मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानुसकीच्या माणसांचा...

मला  प्रत्येक ठिकाणी सैराट
दिसत होता,
कारण सर्वच ठिकाणी
जातीधर्माचाच मोठा वाद होता...!!

ज्याला त्याला आपल्या जातीधर्माचाच
खासदार व्हावा अस वाटत होत,
म्हणुन दुसर्या जातीधर्माचा मंत्री आपल्या
भागात मिरवावा हेही खपत नव्हत...!!

जातीविषयी कोणी काही बोलल तर
त्याला सहन होत नव्हत,
परंतु आईबापाला वृद्धाश्रमात पाठवुन
बायकोसोबत फिरण मात्र त्याला जमत होत...!!

बरेच जण जातीधर्मासाठी
काहीही करायला तयार असतात,
आणि म्हटल जा लढ देशासाठी
तर काही बोलायला तयार नसतात...!!

हे असच का होत
मला कळत नाही ,
पण हे सर्व पाहुन डोळ्यातील
अश्रु मात्र नक्कीच आवरत नाही...!!

देवाने तर साधाभोळा
माणुस तयार केला ,
मात्र पृथ्वीवर आल्या नंतर
कोणी हिंदु कोणी मुसलमान झाला...!!

मला माहीत नाही
कोण कोणता धर्म मानतो,
पण मी मात्र माणुसकी
 हाच खरा धर्म जानतो...!!

अरे सोडा तो जातधर्म जो
तोडतो माणसाला माणसापासुन,
आणि या एकत्र  सर्व
माणुसकी या धर्माची मुले बनुन...!!

मग पहा हा आपला
भारत देश कसा बनतो आदर्श जगाचा,
सर्व जगच हेवा करेल आमच्या
या देशातील माणुसकीच्या माणसांचा...!!                                        संजय रा. कोकरे
       …

...शासन आणि शेतकरी...

"विधात्या तू इतका कठोर का झालास ?
एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला
विसरतोस . ."
         हे प्रसिद्ध नटसम्राट या मराठी चित्रपटातील संवाद आजच्या परिस्थितीशी शेतकर्यांसाठी तंतोतंत लागु पडतो अस मला वाटत. ज्या निसर्गाने शेतकर्यांना जन्म दिला त्या निसर्गाने या शेतकर्याकड पाठ फिरवली आहे आणि जी नेते मंडळी याच शेतकर्यांच्या पाठींब्यामुळे आज मंत्रालयात बसली आहे तीही या शेतकर्याची मदत करण्याऐवजी थातुरमातुर योजना लागु करुन शेतकर्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न करत आहे.
              मागील काही वर्षापासुन दुष्काळाचे संकट  या शेतकर्यांवर घोंगावत आहे. या दुष्काळामुळे शेतकर्यांना शेतीत पिक पिकतच नाही आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांच्या  शेतात पिकच पिकत नाही आहे त्यांनी शेतातुन उत्पन्न  घेण्यासाठी घेतलेले कर्ज भराव तरी कोठुन ? हा एक मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्मान झाला.
मागील काही वर्षापासुन दुष्काळामुळे शेतकर्याला  शेतीपासुन काहीही उत्पन्न मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकर्याला शेती साठी घेतलेले पिक कर्ज  …

ठेंगा...

१५ जुनला आतेभावाचा अड्मिशन फॉर्म भरण्याकरिता अमरावतीला गेलो होतो. तस म्हटल तर मलाही जिल्हाधिकारी साहेबांना एका विषयान्वे एक निवेदन द्यायच होत. म्हणुन अमरावती जिल्हधिकारी कार्यालयाला मी गेलो आणि जिल्हाधिकारी साहेब काही कामानिमीत्त बाहेर गेले असल्यामुळ निवासी जिल्हीधिकारी साहेबांना निवेदन दिले व त्याची पोहच पावती घेतली. तेथुन आम्ही अमरावती बस डेपो जवळ गेलो. पोहच पावतीची काही झेरॉक्स काढण्याकरीता मी एका झेरॉक्स च्या दुकानामध्ये गेलो. दहा झेराक्स काढल्या. त्याला किती रुपये झाले म्हणुन विचारणा केली तर त्याने  दहा रुपये सांगितले. तेव्हा त्यांला खुप महागाई झाली अस सहजच म्हटल व त्याला १० रु. देउन तेथुन जावयास निघालो.
               तेवढ्यात त्या दुकादाराने आम्हाला परत बोलविल. आम्ही परत गेलो. त्याने त्याच्या दुकानातुन दोन एक रुपयाची नाणी काढली. आम्हाला दाखवली पण आम्हाला काहीही सुचत नव्हत हा व्यक्ती नक्की करतोय तरी काय?. त्याने आम्हाला ही दोन नाणी बघा तरी म्हणुन आग्रह केला. मग मी ती नाणी बघितली व त्याला सांगितल की ही दोन्ही एक रुपयाची नाणी आहेत. पण त्याने पुन्हा प्रश्न केला की य…

शासनाची मेंढपाळाविषयी उदासिनता

शासनाच्या आधुनिकतेच्या  धोरणामुळे अनेक  पारंपारिक व्यवसायांवर गदा आलेली आहे. परंतु पारंपारिक व्यवसाय करणार्या या समाजाचे पुनर्वसन करण्यासाठी मात्र शासनाने कोणत्याही प्रकारचे पाउल उचलले नाही ही एक  शोकांतिका आहे. शासनाच्या आधुनिकतेचे धोरणाचे स्वागत आहेच पण या धोरणामुळे ज्या समाजाच्या वंशपारंपारिक व्यवसायावर  गदा आली त्यांचेही कुठेतरी पुनर्वसन व्हायला हवे असे माझे मत आहे. शासनाने आजवर वन्यजीव सरंक्षन कायदा, प्राणिमात्रा छळविरोधी कायदा यासारखे कायदे करण्यात आले. परंतु या कायद्यामुळे अनेक समाजाच्या पारिपारिक व्यवसायावर गदा आली व त्यांच्या उपजिवेकेचे साधन त्याच्यापासुन हिरावुन घेतल्यामुळे त्या समाजातील लोक ही दोन वेळेच्या अन्नालाही महाग झाली आहेत. परंतु शासनाने त्यांचे पुनर्वसन करण्याची तसदी घेतली नाही.                         धनगर   समाज हा ही जंगलोजंगली भटकंती करणारा समाज. हा समाज नागरी समाज व्यवस्थेपासुन दुर राहणारा. या समाजातील अनेकाजवळ ना राहायला घर ना कसायला जमिन. यांचा उदरनिर्वाह चालतो तो फक्त शेळी मेंढीपालन व्यवसायावर. परंतु शासनाने जंगलात  शेळीमेंढींना केलेल्य…

पावसाच्या सरी

कधी कधी वाटत डोळ्यात अश्रु किती लवकर येतात,
पण पावसाच्या सरी मात्र लवकर येत नाही !!
अस वाटत की या पावसाच्या सरीनांही आम्हा शेतकर्यांच्या आत्महत्या बघितल्याशिवाय राहवत नाही...!!