मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

October, 2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"महाराष्ट्रामधील २०१४ विधानसभा निवडणुकीतील धनगरांचे योगदान"

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकींचे निकाल लागले व सर्वत्र कमळ च कमळ फुलु लागले. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांना व काल परवा पर्यंत मुख्यमंत्रीपदासाठी दावा ठोकणार्या नेत्याला पण अनपेक्षित असणार्या अस्या पराभवाला समोरे जावे लागले. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीप्रेणित युतीचे सरकार बसण्याचे चिन्ह दिसत आहे. भारतीय जनता पार्टीला जरी स्पष्ट बहुमत मिळालेले नसले तरी भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा पक्ष म्हणुन अस्तित्वात आलेला आहे. भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्रपक्षाला १२३ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना या पक्षाला ६३ जागा मिळाल्या आहेत तर राष्ट्रीय कॉग्रेस या पक्षाला ४२ जागा व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला ४१ जागा मिळाल्या आहेत. भाजपाला महाराष्ट्रमध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी शिवसेना किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षाची साथ घ्यावी लागु शकते.परंतु यावेळेस महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या नेत्रुत्वात सरकार स्थापण होणार नक्की. महाराष्ट्रामध्ये २००९ विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ला ४६ जागावर व शिवसेना या पक्षाला ४४ जागावर विजय …

" वास्तव: रस्त्यावर राहणार्या मुलांची स्थिती अत्यंत बिकट"

मी अमरावती मधील दस्तुर नगर या परिसरात माझ्या मित्राला भेट देण्या करता आलो होतो. सकाळ चे दहा वाजले असताना सर्व परिसरातील लोक हे आपल्या कामावर जाण्यासाठी चौकामधुन ये जा करत होते, त्याचप्रमाने सर्वच लहान मोठी मुल-मुली आपल्या शालेय गणवेशामध्ये शाळेत जाण्याकरता चौकामधुन ये-जा करत होती. माझा मित्राला दस्तुर नगर मध्ये यायला काही वेळ लागणार होता त्यामुळे हे सर्व चित्र बघत मी दस्तुर नगर मध्ये उभा होतो. तेवढ्यात कोणीतरी माझ्या हाताला हात लावुन मला आवाज देण्याचा प्रयत्न करत होते, मी मागे वळुन बघितले असता अत्यंत घाणरडे असे कपडे घातलेली आठ - नऊ वर्षाची मुलगी व तिच्या हातात तिचीच एक दोन वर्षाची लहान बहीण घेउन आपले हात पसरुन मला भिक मागत होती. मला त्या दोघी बहीणींची दयनीय अवस्था बघुन मला दया आली व त्यांना मी दहा रूपये दिले. त्या मुली लगेच ते पैसे घेऊन माझ्या जवळुन दुर गेल्या.अश्याच प्रकारे भिक मागणारी बर्याच प्रमाणात मुलमुली त्या नगरामध्ये फिरत होते. ती मुल-मुली कोणालाही भिक मागण्याच आपल काम करत होती. कोणी त्यांना हाकलुन लावत होते तर कोणी त्यांना दयेच्या नजर…

"देशाचे राष्ट्रगीत महत्वाचे की राजकीय नेत्याचे भाषण?"

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकींचे पडझम सर्वत्र वाजत आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाचा उमेदवार निवडुन यावा म्हणुन प्रचार सभा घेण्याचा सपाटा सुरु केला आहे व प्रचार सभेचा आवाज अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचावा याकरता न्युज चॅनेल त्यांचे थेट प्रक्षेपण दाखवत आहेत. महाराष्ट्राच्या कोणत्याही परिसरात घेतली जाणारी प्रचार सभा ही महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचत आहे व त्यामुळे प्रत्येक पक्षांच्या पक्ष श्रेष्ठींचे विचार महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावापर्यंतच्या लोकापर्यंत पोहचत आहे. प्रत्येक पक्षाचा पक्षश्रेष्ठी आपल्या भाषणातुन आपल्या पक्षाचा लेखाजोगा मांडत असतो व भविष्यामध्ये सत्ता त्याच्या हातामध्ये आल्यास त्याचा पक्ष कोणत्या गोष्टी करण्यावर भर देणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. दि. २८ सप्टेंबर २०१४ ला संध्याकाळला मा. राज ठाकरे यांची मुंबई येथे प्रचार सभा होती. त्या सभेमध्ये मा. राज ठाकरेंचे भाषन चालु होते व बर्याच मराठी न्युज चॅनल वर त्याचे थेट प्रक्षेपण चालु होते. मा. राज ठाकरे साहेबांचे भाषन संपल परंतु तेथील व्यासपिठावर कार्यक्रमाची सांगता ह…