मुख्य सामग्रीवर वगळा

"देशाचे राष्ट्रगीत महत्वाचे की राजकीय नेत्याचे भाषण?"

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकींचे पडझम सर्वत्र वाजत आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाचा उमेदवार निवडुन यावा म्हणुन प्रचार सभा घेण्याचा सपाटा सुरु केला आहे व प्रचार सभेचा आवाज अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहचावा याकरता न्युज चॅनेल त्यांचे थेट प्रक्षेपण दाखवत आहेत. महाराष्ट्राच्या कोणत्याही परिसरात घेतली जाणारी प्रचार सभा ही महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचत आहे व त्यामुळे प्रत्येक पक्षांच्या पक्ष श्रेष्ठींचे विचार महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावापर्यंतच्या लोकापर्यंत पोहचत आहे. प्रत्येक पक्षाचा पक्षश्रेष्ठी आपल्या भाषणातुन आपल्या पक्षाचा लेखाजोगा मांडत असतो व भविष्यामध्ये सत्ता त्याच्या हातामध्ये आल्यास त्याचा पक्ष कोणत्या गोष्टी करण्यावर भर देणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. दि. २८ सप्टेंबर २०१४ ला संध्याकाळला मा. राज ठाकरे यांची मुंबई येथे प्रचार सभा होती. त्या सभेमध्ये मा. राज ठाकरेंचे भाषन चालु होते व बर्याच मराठी न्युज चॅनल वर त्याचे थेट प्रक्षेपण चालु होते. मा. राज ठाकरे साहेबांचे भाषन संपल परंतु तेथील व्यासपिठावर कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने होईल असे जाहीर करण्यात आले. मी राष्ट्रगीताकरता उभा राहणारच तेवढ्यात त्या न्युज चॅनेलने त्या प्रचार सभेचे थेट प्रक्षेपन बंद केले आणि आपले नविन बातमीपत्र सुरु केले. माझ्या मनात विचार येत होता की राजकीय पक्षांच्या पक्षश्रेष्ठींचे अर्धा ते एक तासाचे भाषणाचे प्रक्षेपण दाखवण्यात न्युज चॅनल काही अडचण नव्हती मग ५२ सेकंदाचे राष्ट्रगीत दाखवण्यात न्युज चॅनेल ला काय अडचण होती. एखाद्या राजकीय पक्षाचा पक्षेश्रेष्ठीचे भाषन भारताच्या राष्ट्रगीतापेक्षा न्युज चॅनेलला मोठे वाटते की काय? हा प्रश्न माझ्याचसाठी नव्हे तर महाराष्ट्रतील जनसामान्यासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. जी न्युज चॅनल निवडणुक काळामध्ये राजकर्त्यांच्या भाषनाचे थेट प्रक्षेपण करु शकते, राजकीय पक्षाच्या तसेच वेगवेगळ्या सौदर्य प्रसाधनाच्या जाहीराती दाखवु शकतात तेच न्युज चॅनेल ५२ सेकंदाचे राष्ट्रगीत दाखवण्यास का काटकसर करतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे. राजकीय पक्षाच्या प्रचार सभेमधील पक्षश्रेष्ठीचे संपुर्ण भाषणाचे थेट प्रक्षेपण करायचे परंतु त्याच सभेतील राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर त्या प्रचार सभेचे थेट प्रक्षेपण बंद करुन नविन बातमीपत्र सुरु करायचे हे कितपत योग्य आहे? देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशाचा अभिमान असावा व आपल्या देशाच्या राष्ट्रगीताचा सन्मान देशातील प्रत्येक नागरिकाने करावा असे आपणा सर्वांचे मत असते. परंतु देशाच्या राज्यघटनेचा चौथा आधारस्तंभ असलेली मिडीयाच ज्यावेळेस असे क्रुत्य करते त्यावेळेस सामान्य जनतेकडुन काय अपेक्षा करावी हा मोठा प्रश्न निर्मान होतो आहे. ईलेक्ट्रानीक्स मिडीयाला राजकीय पक्ष हा देशाच्या राष्ट्रगीतापेक्षाही मोठा वाटतो का? मिडीयाला आपल्या देशाचा अभिमान आहे की नाही? असे अनेक प्रश्न देशातील सामान्य जनतेच्या मनात निर्मान होत आहे. प्रती, मा. संपादक साहेब, दैनिक __________ आपल्या लोकप्रिय दैनिकातुन हा अग्रलेख प्रसिद्घ करावा ही विनंती. संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"युवकाच्या देशात युवकांच्या समस्या....."

" ये देश युवाओ का है " हे वाक्य वेगवेगळ्या भाषातुन वेगवेगळ्या नेत्याच्या मुखातुन वेगवेगळ्या रितीने ऐकायला मिळत. आम्ही ही मान्य करतो की हा देश युवकांचा आहे, जगाचा विचार केला तर सर्वात जास्त युवकांची संख्या ही भारतातच आहे त्यामुळे भारताला युवकांचा देश म्हटल तर ते उचितच होईल. मग ज्या देशात सर्वात जास्त युवकांची संख्या आहे तो देश या जगाच्या स्पर्धेत मागे राहतो तरी कसा ? या प्रश्नाचा विचार केला का आपण कधी. आणि जर या प्रश्नाचा विचार आपण केला नसेल तर आपण आपल्या देशाच्या विचारांबाबत एवढे षंढ कसे काय असु शकतो..
                            " देशाकरीता युवकांनी आपल काहीतरी योगदान दिल पाहीजे जेणेकरुन हा देश यशाची सर्वांत मोठी उंची गाठु शकेल" हे ही वाक्य बर्याच नेत्याच्या मुखातुन ऐकायला मिळत. युवकांनी आपल्या देशासाठी, देशाच्या विकासासाठी काहीतरी करण हे त्यांच परम कर्तव्यच आहे आणि युवक हे आपल्यापरिने आपल कर्तव्य चांगल्या रितीने पार पाडण्याचा प्रयत्न करतील यात मात्र कवडीमात्र शंका नाही. पण युवांना या देशासाठी काहीतरी करण्यासाठी शासनाची साथ लाभते तरी…

मानुसकीच्या माणसांचा...

मला  प्रत्येक ठिकाणी सैराट
दिसत होता,
कारण सर्वच ठिकाणी
जातीधर्माचाच मोठा वाद होता...!!

ज्याला त्याला आपल्या जातीधर्माचाच
खासदार व्हावा अस वाटत होत,
म्हणुन दुसर्या जातीधर्माचा मंत्री आपल्या
भागात मिरवावा हेही खपत नव्हत...!!

जातीविषयी कोणी काही बोलल तर
त्याला सहन होत नव्हत,
परंतु आईबापाला वृद्धाश्रमात पाठवुन
बायकोसोबत फिरण मात्र त्याला जमत होत...!!

बरेच जण जातीधर्मासाठी
काहीही करायला तयार असतात,
आणि म्हटल जा लढ देशासाठी
तर काही बोलायला तयार नसतात...!!

हे असच का होत
मला कळत नाही ,
पण हे सर्व पाहुन डोळ्यातील
अश्रु मात्र नक्कीच आवरत नाही...!!

देवाने तर साधाभोळा
माणुस तयार केला ,
मात्र पृथ्वीवर आल्या नंतर
कोणी हिंदु कोणी मुसलमान झाला...!!

मला माहीत नाही
कोण कोणता धर्म मानतो,
पण मी मात्र माणुसकी
 हाच खरा धर्म जानतो...!!

अरे सोडा तो जातधर्म जो
तोडतो माणसाला माणसापासुन,
आणि या एकत्र  सर्व
माणुसकी या धर्माची मुले बनुन...!!

मग पहा हा आपला
भारत देश कसा बनतो आदर्श जगाचा,
सर्व जगच हेवा करेल आमच्या
या देशातील माणुसकीच्या माणसांचा...!!                                        संजय रा. कोकरे
       …

आज माणसातील माणुसकी संपत चालली आहे?...

आज  एक बातमी वाचुन मनाला धक्काच बसला. एक व्यक्ती सर्वांसमोर आपल्या अर्धांगणीला म्हणजेच आपल्या पत्नीला बाहेर मैदानात खचुन आणतो, मारहान करतो. तो इथपर्यंतच थांबत नाही तर  तिच्यावर  चाकुने ने वार करायला पुढे सरसावतो. मात्र त्या मैदानात उपस्थित असलेली गर्दी फक्त बघ्याची भुमिका घेत होती. व या यापेक्षा  वाईट म्हणजे ते गर्दीतील काही व्यक्ती तर या प्रसंगाच चित्रिकरण करण्यात व्यस्त होती.
           त्या स्त्रीला पतीची मारहान चालु असताना तेथे असलेल्या गर्दीतील व्यक्ती कोणत्याही प्रकारची माणुसकी न दाखवता कोणीच मध्यस्थी करत नव्हती. यावरुन आपल्यातील माणुसकी संपली आहे का हा प्रश्न निर्मान होतो. तेव्हा त्या गर्दीत माणुसकी असणार्या व्यक्तींनी तेथे धाव घेतली. त्यांना बघुन पोलीसांनी सुद्धा तत्काळ धाव घेतली. त्या मदतीला धावुन गेलेल्या व्यक्तींमुळे कदाचित आज आपल्यात थोडी तरी माणुसकी शिल्लक आहेत अस म्हणता येण्याकरीता जागा शिल्लक राहीली...