मुख्य सामग्रीवर वगळा

"जागा वाटपाचा गुंता की बंडखोरी रोखण्याची योजना....."


"जागा वाटपाचा गुंता की बंडखोरी रोखण्याची योजना....." महाराष्ट्रामध्ये सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्याची अंतीम तारीख ही २७ सप्टेंबर आहे . महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेसाठी मतदान हे १५ आक्टोंबर ला असुन विधानसभेचा निकाल हा १९ आक्टोंबरला लागणार आहे. परंतु आतापर्यंत महायुती आणि आघाडी मधील जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार?, कोणत्या पक्षाला सुटणार हे नक्की झालेच तर उमेदवार कोण राहणार?, आणि उमेदवार इतक्या कमी वेळात प्रचार तरी कोणत्या प्रकारे करणार? हे सर्व प्रश्न प्रत्येक मतदार संघातील जनसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. लोकसभेमध्ये मिळालेला विजय हा मोदी लाटे मुळेच मिळाला आहे असा समज झालेल्या भारतीय जनता पार्टी हा पक्ष महाराष्ट्रात पण या लाटेचा फायदा घेऊन आपल्याला अधिकाअधिक जागा जिंकता येतील व आपल्याला अधिकाअधिक जागा जिंकता आल्यास मुख्यमंत्री आपलाच असेल असे समज करुन भारतीय जनता पक्ष हा शिवसेना कडे महायुतीमधील जादा जागांची मागणी करत आहे. परंतु महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असुन येथे कोणत्याही एका व्यक्तीची हवा उपयोगात आणता येत नाही तर येथे फक्त विकासाचेच राजकारण उपयोगात आणता येते हे भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी लक्षात घेतले पाहीजे आणि महायुती मधील जागावाटपाचा गुंता लवकरात लवकर सोडायला पाहीजे. 'महायुती मध्ये असणार्या घटक पक्षांची अवस्था ही मामाच्या येथे शिकायला गेलेल्या विद्यार्थ्याप्रमाने झालेली असुन मामा-मामीच पटेना आणि शिक्षन अर्धवट सोडुन जाता येईना .' अशा प्रकारचे संदेश सोशल मिडीयावर नेहमीच सर्वत्र झळकताना दिसत आहे. यामुळे घटक पक्षांचा आत्मसन्मान दुखवण्याची शक्यता असुन ते महायुतीपासुन दुर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महायुती मधील प्रमुखपक्षानी जागावाटपाचा तिढा लवकर सोडवुन प्रत्येक पक्षाला त्याच्या महाराष्ट्रातील ताकदीप्रमाणे जागावाटप करावा ही महाराष्ट्रातील जनसामान्यांची ईच्छा आहे. महाराष्ट्रातमध्ये मागील लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय कॉंग्रेसपेक्षा अधिक जागा जिकंता आल्या मुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष महाराष्ट्रात स्वताला राष्ट्रीय कॉग्रेस या पक्षापेक्षा मोठा पक्ष समाजायला लागला असुन महाराष्ट्रामधील विधानसभा ही १४४ जागावरच लढणार असा सुर त्यांचे पक्षश्रेष्ठी काढत आहे आहे. परंतु राष्ट्रीय कांग्रेस हा पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडीतील१२४ पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही आहेत असे राष्ट्रीय कॉंग्रेसमधील नेत्यांच्या वक्तव्यावरुन दिसत आहे. त्यामुळे जागावाटपाचा गुंता हा अधिकच वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महायुती व आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे असी जनसामान्यांमध्ये चर्चा आहे. महायुती आणि आघाडी मध्ये जागावाटपावरुन खरचं गोंधळ चालु आहे की पक्षातील बंडखोरी रोखण्याचा एक प्रयत्न आहे का? हा एक प्रश्न नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्मान होत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे एकाच पक्षातील अनेक कार्यकर्ते एकाच मतदार संघामध्ये निवडणुक लढु इच्छित असतात. परंतु पक्ष हा एका मतदार संघातुन कोणत्यातरी एकाच सक्षम कार्यकर्त्याला उमेदवारी देवु शकत असतो त्यामुळे बाकी निराश झालेले कार्यकर्त्ये हे बंडखोरी करण्याची अधिकाअधिक शक्यता असते. पक्षामधुन बंडखोरी झाल्यास पक्षाचेच काही कार्यकर्त्ये पक्षापासुन दुर जाउन पक्षाची स्थानिक कार्यकारणी कमजोर करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे पक्षाचा उमेदवार निवडणुक हारण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुठेतरी जागावाटपामध्ये व प्रत्येक मतदारसंघाचा उमेदवार घोषित करण्यास दिरंगाई केल्यास बंडखोरी करणार्या उमेदवार्याला निवडणुकीची तयारी करण्यास खुपच कमी वेळ मिळत असल्यामुळे प्रत्येक पक्षातील बंडखोरीस आळा बसण्याची शक्यता आहे, असा समज प्रत्येक पक्षाच्या पक्षश्रेष्ठीचा झालेला दिसत आहे. म्हणुनच तर काय प्रत्येक पक्षाचे पक्षश्रेष्ठी हे जागा वाटपाचा गुंता सोडवण्यासाठी व प्रत्येक मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करण्यास दिरंगाई करत तर नाही आहे ना? हा प्रश्न जनसामान्यांत चर्चेचा विषय ठरत आहे..... प्रती, मा. संपादक साहेब, दैनिक __________ आपल्या लोकप्रिय दैनिकातुन हा अग्रलेख प्रसिद्घ करावा ही विनंती. संजय राजु कोकरे रा. अंबाडा ता. मोर्शी जि. अमरावती मो. नं. ९५६१७३०१८९ Email Id: S.r.kokare1992@gmail.com

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"युवकाच्या देशात युवकांच्या समस्या....."

" ये देश युवाओ का है " हे वाक्य वेगवेगळ्या भाषातुन वेगवेगळ्या नेत्याच्या मुखातुन वेगवेगळ्या रितीने ऐकायला मिळत. आम्ही ही मान्य करतो की हा देश युवकांचा आहे, जगाचा विचार केला तर सर्वात जास्त युवकांची संख्या ही भारतातच आहे त्यामुळे भारताला युवकांचा देश म्हटल तर ते उचितच होईल. मग ज्या देशात सर्वात जास्त युवकांची संख्या आहे तो देश या जगाच्या स्पर्धेत मागे राहतो तरी कसा ? या प्रश्नाचा विचार केला का आपण कधी. आणि जर या प्रश्नाचा विचार आपण केला नसेल तर आपण आपल्या देशाच्या विचारांबाबत एवढे षंढ कसे काय असु शकतो..
                            " देशाकरीता युवकांनी आपल काहीतरी योगदान दिल पाहीजे जेणेकरुन हा देश यशाची सर्वांत मोठी उंची गाठु शकेल" हे ही वाक्य बर्याच नेत्याच्या मुखातुन ऐकायला मिळत. युवकांनी आपल्या देशासाठी, देशाच्या विकासासाठी काहीतरी करण हे त्यांच परम कर्तव्यच आहे आणि युवक हे आपल्यापरिने आपल कर्तव्य चांगल्या रितीने पार पाडण्याचा प्रयत्न करतील यात मात्र कवडीमात्र शंका नाही. पण युवांना या देशासाठी काहीतरी करण्यासाठी शासनाची साथ लाभते तरी…

मानुसकीच्या माणसांचा...

मला  प्रत्येक ठिकाणी सैराट
दिसत होता,
कारण सर्वच ठिकाणी
जातीधर्माचाच मोठा वाद होता...!!

ज्याला त्याला आपल्या जातीधर्माचाच
खासदार व्हावा अस वाटत होत,
म्हणुन दुसर्या जातीधर्माचा मंत्री आपल्या
भागात मिरवावा हेही खपत नव्हत...!!

जातीविषयी कोणी काही बोलल तर
त्याला सहन होत नव्हत,
परंतु आईबापाला वृद्धाश्रमात पाठवुन
बायकोसोबत फिरण मात्र त्याला जमत होत...!!

बरेच जण जातीधर्मासाठी
काहीही करायला तयार असतात,
आणि म्हटल जा लढ देशासाठी
तर काही बोलायला तयार नसतात...!!

हे असच का होत
मला कळत नाही ,
पण हे सर्व पाहुन डोळ्यातील
अश्रु मात्र नक्कीच आवरत नाही...!!

देवाने तर साधाभोळा
माणुस तयार केला ,
मात्र पृथ्वीवर आल्या नंतर
कोणी हिंदु कोणी मुसलमान झाला...!!

मला माहीत नाही
कोण कोणता धर्म मानतो,
पण मी मात्र माणुसकी
 हाच खरा धर्म जानतो...!!

अरे सोडा तो जातधर्म जो
तोडतो माणसाला माणसापासुन,
आणि या एकत्र  सर्व
माणुसकी या धर्माची मुले बनुन...!!

मग पहा हा आपला
भारत देश कसा बनतो आदर्श जगाचा,
सर्व जगच हेवा करेल आमच्या
या देशातील माणुसकीच्या माणसांचा...!!                                        संजय रा. कोकरे
       …

'मायले विचारल म्या....'

मायले विचारल म्या आपली
परिस्थिती कौन एवढी गरीब असते ?,
मायन सांगितल मले आपन शेतकर्याच्या
 एथ जन्मलो म्हणुन हे भोगाव लागते !!!

 मायले विचारल म्या लोक तं
आपल्याले जगाचा पोशिंदा म्हणते,
मायन सांगितल मले कारण त्याईच्या
ईथची पोई आपल्या ईथच पिकते !!!

 मायले विचारल म्या त्या नेत्याच्या
 अंगावरले कपडे एवढे पांढरे कसे काय असते,
मायन सांगितल मले कारण त्यांईच्या
कपडाचा कापुस पण आपल्याच मिळते!!!

 मायले विचारल म्या मग
 माया अंगावरचे कपडे कौन मयकले असते,
मायन सांगितल मले कारण
 तुया कपडाले कापुस कमी न् घामच जास्त असते!!

 मायले विचारल म्या मले 
शाळेमधुन मास्तर कौन हाकलुन लावते,
मायन सांगितल मले कारण
 आपल्याजवळ शाळेच्या फी न् कपड्याची सोय नसते!!!

 मायले विचारल म्या आये मग
 आपल्याजवळ पैसे कौन नसते,
मायन सांगितल मले कारण आपल्या
 वाटणीचा हिस्सा हे पुढारी लोकच खाउन घेते!!!

 मायले विचारल म्या कौन वर्गातले
पोरं म्हले तुया बापान आत्महत्या केली अस म्हणते,
मायन सांगितले मले कारण तुया
 बापान शेती करुन दुसर्याच पोट भरल असते!!!कवी.............
संजय रा. कोकरे
अमरावती
मो. नं. 9561730189
Email: S.r.kokare19…