लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी.
Popular Posts
-
*🙏विचार धन🙏* एक सावकार आपल्या कुत्र्यासोबत होडीतून नदी पार करीत होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्या...
-
महाराष्ट्रात मागील वर्षी कपाशी या पिकावर बोण्ड अळी चा प्रभाव दिसला. त्यामुले महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचं कापसाचे उत्पादन कमी...
-
🌹 *गुरू - शिष्य* 🌹 🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜 गुरूने शिष्याला जंगलात नेलं आणि १०० फुटांपेक्षा उंच झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊन येण्याची आज्ञ...
Sunday, August 6, 2017
Thursday, August 3, 2017
Monday, July 17, 2017
छत्रपती शिवाजी महाराज...
@@!!""जर "शिवाजी" हा इंग्लंडमध्ये जन्माला आला असता तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते""!!@@
(लॉर्ड माउंटबँटन,इंग्लंड)!!
@@!!""भारताला जर स्वातंत्र्य मिळवुन दयायचं असेन तर एकच पर्याय आहे---शिवाजी""!!@@ (नेताजी सुभाषचंद्र बोस)
@@!!""नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या 'हिटलर'ची गरज नाहीए तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी च्या इतिहासाची गरज आहे""!!@@
(अँडॉल्फ हिटलर)
@@!!""शिवाजी हे फक्त नाव नाहीतर शिवाजी ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो""!@@
(स्वामी विवेकानंद)
@@!!"" जर शिवाजी आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास 'सुर्य' संबोधले असते""!!@@
(बराक ओबामा,अमेरिका)
@@!!" जर शिवाजी महाराज अजुन १० वर्षे जगले असते तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता"!@@
(इंग्रज गव्हर्नर)
@@!!"" काबुलपासुन कंदहारपर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली.इराक,इराण,तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं पण हिंदोस्थानात मात्र आम्हाला "शिवाजी" ने रोखलं! सर्व शक्ती मी शिवाजीचा पराभव करायला खर्च केली पण शिवाजी काही माझ्या हाती नाही आला!
या अल्लाह!! दुश्मन दिया भी तो कौण दिया?
"सिवा भोसला"जैसा दिया.
अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है""!!@@
(छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने नमाज पढताना काढलेले उदगार,संदर्भ-खाफिखानाची बखर)
@@!!"" उस दिन सिवा भोसला ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा.
मै अब निंद मे भी सिवा भोसला से मिलना नही चाहता""!!@@
(शाहीस्तेखान,संदर्भ- खाफिखानाची बखर)
@@!!"" क्या उस गद्दारे दख्खनसे "सिवा" नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है इस दरबार में.लानत है ऐसी मर्दानगी पे""!!@@
(बडी बेगम अलि आदिलशाह)
@@!!"" Shivaji,The King of India"!!@@
(London Gadget-१७ व्या शतकातलं युरोप खंडातील Top वर्तमानपत्र)
वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो,जागतिक दर्जाचे योद्दे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच!!!
महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय बाकि सर्वजण हे परकिय सरदार आणी त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते!!
ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणी त्याच्या मनात शिवाजी या नावाचा खौफ निर्माण केला तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता तर तो "अबू तालिबानचा नवाब होता,तुर्कस्तानचा नवाब होता!! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता.त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता.
पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणी काही कळायच्या आत पसार झाले! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी या नावाची इतकि भिती घेतली कि शिवाजीला आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाहीए असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता!!
तो बेहलोलखान पठाण,सिकंदर पठाण,चिडरखाण पठाण इ.ज्यांना महाराजांनी रणांगणावर धु दु धुतलं हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते!!
दिलेरखान पठाण!! मंगोलियन सरदार,मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा!
महाराजांनी याचा पराभव केला!!
सिध्दी जौहर,सिध्दी सलाबत खान हे इराणी होते,इराणचे शुर सरदार होते! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं!!
उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला,तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता म्हणजे आत्ताच्या रशियाचा!! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली.कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव!!(१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणी या ३०,००० पैकि एकही जिवंत राहीला नाही आणी १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही)
१७व्या शतकात युरोप खंडित "लंडन गँझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं.जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर पहिली बातमी छापली आणी त्यात महाराजांचा Shivaji,The King of India असा उल्लेख केला!!
व्हिएतनाम या छोट्याशा राष्ट्राने (पुण्याएवढया) बलाढय अमेरिकेवर विजय मिळविला कारण "शिवाजी"!! तर व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्षांनी (नाव आठवत नाहीए) त्यांच्या समाधीखाली असं लिहीलंय कि," शिवाजी महाराजांचा एक मावळा इथे विश्रांती घेतोय)!
औरंगजेबाने ऐन उमेदीची २७ वर्षे महाराष्ट्रात वाया घालवली.होय! वायाच घालवली कारण त्याने २७ वर्षे मराठयांशी निकराची झुंज दिली पण १ इंच महाराष्ट्राची भुमी तो जिंकु शकला नाही,कदाचित ही २७ वर्षे त्याने दुस-या प्रदेशांवर घालवली असती तर तो अर्ध्या पृथ्वीचा तो अधिपति झाला असता इतक्या बलाढय फौजेचा तो बादशाह होता!!
मग सांगा का छत्रपति शिवराय आंतरराष्ट्रीय स्तरावरील योद्दे नव्हते!
नक्किच महाराज हे जागतिक दर्जाचे सेनानी होते हे यावरुन सिध्द होतंय!!
पण दुर्देव अख्या जगाला माहीती आहे महाराज काय होते ते पण भारतातील जनतेलाच माहीती नाही कारण तसं असतं तर महाराजांना आम्ही जाती आणी धर्माच्या बंधनात अडकवुन मर्यादित ठेवलं नसतं!!!!!
पण आता हिथुन पुढे ही चुक करायची नाही तर महाराजांचा उल्लेख करताना फक्त मराठयांचा राजा असं न करता "हिंदुस्थानचा सम्राट,शहेनशाह-ए-हिंदुस्थान,भारताचा राजा" अशिच करावी ही विनंती कारण आपल्याला महाराजांना जागतिक स्तरावर न्यायचंय.!!
🙏जय जिजाऊ🙏जय शिवराय🙏
(स्त्रोत : whatsup)
Sunday, January 1, 2017
Wednesday, July 13, 2016
मानुसकीच्या माणसांचा...
मला प्रत्येक ठिकाणी सैराट
दिसत होता,
कारण सर्वच ठिकाणी
जातीधर्माचाच मोठा वाद होता...!!
ज्याला त्याला आपल्या जातीधर्माचाच
खासदार व्हावा अस वाटत होत,
म्हणुन दुसर्या जातीधर्माचा मंत्री आपल्या
भागात मिरवावा हेही खपत नव्हत...!!
जातीविषयी कोणी काही बोलल तर
त्याला सहन होत नव्हत,
परंतु आईबापाला वृद्धाश्रमात पाठवुन
बायकोसोबत फिरण मात्र त्याला जमत होत...!!
बरेच जण जातीधर्मासाठी
काहीही करायला तयार असतात,
आणि म्हटल जा लढ देशासाठी
तर काही बोलायला तयार नसतात...!!
हे असच का होत
मला कळत नाही ,
पण हे सर्व पाहुन डोळ्यातील
अश्रु मात्र नक्कीच आवरत नाही...!!
देवाने तर साधाभोळा
माणुस तयार केला ,
मात्र पृथ्वीवर आल्या नंतर
कोणी हिंदु कोणी मुसलमान झाला...!!
मला माहीत नाही
कोण कोणता धर्म मानतो,
पण मी मात्र माणुसकी
हाच खरा धर्म जानतो...!!
अरे सोडा तो जातधर्म जो
तोडतो माणसाला माणसापासुन,
आणि या एकत्र सर्व
माणुसकी या धर्माची मुले बनुन...!!
मग पहा हा आपला
भारत देश कसा बनतो आदर्श जगाचा,
सर्व जगच हेवा करेल आमच्या
या देशातील माणुसकीच्या माणसांचा...!!
संजय रा. कोकरे
अमरावती
मो नं. 9561730189
twitter: www.twitter.com/kokaresanjay
Tuesday, June 21, 2016
...शासन आणि शेतकरी...
"विधात्या तू इतका कठोर का झालास ?
एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला
विसरतोस . ."
हे प्रसिद्ध नटसम्राट या मराठी चित्रपटातील संवाद आजच्या परिस्थितीशी शेतकर्यांसाठी तंतोतंत लागु पडतो अस मला वाटत. ज्या निसर्गाने शेतकर्यांना जन्म दिला त्या निसर्गाने या शेतकर्याकड पाठ फिरवली आहे आणि जी नेते मंडळी याच शेतकर्यांच्या पाठींब्यामुळे आज मंत्रालयात बसली आहे तीही या शेतकर्याची मदत करण्याऐवजी थातुरमातुर योजना लागु करुन शेतकर्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न करत आहे.
मागील काही वर्षापासुन दुष्काळाचे संकट या शेतकर्यांवर घोंगावत आहे. या दुष्काळामुळे शेतकर्यांना शेतीत पिक पिकतच नाही आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांच्या शेतात पिकच पिकत नाही आहे त्यांनी शेतातुन उत्पन्न घेण्यासाठी घेतलेले कर्ज भराव तरी कोठुन ? हा एक मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्मान झाला.
मागील काही वर्षापासुन दुष्काळामुळे शेतकर्याला शेतीपासुन काहीही उत्पन्न मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकर्याला शेती साठी घेतलेले पिक कर्ज भरता आल नाही. त्यामुळे शेतकरी हा बँकेचा थकबाकीदार राहीला. त्यामुळे बँकेनी शेतकर्यांना पुढील हंगामासाठी पिक कर्ज दिले नाही. म्हणुन शेतकर्यांनी आपल्या घरातील दागदागिने विकुन किंवा सावकाराकडुन कर्ज घेउन त्याने आपले शेत पेरले. परंतु निसर्गाने पुन्हा त्याची थट्टा केली आणि पुन्हा दुष्काळ पडला. या दुष्काळामुळे पुन्हा शेतकर्याला काहीही उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज (सावकाराकडुन म्हणा की बँके कडुन म्हणा) भरता आले नाही किंवा विकलेले दागदागने ही वापस मिळवता आले नाही. त्यामुळे सावकारांचे कर्ज किंवा बँकेचे कर्ज कसे भरावे ? आणि आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह कसा करावा? असे प्रश्न शेतकर्यासमोर निर्मान झाले.
शासन सुद्धा संकटात सापडलेल्या या शेतकर्यांची हवी तशी मदत करण्यास पुढे येत नाही आहे. शासनाने दुष्काळामुळे पिक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे ठरवले. मात्र कोणाचे? तर त्यांचे ज्यांनी मागील वर्षी कर्ज घेतले आहे . मात्र मागील काही वर्षापासुन पडत असलेल्या दुष्काळामुळ काही शेतकरी मागील दोन ते तीन वर्षापासुन बँकेचा थकबाकीदार झाला आहे. त्यामुळे या वर्षीच्या पिक कर्ज पुनर्गठन योजनेसाठी तो पात्र ठरत नाही. त्यामुळे शेतकर्यांसाठी ही योजना म्हणजे शासनाने त्या शेतकर्यांसोबत केलेली थट्टाच आहे असा भास होतो आहे.
शासनाला जर शेतकर्यांसाठी काही करायचेच होते किंवा शेतकर्यांची मदतच करायची होती तर शेतकर्यांना संपुर्ण कर्ज माफी शासनाने करायला पाहीजे होती. जेणे करुन त्यांच्या वरील बँकेचे कर्ज संपल असत आणि नव्याने बँकेतुन कर्ज घेउन शेतकर्यांनी नव्या जोमाने शेती करण्यास सुरुवात केली असती. किंवा कमीत कमी शासनाने सरसकट सर्व थकबाकीदार शेतकर्यांचे पिक कर्जाचे पुनर्गठन करणे आवश्यक होते. परंतु शासनाने मात्र फक्त मागील वर्षी पिक कर्ज घेणार्याच शेतकर्यांचे पिक कर्ज पुनर्गठन करण्याच ठरवले. त्यामुळे आधीच थकबाकीदार असणार्या शेतकर्याच्या जखमावर शासनाने मीठ चोळण्याच काम केल आहे. यावरुन शासन शेतकर्याविषयी उदासिन आहे अस दिसुन येते आणि हे कृषिप्रधान असणार्या या देशासाठी नक्कीच घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही....
संजय रा. कोकरे
रा. पळसखेड
ता. चांदुर रे. जि. अम.
मो.नं. 9561730189
Email:
s.r.kokare1992@gmail.com
Thursday, June 16, 2016
ठेंगा...
१५ जुनला आतेभावाचा अड्मिशन फॉर्म भरण्याकरिता अमरावतीला गेलो होतो. तस म्हटल तर मलाही जिल्हाधिकारी साहेबांना एका विषयान्वे एक निवेदन द्यायच होत. म्हणुन अमरावती जिल्हधिकारी कार्यालयाला मी गेलो आणि जिल्हाधिकारी साहेब काही कामानिमीत्त बाहेर गेले असल्यामुळ निवासी जिल्हीधिकारी साहेबांना निवेदन दिले व त्याची पोहच पावती घेतली. तेथुन आम्ही अमरावती बस डेपो जवळ गेलो. पोहच पावतीची काही झेरॉक्स काढण्याकरीता मी एका झेरॉक्स च्या दुकानामध्ये गेलो. दहा झेराक्स काढल्या. त्याला किती रुपये झाले म्हणुन विचारणा केली तर त्याने दहा रुपये सांगितले. तेव्हा त्यांला खुप महागाई झाली अस सहजच म्हटल व त्याला १० रु. देउन तेथुन जावयास निघालो.
तेवढ्यात त्या दुकादाराने आम्हाला परत बोलविल. आम्ही परत गेलो. त्याने त्याच्या दुकानातुन दोन एक रुपयाची नाणी काढली. आम्हाला दाखवली पण आम्हाला काहीही सुचत नव्हत हा व्यक्ती नक्की करतोय तरी काय?. त्याने आम्हाला ही दोन नाणी बघा तरी म्हणुन आग्रह केला. मग मी ती नाणी बघितली व त्याला सांगितल की ही दोन्ही एक रुपयाची नाणी आहेत. पण त्याने पुन्हा प्रश्न केला की यात तुम्हाला दिसतय तरी काय?
तेव्हा मी त्यात थोड लक्ष देउन बघितल तर एका जुन्या नाण्यावर चित्र होत अन्नधान्याच तर एका नविन नाण्यावर चित्र होत हातातील बोटांपैकी असणार्या अंगठ्याच.
तेव्हा त्याने मला विचारणा केली की मला काय म्हणायच ते आता काही तुम्हच्या लक्षात आल का?. माझ्या पण लक्षात आल होत की त्याला काय म्हणायच होत तर. कारण पुर्वी एक रुपयात अन्नधान्य पण मिळायच आता त्याच एका रुपयात मिळत ते जे आपण आंगठा दाखवुन लोकांना आपल्या भाषेत सांगतो तो म्हणजे " ठेंगा"....
संजय रा. कोकरे
अमरावती
मो नं. 9561730189
email:
s.r.kokare1992@gmail. com
Monday, June 13, 2016
शासनाची मेंढपाळाविषयी उदासिनता
शासनाच्या आधुनिकतेच्या धोरणामुळे अनेक पारंपारिक व्यवसायांवर गदा आलेली आहे. परंतु पारंपारिक व्यवसाय करणार्या या समाजाचे पुनर्वसन करण्यासाठी मात्र शासनाने कोणत्याही प्रकारचे पाउल उचलले नाही ही एक शोकांतिका आहे. शासनाच्या आधुनिकतेचे धोरणाचे स्वागत आहेच पण या धोरणामुळे ज्या समाजाच्या वंशपारंपारिक व्यवसायावर गदा आली त्यांचेही कुठेतरी पुनर्वसन व्हायला हवे असे माझे मत आहे. शासनाने आजवर वन्यजीव सरंक्षन कायदा, प्राणिमात्रा छळविरोधी कायदा यासारखे कायदे करण्यात आले. परंतु या कायद्यामुळे अनेक समाजाच्या पारिपारिक व्यवसायावर गदा आली व त्यांच्या उपजिवेकेचे साधन त्याच्यापासुन हिरावुन घेतल्यामुळे त्या समाजातील लोक ही दोन वेळेच्या अन्नालाही महाग झाली आहेत. परंतु शासनाने त्यांचे पुनर्वसन करण्याची तसदी घेतली नाही.
धनगर समाज हा ही जंगलोजंगली भटकंती करणारा समाज. हा समाज नागरी समाज व्यवस्थेपासुन दुर राहणारा. या समाजातील अनेकाजवळ ना राहायला घर ना कसायला जमिन. यांचा उदरनिर्वाह चालतो तो फक्त शेळी मेंढीपालन व्यवसायावर. परंतु शासनाने जंगलात शेळीमेंढींना केलेल्या बंदीमुळे हा समाज अक्षरश: उघड्यावर आला. यामुळे या समाजाच उदरनिर्वाहाचे साधन या समाजापासुन हिरावुन घेतल्या गेल. शेड बांधुन शेळीमेंढीपालन व्यवसाय करणे ही योजना बहुतेक मेंढपाळाजवळ शेतीच नसल्यामुळे फोल ठरली आहे. त्यामुळे हा समाजातील लोकांवर उपासमारीची वेळ आली. परंतु धनगर समाजाच कुठही पुनर्वसन करण्याची तसदी मात्र शासनाने घेतली नाही. त्यामुळे धनगर समाजाचा रोष हा शासना विरुद्ध वाढतच आहे.
भारतात वन्यजीव सरंक्षन कायदा अस्तित्वात आल्यानंतर गारोडी समाजाने साप पकडणे, त्यांचे विष काढणे हा गुन्हा ठरु लागला. त्यामुळे गारोडी समाजाच्या वंशपारपारिक व्यवसायावर गदा आली आणि त्यांना उदर निर्वाह करणेही कठीन झाले. तेव्हा विदेशातील रोम्युलस व्हीटेकर या पर्यावरण वादी व्यक्तीने सर्पदंशाच्या लसी करीता कच्चा माल म्हणुन सापाचेच विष उपयोगात येते हे लक्षात घेउन तामिळनाडु येथाल चेन्नई येथील मद्रास सुसर याठिकाणी १९७८ साली "ईरुला गारोडी सहकारी उद्योग संघ" स्थापन केला. तामिळनाडु सरकार ने या सहकारी संघाला आठ हजार साप दोन जिल्ह्यातुन पकडुन विष काढण्याची परवानगी दिली. सापांना पकाडायच, दोन चार हप्ते त्यांना पाळायच, आणि यादरम्यान त्यांत विष काढुन त्या सांपाना व्यवस्थितरित्या जंगलात सोडुन द्यायच नंतर त्या सापाच्या विषावर प्रक्रीया करुन त्या पासुन सापाच्या विषासाठी लस तयार करायची. असा हा प्रकल्प.
या प्रकल्पामुळे बेरोजगार झालेल्या संपुर्ण नव्हे तरीही काही गारोडी समाजाच्या युवकांच्या हाताला काम आल. गारोडी समाज आपली उपजिविका करण्याकरिता एक मार्ग काढला. परंतु या समाजाच्या हिताच्या दृष्टीने असा प्रकल्प राबविण्याच आपल्या शासनाला न सुचता ते एका विदेशी व्यक्तीला सुचाव हे नक्कच आश्चर्यजनक आहे.
अश्याच प्रकारे धनगर समाज हा आपली शेळी मेंढर घेउन जंगलांनी फिरत असतो. शेळी मेंढर हे काटेरी झुडुप, गवताशिवाय काहीही खात नाही. उलट शेंळी मेंढी खात असलेले गवत मोठे झाल्यानंतर वाळायला लागते ते गवत वाळल्यानंतर त्या गवतामुळे जंगलामध्ये वणवा लागण्याची शक्यता असते. त्या वणव्यामध्ये लाखो रुपयाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होते. हे गवत वाळण्यापुर्वीच शेळीमेंढी खात असल्यामुळे ते एकाप्रकारे नैसर्गिक साधनसंपत्तीच हे प्राणी संवर्धनच करत असतात. शेळीमेंढीपासुन कोणत्याही वन्य प्राण्या पासुन कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. शेळी मेंढीच्या लेंढीखतामुळे जमिन ही उत्पादन वाढवते हा आतापर्यंतच्य्या शेतकर्याचा अनुभव आहे त्यामुळे वनक्षेत्रातील जमिनीला फायदाच आहे, तरीही शासनाने जंगलामध्ये शेळीमेंढी चराई बंदी केली ही एक आश्चर्यजनक बाब आहे.
रोम्युलस व्हिटेकर या मान्यवराने ज्याप्रकारे गारोडी समाजासाठी "ईरुला गारोडी सहकारी उद्योग संघ" स्थापन केला त्याच प्रमाने धनगर समाजातील बांधवावर प्रत्येकी वनक्षेत्रातील काही वृक्षांची संवर्धनाची जबाबदारी देउन शेळी मेंढी चराई पासेस देणे आवश्यक आहे जेणेकरुन धनगर समाजाचा उपजिवेकेचा प्रश्नही मिटेल व वनक्षेत्रातील वृक्षांचे संवर्धनही होईल...
Sunday, June 12, 2016
पावसाच्या सरी
कधी कधी वाटत डोळ्यात अश्रु किती लवकर येतात,
पण पावसाच्या सरी मात्र लवकर येत नाही !!
अस वाटत की या पावसाच्या सरीनांही आम्हा शेतकर्यांच्या आत्महत्या बघितल्याशिवाय राहवत नाही...!!
पण पावसाच्या सरी मात्र लवकर येत नाही !!
अस वाटत की या पावसाच्या सरीनांही आम्हा शेतकर्यांच्या आत्महत्या बघितल्याशिवाय राहवत नाही...!!
Saturday, September 19, 2015
शेतकरी....
आभाळालाही रडु आल आता
पाहुन आमची ही दुर्दशा !
आम्हाला ही विचार पडला आमच्या या
अवस्थेवर रडाव की लोकांना दाखवावा हशा !!
कित्येक जण आतापर्यंत मेले
या शेतीच्या कर्जापायी!
पिक पिकवासाठी कर्ज घेतो आम्ही पण कर्ज
भरण्यासाठी पिकच आमच्या जवळ येत नाही!!
सरकार आमच्या मयतीची प्रचार सभा करते न
करते पदयात्रा आमच्या मयतीच्या गर्दीची!
म्हणुन त्यांना अस वाटत नाही थांबाव आमच
मरण अन् बंद करावी वाट आपल्या प्रसिद्धीची!!
आमचे बिन बापाची पोर बसतात
दिवाळीच्या,दसर्याच्या दिवशीही घराच्या बाहेर उपाशी पोटी!
अन धनधागड्यांची पोर
मस्त खात राहतात तुप रोटी.!!
पण लक्षात ठेवा जेव्हा शेतकरी
शेती करण बंद करेल!
त्या दिवशी शेतकरी नव्हे तर
अख्ख जगच उपाशी मरेल!!
अख्ख जगच उपाशी मरेल!!
संजय रा. कोकरे
अमरावती
मो.नं. 9561730189
पाहुन आमची ही दुर्दशा !
आम्हाला ही विचार पडला आमच्या या
अवस्थेवर रडाव की लोकांना दाखवावा हशा !!
कित्येक जण आतापर्यंत मेले
या शेतीच्या कर्जापायी!
पिक पिकवासाठी कर्ज घेतो आम्ही पण कर्ज
भरण्यासाठी पिकच आमच्या जवळ येत नाही!!
सरकार आमच्या मयतीची प्रचार सभा करते न
करते पदयात्रा आमच्या मयतीच्या गर्दीची!
म्हणुन त्यांना अस वाटत नाही थांबाव आमच
मरण अन् बंद करावी वाट आपल्या प्रसिद्धीची!!
आमचे बिन बापाची पोर बसतात
दिवाळीच्या,दसर्याच्या दिवशीही घराच्या बाहेर उपाशी पोटी!
अन धनधागड्यांची पोर
मस्त खात राहतात तुप रोटी.!!
पण लक्षात ठेवा जेव्हा शेतकरी
शेती करण बंद करेल!
त्या दिवशी शेतकरी नव्हे तर
अख्ख जगच उपाशी मरेल!!
अख्ख जगच उपाशी मरेल!!
संजय रा. कोकरे
अमरावती
मो.नं. 9561730189
Wednesday, September 2, 2015
शेतकर्याईचा कोणी वाली नसते..
गण्या न राम्या बोलत बसले होते. दोघायच्या चेहर्यावरुन लयच गंभीर दिसुन राह्यले होते. तेवढ्यात राम्या गण्यासोबत बोलाले पुढे येते.
राम्या: काय राज्या गण्या मले महीत पडले की कांद्याचे भाव एंशी रुपय किलोच्या वर गेले.
गण्या: हाव ना राज्या. अन कांद्याचे भाव कमी कराईसाठी सरकारन परदेशाहुन कांदा बलावला म्हणते राज्या. कांदा लई माग झाला राज्या म्या त खान च सोडुन देल्ला कांदा..
राम्या: पण गण्या म्या वावरात कांदा घेतला. तो म्या बाजारात आणला अन् राज्या तीन रुपय किलो च भाव आला. माये कांद्याचे पिकासाठी लागलेले पैसही नही लिगाले राज्या.
गण्या: राम्या तसच असत बे ते जोपर्यंत आपल्या शेतकर्याच पिक आपल्या जवळ असते ना तो पर्यंत आपल्या पिकाले भावच नसते.
राम्या: गण्या अस कौन होत रे हे?
गण्या: काय होते राम्या आपल्या शेतकर्याजवळ पैसे नसते. म्हणुन आपन नही काय आपल्या जवळ असलेल पिक आपण आल्या त्या भावात विकुन टाकतो. पण आपल्या जवळुन माल विकत घेणारे काय करते तो माल नही काय जमा करुन ठेवते. अन बाजारात क्रुतिम तुटवडा निर्मान करते.
राम्या: त्यान काय होत बे मग?
गण्या: बाजारात त्या मालाचा तुडवडा झाल्यान त्या मालाची मागणी वाढते पन बाजारात तो माल च नसते. मग त्याचे भाव वाढते..
राम्या: मग?
गण्या: एकडाव काय भाव वाढला का हे लोक आपला माल धिरेधिरे बाहेर काढते अन् आपल्या शेतकर्याच्या पिकावर कैक पटीने नफा कमवते.
राम्या: आता माह्या लक्षात आल आपला माल विकाच्या पहीले भाव कौन कमी असते अन् माल विकल्यावर कसा भाव जास्त असते ते.
गण्या: आला न लक्षात म्हणुनच लोक म्हणते " शेतकर्याईचा कोनी वाली नसते"
संजय राजु कोकरे
रा. अंबाडा ता. मोर्शी
जि. अमरावती
मो. नं. 9561730189
Email Id: S.r.kokare1992@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)
तुम्हाला हे वाचायला आवडेल...
निरागस प्रेम...
"प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...
-
*🙏विचार धन🙏* एक सावकार आपल्या कुत्र्यासोबत होडीतून नदी पार करीत होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्या...
-
महाराष्ट्रात मागील वर्षी कपाशी या पिकावर बोण्ड अळी चा प्रभाव दिसला. त्यामुले महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचं कापसाचे उत्पादन कमी...