मुख्य सामग्रीवर वगळा

...शासन आणि शेतकरी...


          "विधात्या तू इतका कठोर का झालास ?
एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला
विसरतोस . ."
         हे प्रसिद्ध नटसम्राट या मराठी चित्रपटातील संवाद आजच्या परिस्थितीशी शेतकर्यांसाठी तंतोतंत लागु पडतो अस मला वाटत. ज्या निसर्गाने शेतकर्यांना जन्म दिला त्या निसर्गाने या शेतकर्याकड पाठ फिरवली आहे आणि जी नेते मंडळी याच शेतकर्यांच्या पाठींब्यामुळे आज मंत्रालयात बसली आहे तीही या शेतकर्याची मदत करण्याऐवजी थातुरमातुर योजना लागु करुन शेतकर्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न करत आहे.
              मागील काही वर्षापासुन दुष्काळाचे संकट  या शेतकर्यांवर घोंगावत आहे. या दुष्काळामुळे शेतकर्यांना शेतीत पिक पिकतच नाही आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांच्या  शेतात पिकच पिकत नाही आहे त्यांनी शेतातुन उत्पन्न  घेण्यासाठी घेतलेले कर्ज भराव तरी कोठुन ? हा एक मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्मान झाला.
मागील काही वर्षापासुन दुष्काळामुळे शेतकर्याला  शेतीपासुन काहीही उत्पन्न मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकर्याला शेती साठी घेतलेले पिक कर्ज  भरता आल नाही. त्यामुळे शेतकरी हा बँकेचा थकबाकीदार राहीला. त्यामुळे बँकेनी शेतकर्यांना पुढील हंगामासाठी पिक कर्ज दिले नाही. म्हणुन शेतकर्यांनी आपल्या घरातील दागदागिने विकुन किंवा सावकाराकडुन कर्ज घेउन त्याने आपले शेत पेरले. परंतु निसर्गाने पुन्हा त्याची थट्टा केली आणि पुन्हा दुष्काळ पडला. या दुष्काळामुळे पुन्हा शेतकर्याला काहीही उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज (सावकाराकडुन म्हणा की बँके कडुन म्हणा) भरता आले नाही किंवा विकलेले दागदागने ही वापस मिळवता आले नाही. त्यामुळे सावकारांचे कर्ज किंवा बँकेचे कर्ज कसे भरावे ? आणि आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह कसा करावा? असे प्रश्न शेतकर्यासमोर निर्मान झाले.
                 शासन सुद्धा संकटात सापडलेल्या या शेतकर्यांची हवी तशी मदत करण्यास पुढे येत नाही आहे. शासनाने दुष्काळामुळे पिक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे ठरवले. मात्र कोणाचे? तर त्यांचे ज्यांनी मागील वर्षी कर्ज घेतले आहे . मात्र मागील काही वर्षापासुन पडत असलेल्या दुष्काळामुळ काही शेतकरी मागील दोन ते तीन  वर्षापासुन बँकेचा थकबाकीदार झाला आहे. त्यामुळे या वर्षीच्या पिक कर्ज पुनर्गठन योजनेसाठी तो पात्र ठरत नाही. त्यामुळे शेतकर्यांसाठी ही योजना म्हणजे शासनाने त्या शेतकर्यांसोबत केलेली थट्टाच आहे असा भास होतो आहे.
                  शासनाला जर शेतकर्यांसाठी काही करायचेच होते किंवा शेतकर्यांची मदतच करायची होती तर शेतकर्यांना संपुर्ण कर्ज माफी शासनाने करायला पाहीजे होती. जेणे करुन त्यांच्या वरील बँकेचे कर्ज संपल असत आणि नव्याने बँकेतुन कर्ज घेउन शेतकर्यांनी नव्या जोमाने शेती करण्यास सुरुवात केली असती. किंवा कमीत कमी शासनाने सरसकट सर्व थकबाकीदार शेतकर्यांचे पिक कर्जाचे पुनर्गठन करणे आवश्यक होते. परंतु शासनाने मात्र फक्त मागील वर्षी पिक कर्ज घेणार्याच शेतकर्यांचे पिक कर्ज पुनर्गठन करण्याच ठरवले. त्यामुळे आधीच थकबाकीदार असणार्या शेतकर्याच्या जखमावर शासनाने मीठ चोळण्याच काम केल आहे. यावरुन शासन शेतकर्याविषयी उदासिन आहे अस दिसुन येते आणि हे कृषिप्रधान असणार्या या देशासाठी नक्कीच घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही....


                                   संजय रा. कोकरे
                                        रा. पळसखेड
                            ता. चांदुर रे. जि. अम.
                      मो.नं. 9561730189
                     Email:
                     s.r.kokare1992@gmail.com

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"युवकाच्या देशात युवकांच्या समस्या....."

" ये देश युवाओ का है " हे वाक्य वेगवेगळ्या भाषातुन वेगवेगळ्या नेत्याच्या मुखातुन वेगवेगळ्या रितीने ऐकायला मिळत. आम्ही ही मान्य करतो की हा देश युवकांचा आहे, जगाचा विचार केला तर सर्वात जास्त युवकांची संख्या ही भारतातच आहे त्यामुळे भारताला युवकांचा देश म्हटल तर ते उचितच होईल. मग ज्या देशात सर्वात जास्त युवकांची संख्या आहे तो देश या जगाच्या स्पर्धेत मागे राहतो तरी कसा ? या प्रश्नाचा विचार केला का आपण कधी. आणि जर या प्रश्नाचा विचार आपण केला नसेल तर आपण आपल्या देशाच्या विचारांबाबत एवढे षंढ कसे काय असु शकतो..
                            " देशाकरीता युवकांनी आपल काहीतरी योगदान दिल पाहीजे जेणेकरुन हा देश यशाची सर्वांत मोठी उंची गाठु शकेल" हे ही वाक्य बर्याच नेत्याच्या मुखातुन ऐकायला मिळत. युवकांनी आपल्या देशासाठी, देशाच्या विकासासाठी काहीतरी करण हे त्यांच परम कर्तव्यच आहे आणि युवक हे आपल्यापरिने आपल कर्तव्य चांगल्या रितीने पार पाडण्याचा प्रयत्न करतील यात मात्र कवडीमात्र शंका नाही. पण युवांना या देशासाठी काहीतरी करण्यासाठी शासनाची साथ लाभते तरी…

मानुसकीच्या माणसांचा...

मला  प्रत्येक ठिकाणी सैराट
दिसत होता,
कारण सर्वच ठिकाणी
जातीधर्माचाच मोठा वाद होता...!!

ज्याला त्याला आपल्या जातीधर्माचाच
खासदार व्हावा अस वाटत होत,
म्हणुन दुसर्या जातीधर्माचा मंत्री आपल्या
भागात मिरवावा हेही खपत नव्हत...!!

जातीविषयी कोणी काही बोलल तर
त्याला सहन होत नव्हत,
परंतु आईबापाला वृद्धाश्रमात पाठवुन
बायकोसोबत फिरण मात्र त्याला जमत होत...!!

बरेच जण जातीधर्मासाठी
काहीही करायला तयार असतात,
आणि म्हटल जा लढ देशासाठी
तर काही बोलायला तयार नसतात...!!

हे असच का होत
मला कळत नाही ,
पण हे सर्व पाहुन डोळ्यातील
अश्रु मात्र नक्कीच आवरत नाही...!!

देवाने तर साधाभोळा
माणुस तयार केला ,
मात्र पृथ्वीवर आल्या नंतर
कोणी हिंदु कोणी मुसलमान झाला...!!

मला माहीत नाही
कोण कोणता धर्म मानतो,
पण मी मात्र माणुसकी
 हाच खरा धर्म जानतो...!!

अरे सोडा तो जातधर्म जो
तोडतो माणसाला माणसापासुन,
आणि या एकत्र  सर्व
माणुसकी या धर्माची मुले बनुन...!!

मग पहा हा आपला
भारत देश कसा बनतो आदर्श जगाचा,
सर्व जगच हेवा करेल आमच्या
या देशातील माणुसकीच्या माणसांचा...!!                                        संजय रा. कोकरे
       …

आज माणसातील माणुसकी संपत चालली आहे?...

आज  एक बातमी वाचुन मनाला धक्काच बसला. एक व्यक्ती सर्वांसमोर आपल्या अर्धांगणीला म्हणजेच आपल्या पत्नीला बाहेर मैदानात खचुन आणतो, मारहान करतो. तो इथपर्यंतच थांबत नाही तर  तिच्यावर  चाकुने ने वार करायला पुढे सरसावतो. मात्र त्या मैदानात उपस्थित असलेली गर्दी फक्त बघ्याची भुमिका घेत होती. व या यापेक्षा  वाईट म्हणजे ते गर्दीतील काही व्यक्ती तर या प्रसंगाच चित्रिकरण करण्यात व्यस्त होती.
           त्या स्त्रीला पतीची मारहान चालु असताना तेथे असलेल्या गर्दीतील व्यक्ती कोणत्याही प्रकारची माणुसकी न दाखवता कोणीच मध्यस्थी करत नव्हती. यावरुन आपल्यातील माणुसकी संपली आहे का हा प्रश्न निर्मान होतो. तेव्हा त्या गर्दीत माणुसकी असणार्या व्यक्तींनी तेथे धाव घेतली. त्यांना बघुन पोलीसांनी सुद्धा तत्काळ धाव घेतली. त्या मदतीला धावुन गेलेल्या व्यक्तींमुळे कदाचित आज आपल्यात थोडी तरी माणुसकी शिल्लक आहेत अस म्हणता येण्याकरीता जागा शिल्लक राहीली...