Popular Posts

Saturday, August 15, 2015

धनगर समाजाच्या आरक्षन विषयक प्रश्नाबाबत युती सरकार उदासिन...


                 धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षन लागु करण्याचे आश्वासन युती सरकारने विधानसभा निवडणुकी अगोदर धनगर समाजाला दिल. हेच आश्वासन भाजपाने आपल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पण जाहीर केल होत. त्यामुळेच धनगर समाजाने भरघोस असे मतदान  भाजपा च्या उमेदवारांना केल. त्यामुळचे राज्यात सत्तांत्तर होउन युती सरकार सत्तेत आल. पण आज या युती सरकारला सत्तेत येउन दहा महीण्यापेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी भाजपा सरकारला धनगर समाजाला आश्वासना देण्या खेरीज दुसर काहीही देता आलेल नाही. त्यामुळे युती सरकारला धनगर समाजाचा विधानसभा निवडणुकीनंतर विसर पडला की काय? हा प्रश्न जनसामान्यांसाठी संशोधनाचा विषय ठरला आहे.
                धनगर समाजातील १६ शिलेदार ज्या वेळेस बारामतीला उपोषनास बसले होते त्या वेळेस  त्यावेळेसच भाजपा प्रदेशाध्यक्ष व आजचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ह्यांनी स्वता जाउन भाजपाची सत्ता महाराष्ट्रात आल्यास धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवु अस आश्वासन दिल होत. तसेच ४ जानेवारीला सपन्न झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्या मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी महाधिवक्ता यांच्यासोबत चर्चा करुन धनगर समाजाचा प्रश्न हा १५ दिवसाच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करु असे जाहीर आश्वासन दिले होते.
                   परंतु मा. मुख्यमंत्री साहेंबांनी धनगर समाजाच्या नागपुर मेळाव्यामध्य दिलेल्या जाहीर आश्वासनाला आज ६-७ महीने झाल्यानंतरही धनगर समाजाच्या आरक्षनाबाबत कोणताही निर्णय झालेला दिसत नाही आहे. त्यामुळे एका भोळ्याभाबड्या समाजाला फक्त आश्वासन देत त्या समाजाची युती सरकार फसवणुक तर करु पाहत नाही आहे ना ? हा प्रश्न जनसामान्याच्या मनात निर्मान होत आहे. कारण हा प्रश्न फक्त धनगर समाजाचाच नसुन युती सरकार वर विश्वास ठेवणार्या महाराष्ट्रातील सर्वच समाजाचा असल्यामुळे धनगर समाजाला आतापर्यंत न्याय मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वच समाजाचा युती सरकार वरील असंतोष वाढीस जात आहे याची दक्षता युती सरकारने घ्यायला हवी.
                   धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनाच्या प्रश्नाबाबत विरोधी पक्ष हा सकारात्मक दिसत असुन त्यांनी हा प्रश्न विधानसभेत अनेक वेळा उपस्थित केलेला आहे.  त्यामुळे धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षनाचा प्रश्न  सत्ताधारी पक्ष सोडवण्यास विलंब का करत आहे ? हा जनसामान्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षन विषयक प्रश्नाबाबत बीजेपी सरकार खरेच सकारात्मक आहे की फक्त वेळकाढु धोरण राबवुन धनगर समाजाची फसवणुक करु पाहत आहे ? या बाबत धनगर समाजाने वेळीच चिंतन करुन वेळीच सावधान भुमिका घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन धनगर समाज आपली फसवणुक होण्याची शक्यता असेल तर आपला त्यापासुन बचाव करु शकेल अशी  आशा महाराष्ट्रातील सामान्य जनता बाळगु लागली आहे....

लेखक:👇👇👇
संजय रा कोकरे
अमरावती
मो.नं: 9561730189
Www.sanjaykokre.blogspot.com
तुम्ही मला twitter ला फोलो करु शकता.
Www.twitter.com/kokaresanjay
🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚

No comments:

Post a Comment

तुम्हाला हे वाचायला आवडेल...

निरागस प्रेम...

   "प्रेमाच नात हे रक्ताच्या नातापेक्षा मोठ असत" हे नेहमीच म्हटल्या जात. पण समाजामध्ये जगत असताना हे खरच वाक्य सत्यात उतरत का?...