हल्याने मृत्यू.
-दंगल.
-अन्य कोणतेही अपघात.

*अनुषंगिक कागत पत्रे*

1) मृत्यू दाखला
2) शव चिकित्सा दाखला
3) स्तळ पंचनामा
4) पोलीस पाटील दाखला
5) FIR कॉपी
6) इंवेस्ट पंचनामा
7) अपंगत्व सर्टिफिकेट

*लागणारे कागत पत्रे*

१) 7/१२ किंव्हा ८'अ' किंव्हा 6 'ड' फेरफार
2) शेतकऱ्यांचे वय 10 ते 75
3) शेतकरी स्वतः वाहन चालवत   असेल आणि अपघात झाला तर वाहन चालवण्याचा वैध परवाना आवश्यक.

🙏🙏कृषि सहाय्यक 🙏🙏

Friday, August 17, 2018

जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही.

*🙏विचार धन🙏*

एक सावकार आपल्या कुत्र्यासोबत होडीतून नदी पार करीत होता.

कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला.

त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालवणारा नावाडी ही हैराण झाला.

 होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते.स्वतः तर बूडेल बरोबर सगळ्यानाच घेऊन बूडेल.

सावकाराच्या लक्षात ही गोष्ट आली, तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षाही जास्त गडबड करू लागला.

हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि नम्रपणे सावकाराला म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."

सावकाराने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.

कुत्र्याच्या नाका-तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांताने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला. आता त्याला नावेची गरज लक्षात आली.

थोड्या वेळाने त्याला ओढून पुन्हा नावेवर घेतले,मग मात्र तो चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसला.

त्याचे हे वर्तन पाहून सावकार चकीत झाला व म्हणाला "पाहिलं आधी किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय."

प्रवाशी हसून म्हणाला  "महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही.जेव्हा त्याला पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी आणि नावेची गरज,लक्षात आली.

*तात्पर्य*

*जो  पर्यंत अंगात रग आहे तो पर्यंत माणूस असाच वागतो. देवाचे अस्तित्वच विसरतो.देव किंवा सद्गुरू त्याला वारंवार जाणीव करुन देत असतात पण अंगातील मस्ती .. मायेत गुरफटून गेल्या मुळे देवाच्या किंवा गुरूच्या बोलण्या कडे त्यांच्या संकेताकडे तो दुर्लक्ष करतो ....*

*पण मग जेंव्हा फटके बसतात तेंव्हा तोच देवा शिवाय गुरु शिवाय  पर्याय नाही हे जाणून शरण येतो ..

Wednesday, August 15, 2018

Happy Independence Day...

"उत्सव 🇨🇮तीन रंगाचा "
     आभाळी आज सजला.. !
नतमस्तक मी त्या सर्वांनसाठी
     "ज्यांनी भारत देश घडविला"
Happy Independence Day...😘
       Jay Hind

Saturday, August 11, 2018

Abhi Abhi Red Me is company ne market me Naya mobile lounch kiya hai to Dosto niche diye Gaye link par click kar is mobile Ko jarur kharide...
.

Thursday, August 2, 2018

बोण्ड अळी यादी 2018 (Bond Ali List 2018)

           महाराष्ट्रात मागील वर्षी कपाशी या पिकावर बोण्ड अळी चा प्रभाव दिसला. त्यामुले महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचं कापसाचे उत्पादन कमी झालं तर काही शेतकऱ्यांना आपल्या पिकावरून नांगर फिरावं लागला होता. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी ६८०० रु. मदत जाहीर केली होती.
            त्यामुळे ज्या शेतकऱ्याला बोण्ड अळी चे अनुदान देय झाले आहेत. त्या शेतकऱ्याचेही यादी शासनाने जाहीर केली आहे. तरी सर्व बोण्ड अळी मुले आपले पीक बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना आपले नाव या शोधायचे असल्यास पुढील स्टेप फॉलो कराव्यात...
१. सर्वात प्रथम www.google.com या वेबसाईट वर जावे
२.नंतर bond ali  2018  list "Your sub district or district name"  हे search करावे
३. "Your sub district or district name"  या शब्दाच्या जागी आपल्या तालुक्याचे किंवा जिल्हाचे नाव टाकावे जेणेकरून तुमच्या स्वतःच्या तालुक्यातील किंवा जिल्हातील बोण्ड अळी अनुदान लिस्ट तुम्हाला दिसेल.
३. त्यानंतर ते सर्च करावे
४. त्यानंतर तुम्हाला google सर्च मध्ये १ नंबरच्या option मध्ये bold ali  2018 ______  हे  दिसेल.
५. _________ च्या जागी तुम्हाला तुमच्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे नाव दिसेल.
६. त्यानंतर त्यावर तुम्ही  क्लिक करा.
७. आणि नंतर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याची बोण्ड अळी अनुदान लिस्ट ची PDF ची फाईल मिळेल. व तुम्ही  ती डाउनलोड करावी
७. आणि त्या लिस्ट मध्ये तुम्ही तुमचे किंवा  तुमच्या गावाचे नाव शोधावे.......             
                                      Image result for bondali list 2018


Monday, July 30, 2018

देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका. पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा.

एकदा स्वामी विवेकानंद यांना एका विद्वान (अतिहुशार) व्यक्तीने जेवणासाठी आमंत्रित केले.
जेवणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर त्याने स्वामी  विवेकानंद यांना सहज
हसत हसत म्हणटले की,
     स्वामीजी बघाना काय मूर्ख लोक असतात, खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात.
किती मूर्खपणा आहे.
मला तर देव या जगात अस्तित्वात असल्याचे वाटत नाही. सगळे थोतांड आहे.
       तेहतीस कोटी काa,aय या जगात एकही देव अस्तित्वात नाही.
 सगळा मूर्खपणा आहे. देव कुठे दगडाच्या मूर्तीमध्ये असतो का?
       आणि तो व्यक्ती खदखदा हसू लागला.
            हे सर्व स्वामी विवेकानंदांनी
शांतपणे ऐकून घेतले व त्या व्यक्तीला म्हणाले की,
 " तुमच्या पाठीमागे भितींवर लावलेला फोटो तुमच्या वडिलांचा आहे का? "
त्या व्यक्तिने होकारार्थी मान डोलावून म्हणटले "हो ते माझे वडील होते, दोन वर्षापूर्वी त्यांचा स्वर्गवास झाला आहे."
          स्वामीजी म्हणाले तुम्हांला कसे माहीत की तुमचे वडील स्वर्गातच गेले.
     तो व्यक्ती निरूत्तर झाला.
त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला तो फोटो समोर आणुन ठेवण्यास सांगितलं.
     त्याने त्याच्या वडिलांचा फोटो समोर आणुन ठेवला.
  स्वामी विवेकानंदानी त्याला सांगितले कि, आता एक काम करा, या फोटोवर थुंका.
       तो व्यक्ती विवेकानंदांकडे आश्चर्याने पाहून म्हणाला.
"काहीतरीच काय सांगताय स्वामीजी, मी माझ्या वडिलांवर कसा काय थुंकू शकतो."
          स्वामी विवेकानंद म्हणाले, " तो तर कागद आहे. ते थोडेच तुमचे वडील आहेत."
त्यावर तो व्यक्ति म्हणाला "मी या फोटोमध्येच माझ्या वडिलांना पाहतो.
त्यामुळे मी त्यांचा अपमान करू शकत नाही."
   यावर स्वामी विवेकानंद म्हणाले कि "जसे तुम्ही श्रद्धेने तुमच्या वडिलांना या फोटोमध्ये पाहता तसेच प्रत्येक व्यक्ती मूर्तीमध्ये परमेश्वर पाहत असतो. त्यामध्ये त्यांचा भक्तीभाव व श्रद्धा लपलेली असते.
  हे ऐकून तो व्यक्ती खुप खजील झाला व विवेकानंदांचे पाय पकडून माफी मागु लागला.

     परमेश्वर हा कणाकणांमध्ये सामावलेला आहे.
कोणाला तो मातेच्या चरणामध्ये दिसतो तर कोणाला दिनदुबळ्यांमध्ये दिसतो.

      संत तुकाराम महाराज म्हणतात.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा.
 
 देव जाणून घेण्यासाठी पॆसा नाही तर खरा भक्तिभाव लागतो.
    देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका.
पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा

Wednesday, July 25, 2018

मागील पिढी आणि आजची पिढी

नमस्कार, मी प्रजोत कुलकर्णी आज मी मागील पिढी आणि सध्याची पिढी यावर लेख लिहित आहे, बरेच दिवस हा लेख लिहायचा विचार होता पण वेळेअभावी जमले नाही असो पण लेख लिहायचे कारण म्हणजे सध्याची पिढी आणि मागील पिढी यामध्ये भरपूर तफावत जाणवत आहे. माझ्या २६ वर्षाच्या आयुष्यात बरेच बदल मला जाणवले. मी माझ्या आयुष्यावरून हा लेख लिहित आहे. पण ही तफावत जी आहे ती सर्वांच्याच बाबतीत दिसून येईल तसेच सर्वांच्या जुन्या आठवणी जाग्या होतील. मी लहानपणापासून सुरवात करत कसे बदल घडत गेले ते मांडायचा प्रयत्न करतो आणि मग सगळ्यात शेवटी एक सारांश लिहितो.मी लहान असताना सकाळ संध्याकाळ घरात माझ्याकडून श्लोक, स्तोत्रे म्हणून घेतली जात होती. उदा. सदा सर्वदा, शुभंकरोती इ. पण आजकाल आईवडील दोघेही नोकरी करतात ते सकाळी घरातून निघाले कि पुन्हा रात्री घरी परततात, त्यामुळे मुलांकडून हे म्हणून घ्यायला वेळच मिळत नाही. कोणी नातेवाईक घरी आले किंवा आपण एखाद्या नातेवाईकाकडे गेलो कि मला ते कविता, गाणी, नाच  वगैरे येतं का विचारायचे, त्यावेळी बडबडगीते म्हणत होतो, नाच रे मोर सारख्या गाण्यावर नाच करून दाखवत होतो, पण आता तीच परिस्थिती बदलली आहे. मुले गाणी म्हण किंवा नाच कर असे म्हणाल्यावर मुन्नी आणि शीला यासारख्या गाण्याशिवाय त्यांना काही आठवतच नाही, आणि आपण किती सुंदर नाच केला किंवा गाणे झाले म्हणून टाळ्या वाजवतो.थोडे मोठे झाल्यावर अंगणात किंवा मैदानात जे खेळ खेळायचो त्यातील काही खेळ जे परदेशातून भारतात आले ते आताची मुले कॉम्पुटर, लॅपटॉप, आयपॅड वर खेळतात. लपंडाव, सूरपारंब्या, तळ्यात-मळ्यात, लगोरी, गोट्या, विष अमृत हे खेळ तसेच मैदानी खेळाबरोबरच बैठे खेळ उदा. सापशिडी, ल्युडो, काचा कवड्या आणि बरेच बारीकसारीक खेळ हे आजच्या मुलांना माहित देखील नाहीत. तसेच या प्रकारच्या खेळातून व्यायामही चांगला होत असे आणि बुध्दी हि तल्लख होत होती. त्या काळी व्यायाम हा प्रकार वेगळाच होता जोर, उठाबाश्या, दोरीउड्या, सूर्यनमस्कार, धावणे असे व्यायाम आम्ही करत होतो आता व्यायाम म्हंटले कि डम्बेल्स घ्यायचे, मशीन वर धावायचे,  वजन उचलायचे म्हणजे झाले.
त्यावेळी आहार हा हि खूप पौष्टिक असत होते, आजकाल ची मुले फक्त जाहिरात बघून नुडल्स खा कुठे पास्ता खा, अजून बाकीचे फास्टफूड खा असे करतात, त्यावेळी नाश्ता केला तरी तो शरीराला चांगला असा असे उदा. पोहे, शिरा, उपमा आणि हे शक्यतो रोज नसायचे रोज सकाळी सकाळी गरमागरम भाकरी त्यावर मस्त तूप मीठ लावून खायचो. तसेच रोजचा आहार पण सकस असत होता. डावा उजवा सगळा रोजच्या रोज पानात असत असे उदा. चटण्या, कोशिंबीर, लोणचे इ. त्यामुळे शरीराला लागणारी जीवनसत्व व्यवस्थितरीत्या मिळत होती याचा परिणाम म्हणजे शरीराचीही वाढ खूप चांगली होत असे.
त्यावेळेची शिक्षणपध्दती पण वेगळी होती, रोज सकाळी प्रार्थना, मग तास सुरु होत असत, शाळा सुटताना परत शेवटी प्रार्थना, वंदे मातरम असायचे यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्यालोकांचा आदर यासारख्या गोष्टी शिकायला मिळायच्या, यातील बऱ्याच गोष्टी सध्या लुप्त झाल्या आहेत. त्यावेळेचे शिक्षकही खूप काटेकोर होते, मला शिक्षकाने मारले ती तक्रार घेवून जर घरी गेलो तर घरात दोन रट्टे मिळायचे, मग का मारले हे विचारले जायचे. आजकाल मुलेच शिक्षकांना मारतात वर त्याचे पालक त्यांना काहीच बोलत नाहीत. मुलांवर अभ्यासाचा प्रचंड ताण टाकला जातो, त्यात पालकांचा दोष नाही आहे हि यंत्रणा चुकीच्या पध्दतीने काम करत आहे. जर या स्पर्धेच्या युगात मुलांना टिकायचे असेल तर हे सर्व करावे लागते, मुलांच्या दप्तराचे ओझे हे त्यांच्या वजनापेक्षा जास्त आहे. पण हे सर्व करताना त्यांचे बालपण कुठेतरी हरवले जात आहे हे कुणाच्या लक्षात येत नाही. पालकांना आपण घेतलेले कष्ट फक्त दिसतात पण जे बालपण आपण जगलो (कठीण प्रसंग नाही तर खेळणे बागडणे इ.) ते आजकाल च्या मुलांना जगायला मिळत कि नाही हे कोण पाहत नाही. आज शाळा सुरु झाली कि सकाळी क्लास नंतर शाळा, मग पुन्हा संध्याकाळी क्लास, ज्या दिवशी सुट्टी असेल तेव्हा सुट्टीचे क्लास वेगळे, काय चाललाय हे ?. बरं शाळेला सुट्टी पडेल तेव्हा ते क्लास वेगळे, वेगळी वेगळी शिबिरे यात मुलांना बालपण काय असते हेच कळत नाही, त्यांना बालपण म्हणजे एक शिक्षा वाटू लागली आहे. एवढे करून जेवढे व्यवहार ज्ञान त्यांना मिळाले पाहिजे ते मिळताच नाही आहे उदा. माझ्या आधीची पिढी अजूनही आकडेमोड करताना तोंडी करते आणि मी कागद पेन किंवा कॅल्क्युलेटर चा वापर करतो, पण हे हि तेवढेच खरे कि मी जितकी आकडेमोड तोंडी करू शकतो तेवढी आज काल ची मुले करू शकतील कि नाही ती शंका आहे. मला पहिला मोबाईल मी एम. एस.सी ला असताना घरच्यांनी दिला होता, आणि गाडी मी नोकरीला लागल्यावर घेतली पण आजकालच्या शाळेत जाणाऱ्या लहान लहान मुलांकडे महागडे मोबाईल, गाड्या दिसून येतात.
लिहायचे झाले तर बरेच काही लिहिण्या सारखे आहे पण जे मला ४ मुद्दे (वरील ४ भागात मांडलेले) महत्वाचे वाटतात त्यावर मी सारांश लिहित आहे.
  • संस्कार : मुलांना चांगल्या संस्काराची गरज खूप आहे, जर का लहानपणीच चांगले संस्कार मुलांवर झाले तर ते त्यांना भविष्यात हि उपयोगी पडतात. ८-१५ दिवस वर्षातून किंवा सहा महिन्यातून मुलांना संस्कार शिबिरात पाठवले म्हणजे त्यांच्यावर संस्कार होत नाहीत, ते रोजच्या जीवनात आचरणात आणावे लागतात. त्यामुळे आपल्या मुलांना योग्य संस्कार होत आहेत कि नाही याची काळजी प्रत्येक पालकाने घेणे जरुरीचे आहे.
  • खेळ/व्यायाम : खेळ आणि व्यायाम यामुळे आपले शरीर घडते ते जर का योग्य नियोजन करून मुलांना त्याचे फायदे सांगितले तर ते त्यांच्यासाठी उत्तम होते. प्रत्येक खेळातून काहीतरी शिकण्यासारखे आहे. तसेच जो व्यायाम केला जातो तो जन्मभर त्यांना उपयोगी पडेल याचा विचार केला गेला पाहिजे. यामुळे आपले जे पारंपारिक खेळ आहेत हेही जतन केले जातील आणि याचा उपयोग मुलांच्या आयुष्यात नक्की होईल.
  • आहार : जो आहार मुलांना (आपल्यालाही) मिळाला पाहिजे तो आजकाल मिळत नाही आहे त्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होत चालली आहे. जर का सकस आणि चौरस आहार  आपल्याला मिळाला तर आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
शिक्षण : जे आज शिक्षण दिले जात आहे त्यामुळे मुलांच्यावर मानसिक ताण वाढत आहे. त्याच्या वयाच्या मानाने ते ओझे त्यांना पेलणे अवघड जात आहे, याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे. त्यांच्या अभ्यासाचे योग्य ते नियोजन करता आले पाहिजे. त्यांना व्यवहार ज्ञान शिकवायचा प्रयत्न केला गेला पाहिजे. सोप्या शब्दात शिकविण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. जे करून त्यांना ते अवघड जाणार नाही व लगेच समजेल.

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...